Breaking News LIVE : मुंबईच्या एका प्रसिद्ध अॅप चॅनलच्या मालकावर विनयभंगचा गुन्हा दाखल

Breaking News LIVE Updates, 5 August 2021: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Aug 2021 10:32 PM
मुंबईच्या एका प्रसिद्ध अॅप चॅनलच्या मालकावर विनयभंगचा गुन्हा दाखल

मुंबईच्या एका प्रसिद्ध अॅप चॅनलच्या मालकावर विनयभंगचा गुन्हा दाखल. उल्लू डिजिटल प्रा.लि. कंपनीचे सीईओ विभु अग्रवाल आणि कंपनीच्या कंट्री हेड अंजली रैना यांच्यावर गुन्हा दाखल. कंपनीच्या अंधेरी  कार्यालयच्या स्टोअर रूममध्ये 28 वर्षीय लिगल अॅवायझर मुलीला स्टोर रूममध्ये घरच्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन कपडे काढून आरोपींनी समोरच अंतवस्र घालण्यास भाग पाडल्याचा तरूणीचा आरोप. 18 जूनची घटना असून अंबोली पोलिसांनी बुधवारी नोंदवला गुन्हा.

मुंबईच्या एका प्रसिद्ध अॅप चॅनलच्या मालकावर विनयभंगचा गुन्हा दाखल
मुंबईच्या एका प्रसिद्ध अॅप चॅनलच्या मालकावर विनयभंगचा गुन्हा दाखल, उल्लू डिजिटल प्रा.लि. कंपनीचे सीईओ विभू अग्रवाल आणि कंपनीच्या कंट्री हेड अंजली रैना यांच्यावर गुन्हा दाखल, कंपनीच्या अंधेरी  कार्यालयच्या स्टोअर रूममध्ये 28 वर्षीय मुलीला घरच्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन कपडे काढून आरोपींनी समोरच अंतवस्र घालण्यास भाग पाडल्याचा तरूणीचा आरोप
भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सकाळी 11.30 वाजता भेट घेणार

भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सकाळी 11.30 वाजता भेट घेणार. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परीषदेत राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याच स्पष्ट केल होतं. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

नाशिक : वेळ वाढवून द्या या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या नाशिकमधील रेस्टॉरंट चालकांवर पोलिसांची कारवाई

नाशिक : वेळ वाढवून द्या या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या नाशिकमधील रेस्टॉरंट चालकांवर पोलिसांची कारवाई, 13 व्यावसायिकांवर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल, मनाई आदेश असतांना कोरोना काळात आंदोलन केले, महाराष्ट्र सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याप्रकरणी कारवाई, रेस्टॉरंट चालक संतप्त

पुण्यात आज सलग दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली

पुण्यात आज सलग दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली. राज्य सरकारने पुणे शहराचे निर्बंध शिथिल न केल्याने व्यापारी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आज 4 वाजल्यानंतर पुणे शहरातील लक्ष्मी रोडवरती व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली आहेत. काल महापालिका आणि पोलिसांनी दुकानावर दंडात्मक कारवाई केली होती.

मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून 22 जुलैपासून ठप्प झालेला आंबा घाट आजपासून सुरु

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून 22 जुलैपासून ठप्प झालेला आंबा घाट आजपासून सुरु झाला आहे. त्यामुळे आता कोल्हापूर आणि कोकणला विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यादरम्यानची वाहतूक सुरु झाली आहे. मुख्य बाब म्हणजे, केवळ लहान वाहनांसाठी हा घाट सुरु झाला असून अवडज वाहनांना मात्र बंदी आहे. शिवाय, अवजड वाहनांचा प्रवेश होऊ नये यासाठी घाटात लोखंडी कमान उभारली गेली आहे. 


 
बेळगावात महिलेला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या मुख्याध्यापकाला चोप

अश्लील मेसेज पाठवणारा मुख्याध्यापक कित्तूर तालुक्यातील देगाव येथील सरकारी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक आहे. तर महिला  कित्तूर तालुक्यातील बैलुर येथे सरकारी दवाखान्यात नर्स म्हणून सेवा बजावत आहे. मुख्याध्यापकाने अश्लील मेसेज नर्सला पाठवल्यावर सदर नर्सने ही घटना गावातील लोकांना सांगितली. घटना कळल्यावर संतप्त गावकरी आणि नर्स शाळेकडे गेले. शाळेत जावून ग्रामस्थ आणि नर्सने मुख्याध्यापकाला जाब विचारला. यावेळी नर्स आणि ग्रामस्थांनी मुख्याध्यापकाला चांगला चोप दिला.यावेळी एका संतप्त ग्रामस्थांनी मुख्याध्यापकावर खुर्ची फेकली. यावेळी सुदैवाने दुसऱ्या ग्रामस्थांनीने खुर्ची अडकल्याने मुख्याध्यापकाला खुर्ची लागली नाही. यावेळी शाळेत आरडाओरडा आणि गोंधळ सुरु होता. अखेर मुख्याध्यापकाने माफी मागितल्यावर या प्रकरणावर पडदा पडला. 

येवला तालुक्यातील धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद, ग्रामस्थांनी टाकला सुटकेचा निश्वास

येवला तालुक्यातील काही गावांत धुमाकूळ घालत जनावरे फस्त करणारा बिबट्या आज सकाळच्या सुमारास साताळी परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय. 3 दिवसांपूर्वी हा बिबट्या महालखेडे येथे उसाच्या शेतात दिसला होता. त्यामुळे वनविभागाने साताळी येथे पिंजरा लावला असता बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. 

घाटकोपरमध्ये भर रस्त्यात टेबल मांडून जंगी वाढदिवस आणि तरुणांची हुल्लडबाजी, गुन्हा दाखल

एकीकडे अजूनही कोरोनाचे संकट मुंबईवर असताना घाटकोपर येथील एलबीएस मार्गावर असलेल्या पंकेशहा दर्गा समोर मोठ्या संख्येने हुल्लडबाज तरुण एकत्र आले आणि यातीलच एकाच वाढदिवस भर रस्त्यावर साजरा करीत धिंगाणा घातल्याचे समोर आले आहे. यावेळी त्यांनी तीसपेक्षा जास्त केक रांगेत लावून ते कापले आणि याच केकची नंतर फेकाफेक देखील करीत इथे अक्षरशः हुल्लडबाजी केली. यावेळी एकाने ही मास्क लावलेला नव्हता. तर सोशल डिस्टन्स आणि एकूणच कोरोनाबाबतच्या नियमांचा इथे फज्जा उडाला होता. याचे व्हिडीओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणत व्हायरल झाल्यानंतर आता पार्क साईट पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे तरुण याच परिसरात रहात असून त्यांचा आता सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलीस शोध घेत आहेत. मात्र यामुळे एकीकडे कोरोनाचे संकट नागरिकांनी योग्यपद्धतीने नियमांचे पालन केल्याने कमी होत असताना दुसरीकडे अश्यां प्रकारे या तरुणांनी केलेल्या हुल्लडबाजी मुळे हे संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे.त्या मुळे या तरुणांवर कडक कारवाई ची मागणी होत आहे.

बिबी येथील जवान किशोर दत्तात्रेय काळुसे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

सिंदखेडराजा तालुक्यातील बिबी या गावातील रहिवासी जवान किशोर काळूसे यांचा आपली सेवा बजावताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे . जवान किशोर काळूसे हे 4 ऑगस्ट रोजी अहमदनगर येथील मिलिट्री कॅम्प मध्ये कर्तव्य बजावत असताना दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत्युसमयी त्यांचे वय 32 वर्ष होते.


जवान किशोर काळूसे हे वयाच्या 19 व्या वर्षी 2019 मध्ये सैन्यात भरती झाले होते. त्यांनी सिलिगुडी व पंजाब मधील जालंदर येथे देश सेवा केली त्यानंतर 2019 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर येथील मिलिट्री कॅम्प मध्ये त्यांची बदली झाली.  

राज्य सरकार तयारी दाखवेल त्याक्षणी लोकलला परवानगी द्यायला तयार- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे

मुंबई लोकलबाबत राज्य सरकारने लोकांच्या मागण्यांचा विचार करावा,


कोर्टाचा दट्ट्या लागण्याची वेळ येऊ देऊ नये..


ज्या क्षणी राज्य सरकार तयारी दाखवेल त्याक्षणी केंद्रीय रेल्वेमंत्री लोकलला परवानगी द्यायला तयार आहे, मुंबई लोकल वर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांचं वक्तव्य

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे नांदेड विमानतळावर आगमन

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे नांदेड विमानतळावर आगमन, स्वागतासाठी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर,नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने,एसआरटी चे कुलगुरू डॉ उद्धव भोसले या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह  महापौर मोहिनी येवनकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगराणी अंबुलगेकर,यांच्यासह भाजप आमदार राजेश पवार यांची उपस्थिती

भारतानं गमावला पेनल्टी कॉर्नर

भारत आणि जर्मनी यांच्या हॉकीचा सामना सुरु झाला आहे. सामन्याच्या फर्स्ट क्वार्टरमध्ये भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. परंतु, या पेनल्टी कॉर्नरवर भारतीय संघ गोल डागू शकला नाही. 

परप्रांतीय प्रवाशांवर निर्बंध नाहीत, मग लोकल प्रवाशांवर का?

मुंबईत जरी लोकल प्रवासावर निर्बंध असले तरी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून आणि देशाच्या कोणत्याही राज्यातून प्रवासी रेल्वेनं मुंबईत दाखल होऊ शकतात. अशा सर्व प्रवाशांची रेल्वेस्थानकांवर चाचणी करणं बंधनकारक आहे. मात्र गेले काही दिवस या चाचण्या होत नाहीत. त्यामुळे त्यांना covid-19 ची लागण झाली आहे की, नाही हे देखील समजू शकत नाही. तरीही या परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकारनं आणलेले नाहीत. पण दुसरीकडे मुंबईत आणि आसपासच्या महानगरांमध्ये लाखो नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकलनं प्रवास करु द्या, असं टास्क फोर्सनं देखील सांगितलं आहे. मात्र तरीही सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमध्ये जाण्यावर बंदीच आहे. हा दुजाभाव सरकार का करतंय? असा सवाल उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी विचारला आहे. बाहेरून येणाऱ्या सर्व प्रवाशांना कोणत्याही निर्बंधांशिवाय प्रवास केला जाऊ शकतो. तर आम्हाला देखील लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी सर्वसामान्य प्रवासी करत आहेत.

पार्श्वभूमी

Mumbai Local : परप्रांतीय प्रवाशांवर निर्बंध नाहीत, मग लोकल प्रवाशांवर का?


सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा अजूनही देण्यात आलेली नाही. मात्र दुसरीकडे अनेक राज्यातून हजारो प्रवासी रोज मुंबईत दाखल होत आहेत. या प्रवाशांची चाचणी होणं अपेक्षित असले तरी, रेल्वे स्थानकांवर ही चाचणी होत नाही. मग मुंबई आणि आसपासच्या शहरात लाखो लोकांचं लसीकरण झालं असूनही त्यांना प्रवासाची मुभा का नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. 


मुंबईत जरी लोकल प्रवासावर निर्बंध असले तरी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून आणि देशाच्या कोणत्याही राज्यातून प्रवासी रेल्वेनं मुंबईत दाखल होऊ शकतात. अशा सर्व प्रवाशांची रेल्वेस्थानकांवर चाचणी करणं बंधनकारक आहे. मात्र गेले काही दिवस या चाचण्या होत नाहीत. त्यामुळे त्यांना covid-19 ची लागण झाली आहे की, नाही हे देखील समजू शकत नाही. तरीही या परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकारनं आणलेले नाहीत. पण दुसरीकडे मुंबईत आणि आसपासच्या महानगरांमध्ये लाखो नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकलनं प्रवास करु द्या, असं टास्क फोर्सनं देखील सांगितलं आहे. मात्र तरीही सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमध्ये जाण्यावर बंदीच आहे. हा दुजाभाव सरकार का करतंय? असा सवाल उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी विचारला आहे. बाहेरून येणाऱ्या सर्व प्रवाशांना कोणत्याही निर्बंधांशिवाय प्रवास केला जाऊ शकतो. तर आम्हाला देखील लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी सर्वसामान्य प्रवासी करत आहेत.


Tokyo Olympics 2020 : भारतीय पुरुष हॉकी संघ कांस्य पदकासाठी, तर रवि दाहिया सुवर्णपदकासाठी मैदानात; आजचं शेड्यूल काय?


Tokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाच्या सुवर्णपदकाच्या आशा मावळल्या असल्या तरी, आजचा दिवस अत्यंत खास असणार आहे. कारण आज पहिलवान रवि दाहिया सुवर्णपदक, तर भारतीय पुरुष हॉकी संघ कांस्य पदकावर नाव कोरण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. 


यासोबतच आज दीपक पुनिया, विनेश फोगाट यांच्यावरही साऱ्यांच्या नजरा असतील. तसेच आज ज्या सामन्यावर साऱ्या भारतीयांच्या नजरा लागल्या आहेत, तो म्हणजे, पुरुषांची फ्री स्टाईन कुस्तीचा 57 किलोग्राम वर्ग. रवि दाहिया अंतिम सामन्यात रशियाच्या ऑलिम्पिक कमिटीच्या वतीनं यंदा टोकियोत खेळणाऱ्या पहिलवान जावूर उगुएवच्या विरोधात मैदानावर उतरणार आहे. 


रवि दाहियाकडून देशाला सुवर्णपदकाच्या अपेक्षा 


या सामन्यात भारताकडे टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. रवि दाहिया सध्या फॉर्मात असल्याचं पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशाला सोनीपतच्या नाहरी गावात राहणाऱ्या या पहिलवानाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. हा सामना दुपारी 3 वाजून 45 मिनिटांच्या आसपास सुरु होईल. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.