Breaking News LIVE : राज्यातील जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे सहकार विभागाचे आदेश

Breaking News LIVE Updates, 09 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Aug 2021 05:24 PM
लोकसभा आणि राज्यसभेत भाजप खासदारांसाठी व्हिप जारी, लोकसभेत उद्या आणि राज्यसभेत उद्या-परवाचा व्हिप

लोकसभा आणि राज्यसभेत भाजप खासदारांसाठी व्हिप जारी, लोकसभेत उद्या आणि राज्यसभेत उद्या-परवाचा व्हिप, उद्या लोकसभेत 127 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चा होण्याची दाट शक्यता

मोहरमसाठी मार्गदर्शक सूचना जारी

मोहरमसाठी मार्गदर्शक सूचना जारी



  • मातम मिरवणुका काढण्यास बंदी, घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळावा.

  • सोसायटीतील नागरिकांनाही एकत्रित दुखवटा करू नये. वाझ/मजलीस ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावेत

  • ताजिया/आलम काढू नये सबील/छबीलसाठी शासनाची परवानगी आवश्यक, बाटलीबंद पाणीच द्यावे लागणार. 

राज्यातील जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे सहकार विभागाचे आदेश

राज्यातील जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे सहकार विभागाने आदेश दिले आहे. कोरोनामुळे अनेक जिल्हा बँकांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत तर काही जिल्हा बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपून 15 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी संपला आहे. सहकार विभागाने कोरानामुळे 31 ऑगस्टपर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत. जिल्हा बँकांच्या निवडणुका 31ऑगस्टनंतर तातडीने घेता याव्या यासाठी आतापासून प्रारुप मतदार याद्या तयार करण्याचा आदेश काढण्यात आल्या आहेत

औरंगाबादमधील लसीकरणाच्या काळाबाजार प्रकरणी राजेश टोपे यांचे कारवाईचे आदेश

औरंगाबादमधील लसीकरणाच्या काळाबाजार प्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे कारवाईचे आदेश, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना संबंधित घटनेचा एका दिवसात रिपोर्ट देण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आदेश, आरोग्य सेवक गणेश दुरोळेला सस्पेंड करण्याचे आदेश

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन व्हावे या मागणीकरिता पंचगंगा नदी पात्रात आंदोलन, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांचे अनोखे आंदोलन

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन व्हावे या मागणीकरिता पंचगंगा नदी पात्रात आंदोलन, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांचे अनोखे आंदोलन

बीड : शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा
बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर नगर रोड मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कचेरीवर धडकला, दरम्यान या वेळी जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत. 

 
अविनाश भोसलेंच्या 4 कोटी रुपये किंमतीच्या जमिनीवर तात्पुरती टाच, मनी लॉन्डरिंग प्रकरणी ईडीची कारवाई

पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले यांच्या मालकीच्या अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची चार कोटी किंमतीच्या जमिनीवर ईडीने तात्पुरती टाच आणली आहे. मनी लॉन्डरिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.  

127 वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत पटलावर

मराठा आरक्षणाच्या निकालानंतर केंद्र सरकारने पाऊल उचललं असून 127 वे घटनादुरुस्ती विधेयक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी लोकसभेत पटलावर मांडले. 102 व्या घटनादुरुस्तीत बदल करून एसईबीसी प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार राज्यांनाच हे स्पष्ट करणारे हे विधेयक आहे. आता लोकसभेत यावर चर्चा कधी होते हे पाहावे लागेल.

102 व्या घटना दुरुस्तीत बदल करणारे विधेयक सरकार आज लोकसभेत मांडलं

Breaking News LIVE : 102 व्या घटना दुरुस्तीत बदल करणारे विधेयक सरकार आज लोकसभेत मांडलं,  मराठा आरक्षणाच्या निकालानंतर केंद्र सरकारचे पाऊल,  102 व्या घटनादुरुस्तीत बदल करून एसईबीसी प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार राज्यांनाच हे स्पष्ट करणार 


https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-august-9-2021-maharashtra-political-news-corona-pune-unlock-mumbai-local-train-news-998007

Breaking News LIVE : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा, जोरदार गोंधळामुळं राज्यसभा आणि लोकसभेच कामकाज काही वेळासाठी स्थगित 

Breaking News LIVE : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा, जोरदार गोंधळामुळं राज्यसभा आणि लोकसभेच कामकाज काही वेळासाठी स्थगित 
https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-august-9-2021-maharashtra-political-news-corona-pune-unlock-mumbai-local-train-news-998007

2013 सालानंतर पहिल्यांदाच हवामान बदलाच्या विज्ञानाबाबत सर्वसमावेशक आणि व्यापक अहवाल प्रकाशित होणार 

थोड्याच वेळात संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘इंटरगर्व्हमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’च्या माध्यमातून 2013 सालानंतर पहिल्यांदाच हवामान बदलाच्या विज्ञानाबाबत सर्वसमावेशक आणि व्यापक असा अहवाल प्रकाशित होणार 


जगभरातील 234 शास्त्रज्ञांकडून अहवालात सहभाग, आयआयटी मुंबईच्या प्राध्यपकांचाही समावेश 


नोव्हेंबर महिन्यात ग्लासगो, स्कॉटलॅंडमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलाच्या परिषदेमध्ये जागातील बलाढ्य नेते एकत्रित येत हवामान बदलामुळे होणारे परिणाम कमी कसे करता येईल, सोबतच ग्रीनहाऊस गॅसेस कमी करण्यावर 
भर देणार आहेत, त्यामुळे त्याआधी प्रकाशित होणाऱ्या या अहवालाला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे


धोरणकर्त्यांना हवामान बदलावर काय उपायनियोजन करायचे याबाबत अहवालात रोडपाथ असणार असल्याचा संयुक्त राष्ट्राचा दावा

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या नियुक्तीवरून सेना खासदार संजय जाधव यांची राष्ट्रवादीवर टीका

परभणीत पुन्हा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत संघर्ष सुरु झाला असून परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या नियुक्तीवरून शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी अखेर मोन सोडले. त्यांच्या बदलीची शिफारस मीच केल्याचे त्यांनी जाहीर भाषणात सांगितले. शिवाय याच नियुक्तीवरून त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केल्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष समोर आला आहे. 


 

उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजी नाट्य, पालकमंत्री छगन भुजबळ नाशिकमध्ये असतांनाही त्यांना निमंत्रण न दिल्याने भुजबळ नाराज

उड्डाणपुलाच्या उदघाटन कार्यक्रमावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजी नाट्य, पालकमंत्री छगन भुजबळ नाशिकमध्ये असतांनाही त्यांना निमंत्रण न दिल्याने भुजबळ नाराज ,


- आज मुख्यमंत्री नाशिकमध्ये होते त्यांच्या हस्तेही फित कापता आली असती घाई का केली माहित नाही, मुळात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, ईतर अधिकारी यांच्या उपस्थितीत सोहळा व्हायला हवा होता असं भुजबळांचं वक्तव्य ,


- काल शिवसेना खासदार हेमंत गोडसेंच्या हस्ते जत्रा हॉटेल ते के के वाघ कॉलेजपर्यंतच्या उड्डाणपुलाचे करण्यात आले होते उदघाटन ,


- पुलाचे अनेक कामही अद्याप अपूर्ण

खासदार संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चाची आज महत्वाची बैठक

पुणे -  खासदार संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चाची आज महत्वाची बैठक,


- बैठकीला राज्यातील समन्वयक, मराठा आरक्षणाचे अभ्यासक उपस्थित राहणार,


- थोड्याच वेळात पुण्यातील महालक्ष्मी लॉन्स याठिकाणी बैठकीला सुरुवात होणार,


- बैठकीनंतर संभाजीराजे मीडियाशी संवाद साधणार आहेत.

आज श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी

 बीड जिल्ह्यातील कोरोणाची रुग्णसंख्या कमी न झाल्याने, जिल्ह्यात अद्यापही शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मंदिर देखील बंद आहेत. याच धर्तीवर आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार असून, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या, परळी येथील प्रभू वैद्यनाथाची महाआरती व पूजा भक्ताविना संपन्न झाली आहे. रात्री 12 वाजता आरती तर सकाळी साडेचार वाजता महापूजा करण्यात आलीय. विशेष म्हणजे गतवर्षी देखील कोरोनामुळे हीच परिस्थिती उद्भवली होती, यामुळे भक्त देखील नाराज झाले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा भक्तांना मंदिरात प्रवेश करून दर्शन घेता येत नसल्याने, मंदिराच्या पायरीची पूजा करण्यासाठी , भक्तांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी करत असल्याचे चित्र मंदिराबाहेर पाहायला मिळतेय.

सलग दुसऱ्या वर्षी 8 वे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिर बंद 

आज श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार, या दिवशी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी सर्वच शिवालयांमध्ये भक्तांची गर्दी होते. त्यातच 12 ज्योतिर्लिंगांचे अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग बंद आहेत. 8 वे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिरही बंदच आहे.आज पहाटे 4 वाजता औंढ्याचे तहसीलदार कृष्णा कानगुले यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली. मंदिर बंद असताना भक्त इथे दर्शनाला येत आहे त्यामुळे भक्तांना बाहेर पायरीचे दर्शन घेऊन परतावे लागत आहे.

महाराष्ट्र भाजपचे सगळे प्रमुख नेते कालपासून दिल्लीत

महाराष्ट्र भाजपचे सगळे प्रमुख नेते कालपासून दिल्लीत,


आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, फडणवीस हे संघटन महामंत्री बी एल संतोष, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत,


अमित शाह काल अहमदाबाद मध्ये असल्याने अद्याप त्यांची भेट झाली नाही, ती आज होण्याची शक्यता,


आज रात्री केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी सगळे खासदार एकत्रित भेटणार आहेत,


त्याच ठिकाणी अमित शाह देखील सहभागी होण्याची शक्यता आहे,

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सागरी सुरक्षेवरील चर्चेच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या (UNSC) उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. 'Enhancing Maritime Security - A Case for International Cooperation' या सागरी सुरक्षेशी संबंधित खुल्या चर्चेचे आयोजन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

समुद्री सुरक्षा वाढवण्यासंदर्भात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत विशेष कार्यक्रम, पंतप्रधान मोदी अध्यक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत असलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) 'समुद्री सुरक्षा वाढवणे - आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी एक कार्यक्रम' या विषयावरील उच्चस्तरीय खुल्या चर्चेचे अध्यक्ष असतील.

पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट 

आज पवित्र श्रावण महिन्याचा पहिला दिवस असलेल्या श्रावणी सोमवार हरिहरा चे प्रतीक मानल्या गेलेल्या विठुरायाच्या मुंबई येथील भक्ताने आकर्षक फुल सजावटीची सेवा अर्पण केली आहे. विठुरायाच्या मस्तकी पिंडी असल्याने वारकरी संप्रदाय याला हरी हरा नाही भेद मानतो. श्रावण महिना महादेवाचा मानला जातो. त्यामुळे विठ्ठल मंदिरात या महिन्यात अनेक धार्मिक परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आल्या आहेत . 


 

पार्श्वभूमी

15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार : मुख्यमंत्री
कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. तिसऱ्या लाटेची टांगती तलवार राज्यावर कायम आहे. त्यामुळे कोरोना थोपवायचा असेल तर नियम पाळावेच लागणार आहे. मात्र, राज्याचं आर्थिक चक्रही चालणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यात, शहरात कोरोना कमी झाला आहे, अशा ठिकाणी निर्बंध शिथिल करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सोबतच 15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यासंदर्भात सोशल मीडियावरून नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोविड काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. 


Pune Unlock : पुणे आजपासून अनलॉक; निर्बंधात शिथिलता, पुणेकरांना दिलासा
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शहरातील सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु राहणार आहेत तर शहरातील हॉटेल्स रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त शनिवारी आणि रविवारी या सर्व गोष्टींना दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शहरातील मॉल्स रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. पण मॉलमध्ये लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. 


शहरातील सर्व हॉटेल चालकांना आणि दुकानदारांना कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जलतरण तलाव वगळता इतर आऊटडोअर खेळांना परवानगी देण्यात आली आहे तसेच पुण्यातील उद्यानंही त्यांचा वेळेनुसार सुरु राहणार आहेत. 


Maharashtra Corona Cases: राज्यात काल 4,895 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 5,508 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होत आहे. काल  4, 895 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 508 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 44 हजार 388 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.71टक्के आहे. 


राज्यात काल  151 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल  32 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 71  हजार 510 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  नंदूरबार (8), धुळे (3), हिंगोली (81), अमरावती (82), वाशिम (91), भंडारा (0) या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 458अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.