Breaking News LIVE : राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

Breaking News LIVE Updates, 06 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Aug 2021 09:52 PM
राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट! दिवसभरात 5 हजार 539 नवीन रुग्णांची नोंद तर 5 हजार 859 रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतर डिस्चार्ज. आज 187 कोरोना रुग्णांचा मृत्यू.

नाशिक जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटचा शिरकाव, 30  रुग्ण आढळून आल्याने खळबळ, 155 सॅपल्स पाठवले होते तपासणीला त्यापैकी 30 जणांना डेल्टा व्हेरियन्ट

नाशिक जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटचा शिरकाव, 30  रुग्ण आढळून आल्याने खळबळ, 155 सॅपल्स पाठवले होते तपासणीला त्यापैकी 30 जणांना डेल्टा व्हेरियन्ट, ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण, जिल्ह्यातील नांदगाव, सिन्नर, येवला, कळवण या तालुक्यात आढळले तर नाशिक शहरात 2 रुग्ण, सर्व रुग्ण,आरोग्य यंत्रणांच्या निगराणीखाली, ज्या गावात रुग्ण आढळले तिथे अधिक खबरदारी घेतली जाणार

कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठारवरून चारचाकी गाडी खोल दरीत कोसळली, चारचाकी मधील दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठारवरून चारचाकी गाडी खोल दरीत कोसळली, चारचाकी मधील दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती, मसाई पठारावर फिरण्यासाठी गेल्यानंतर घडला अपघात, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू

मला लोकांचा जीव महत्वाचा आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हॅाटेल मालकांना ठणकावलं

मला लोकांचा जीव महत्वाचा आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हॅाटेल मालकांना ठणकावलं, आठवड्याभरात परिस्थिती पाहुन निर्णय घेईन, मुख्यमंत्र्यांचं हॅाटेल मालकांना आश्वासन, हॅाटेल्सच्या मालक संघटनांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट 

राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार, याबाबत निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक

राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार, याबाबत निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक, सध्या आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत 

अकरावी सीईटीला विरोध करणाऱ्या याचिकेवर हायकोर्टात अंतिम सुनावणी सुरू, राज्य सरकार 21 ऑगस्टच्या सीईटीवर ठाम, याचिका फेटाळण्याची मागणी

अकरावी सीईटीला विरोध करणाऱ्या याचिकेवर हायकोर्टात अंतिम सुनावणी सुरू, राज्य सरकार 21 ऑगस्टच्या सीईटीवर ठाम, याचिका फेटाळण्याची मागणी, राज्यात अजूनही कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे उठलेले नाहीत, मुंबईत लोकल ट्रेनमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश नाही मग सीईटी कशी घेणार?, विद्यार्थी प्रवास कसा करणार? हायकोर्टाचा सवाल, सर्व विद्यार्थ्यांचं लसीकरणही पूर्ण झालेलं नाही मग त्यासाठी काय तयारी केलीत? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

सीएसआर फंडातून राज्य सरकार 471 शासकीय शाळांचं करणार परिवर्तन

सीएसआर फंडातून राज्य सरकार 471 शासकीय शाळांचं करणार परिवर्तन, आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि 40 नामांकित कंपन्यांचे उद्योजक होते उपस्थित. पहिल्या टप्प्यात सीएसआर फंडातून 471 शाळांचं होणार परिवर्तन, या शाळांमध्ये अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, इमारत आणि इतर सुविधा असणार उपलब्धस, सीएसआर फंडामुळे शासकीय शाळांचा चेहरामोहरा बदलणार?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दौऱ्याचा फटका

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दौऱ्याचा फटका पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयालाही बसला असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या परिसरात असलेले हे महाविद्यालय आज बंद राहिले तर तब्बल दोनशे मुक्या जनावरांना चारापाण्याअभावी त्रास सोसावा लागला. 'वनामकृवि'च्या प्रशासनाने या दौऱ्यादरम्यान केलेल्या अक्षम्य हलगर्जीपणाची कैफियत सहयोगी अधिष्ठाता नितीन मार्कंडेय यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सलग तिसऱ्या दिवशी पुण्यातील व्यापाऱ्यांकडून आपली दुकानं चार नंतरही सुरु, व्यापारी आपल्या आंदोलनावर ठाम

सलग तिसऱ्या दिवशी पुण्यातील व्यापाऱ्यांकडून आपली दुकानं चार नंतरही सुरु, व्यापारी आपल्या आंदोलनावर ठाम

हिंगोली जिल्ह्यात राज्यपालांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात, ब्रेक न लागल्याने अग्निशमन दलाच्या गाडीची 2 गाड्यांना धडक

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी हिंगोली जिल्ह्यात असताना त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झालाय. हिंगोलीतुन नरसीकडे त्यांचा ताफा जात असताना त्यांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या गाडीचे ब्रेक लागले नाही आणि गाडी समोरच्या दोन गाड्यांवर धडकली. त्यामुळे या दोन गाड्यांचा किरकोळ नुकसान झाले. कोणालाही दुखापत झालेली नाही.

सरकारी कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवासासाठी परवानगी मिळावी यासाठी राज्य सरकारचं रेल्वेला पत्र

सरकारी कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवासासाठी परवानगी मिळावी यासाठी राज्य सरकारचं रेल्वेला पत्र,


 राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्यासाठी तिकीट अथवा पास देण्याची रेल्वेकडे मागणी,


 ज्या कर्मचाऱ्यांकडे अधिकृत शासकीय ओळखपत्र आहे त्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारने रेल्वेकडे केली आहे ,


त्यामुळे रेल्वे यासंदर्भात कधी आणि कसा निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कृष्णकुंजवर राज ठाकरे यांच्या भेटीला

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कृष्णकुंजवर राज ठाकरे यांच्या भेटीला, युती झाली नाही तरी मैत्री राहील, भेटीच्या आधी चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

तळीये दरड दुर्घटनेतील जखमी महिलेचा मृत्यू

महाड येथील तळीये दरड दुर्घटनेतील जखमी महिलेचा मृत्यू झाला. संगीता कोंडाळकर असं या मृत महिलेचं नाव आहे. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. तळीये येथील दुर्घटनेत एकूण 85 रहिवाशांचा मृत्यू झाला. 

मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडेंना भेटणं हे लोकशाहीला हरताळ फासणारं, नरसय्या आडम यांचा आरोप

पूरग्रस्त सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट झाली होती. याभेटी दरम्यान संभाजी भिडे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंद खोलीत चर्चा केली. यावर आक्षेप घेत सोलापूर येथील माजी आमदार व माकप नेते नरसय्या आडम यांनी तीव्र विरोध केला असून मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडेंना भेटणे ही लोकशाहीला, पुरोगामी चळवळीला हरताळ फासणारी गोष्ट आहे, अशी प्रखर टीका केली.

बुलढाण्यात जिल्ह्यात पाणीटंचाई उद्भवणार, सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात फक्त 22 टक्के साठा

बुलढाणा : जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या यळगाव धरणात केवळ 22 टक्के जलसाठा शिल्लक असल्याने जिल्ह्याच्या मुख्यालयी संभाव्य पाणी टंचाई भासनार असल्याचे चित्र आहे. बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या यळगाव धरणातील जलसाठयात कमालिची घट झाली आहे. पावसाळ्याचे दोन महीने उलटून गेले आहेत बुलढाणा तालुक्यात दमदार असा पाऊस पडलाच नाही, त्यामुळे तालुक्यातील कोणत्याच नदिला पूर आला नाही आणि यलगाव धरणाला मिळणारी नदी पैनगंगा असून नदिला एकही पुर गेला नाही. त्यामुळे धरणातील पानी पातळी खोल गेली असून शहरवासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात अध्याप फक्त 44.5 टक्केच पाऊस पडला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज हिंगोली,परभणी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी साधणार संवाद

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. कालचा दिवस वादात गेल्यानंतर आज ते हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. सकाळी 9 वाजता राज्यपालांचा ताफा हा हिंगोलीकडे प्रयाण करणार आहे. सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ते हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर थांबणार असून तिथेच ते जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. दुपारी 2 वाजता ते परभणीकडे निघतील 4 ते 6 या वेळेत राज्यपाल परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विश्रामगृहात जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून मुक्कामी निघणार आहेत.

बुलढाण्यात धावत्या रेल्वेत महिलेला 8 लाख रुपयांना लुटणाऱ्याला रेल्वे पोलिसांनी केलं जेरबंद

नवजीवन एक्स्प्रेस ने प्रवास करणाऱ्या जमुनादेवी राजपुरोहित या महिलेला आठ लाख रुपयांनी लुटणाऱ्या  युवकांला शेगाव रेल्वे पोलिसांनी यवतमाळमधून मोठ्या प्रयत्नाने जेरबंद केलंय. धावत्या रेल्वेत प्रवासी झोपले असताना त्यांच्या बॅग्स किंवा सामान हे भामटे चोरून नेत असत. भुसावळ ते शेगाव दरम्यान 27 एप्रिल रोजी प्रवास करणाऱ्या राजपुरोहित या महिलेची पायाजवळ ठेवलेली बॅग या युवकांनी लांबविली होती ज्यात आठ लाख रुपयांचा मुद्देमाल होता. एकाला पोलिसांनी अटक केली असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

पार्श्वभूमी

राज्यात काल 6695 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 7120 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात काल 6695 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 120 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 17 हजार 560 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के झाले आहे. 


राज्यात काल कोरोनामुळे 120 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 34 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 74  हजार 995 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (10), हिंगोली (76), अमरावती (87), वाशिम (94),  गोंदिया (95), गडचिरोली (31)   या सात जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 974अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


वरुण सरदेसाई युवासेनाप्रमुख होणार? राजकीय वर्तुळात चर्चा
युवासेनेला नवा सरसेनापती मिळणार असल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरे मंत्रिपदाच्या कामात व्यस्त असल्यानं त्यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेचं प्रमुखपद दिलं जाईल अशी चर्चा आहे. ठाकरे कुटुंबाबाहेर पहिल्यांदाच महत्वाचे पद जाणार आहे. गेले काही दिवस वरुण सरदेसाई यांनी महाराष्ट्रभरात दौरे सुरु केलेत. येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर तरुणांची फौज शिवसेनेच्या मागे उभी करण्याचा प्रयत्न युवासेनेकडून सुरू आहे. पण आदित्य ठाकरे मंत्रिपदी व्यस्त असल्यानं युवासेनेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेची जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झालीय.


येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा विचार : उदय सामंत
राज्यात कोरोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. अनेक ठिकाणी शाळा सुरु झाल्या आहेत. आता कॉलेज सुरु होण्यासंदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असं उदय सामंत यांनी सांगितलं. बुधवारी कुलगुरूंची बैठक पार पडली. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे, त्यामुळे प्रत्यक्ष कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे. प्रत्येक विभागात कुलगुरुंना जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून कोरोनाचा आढावा घ्यायला सांगितला आहे. संपूर्ण स्थितीचा आढावा 15 दिवसात प्राप्त होईल. त्यामुळे 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असं उदय सामंय यांनी सांगितलं. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.