Breaking News LIVE : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप कार्यालयाची तोडफोड करणारे शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना नाशिक पोलिसांकडून अटक

Breaking News LIVE Updates, 28 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Aug 2021 07:25 PM
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप कार्यालयाची तोडफोड करणारे शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना नाशिक पोलिसांकडून अटक

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप कार्यालयाची तोडफोड करणारे शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना नाशिक पोलिसांकडून अटक.

एसटी कर्मचारी कमलेश बेडसे यांच्या आत्महत्येनंतर राज्य परिवहन महामंडळाविरोधात आंदोलन करणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांवरच साक्री पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा

एसटी कर्मचारी कमलेश बेडसे यांच्या आत्महत्येनंतर राज्य परिवहन महामंडळाविरोधात आंदोलन करणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांवरच साक्री पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा.

रत्नागिरीतही भाजपच्या आयोजक, संयोजकांवर गुन्हा दाखल

रत्नागिरीतही भाजपच्या आयोजक, संयोजकांवर गुन्हा दाखल, 


 

नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी व कोरोनाचे नियम उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आयोजक संयोजकावर गुन्हा दाखल,

 

 

भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्यासह 8 ते 10 व्यक्तींवर गुन्हे दाखल 

 
भाजप कार्यालय तोडफोड प्रकरणी दीपक दातीर, बाळा दराडेंसह दोन जणांना नाशिक पोलिसांकडून अटक

भाजप कार्यालय तोडफोड प्रकरणी दीपक दातीर, बाळा दराडेंसह दोन जणांना नाशिक पोलिसांकडून अटक

पिंपरी चिंचवडमध्ये दुमजली घराचा भाग कोसळला, 13 वर्षीय मुलगी ढिगाऱ्याखाली अडकली

पिंपरी चिंचवडमध्ये दुमजली घराचा भाग कोसळला. 13 वर्षीय मुलगी ढिगाऱ्याखाली अडकली. आई-वडील आणि तिची बहीण सुखरूप बाहेर निघाले. सकाळी नऊ च्या सुमारास ही घटना फुगेवाडी येथे घडली. अग्निशमन दल आणि भोसरी पोलिसांकडून बचावकार्य सुरू. अनेक वर्षांपूर्वीच बांधकाम होतं, त्यामुळं ही दुर्घटना घडली असल्याचा अंदाज.

बार्शीच्या मुख्य बाजारपेठेत एकाच रात्रीत जवळपास 8 दुकानात दरोडा

बार्शीच्या मुख्य बाजारपेठेत एकाच रात्रीत जवळपास 8 दुकानात दरोडा,


रात्री 3 च्या सुमारास शटर उचकटून चोऱ्या, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद, हजारोंचा माल लंपास, पोलिसांकडून शोध सुरू

कोकणातील जनआशीर्वाद यात्रा गाजत आहे आणि का गाजत आहे हे सर्वांना माहिती - उदय सामंत

कोकणातील जनआशीर्वाद यात्रा गाजत आहे आणि का गाजत आहे हे सर्वांना माहीत आहे.. आम्ही मंत्री असलो तरी शिवसैनिक ही आहोत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत.. त्यांच्यावर कोणी टीका करणार असेल तर उत्तर दिला जाईल... जशी ॲक्शन असेल तशीच रिॲक्शन येणार... काल मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते भेटले आहेत.. जर महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात त्यात चर्चा झाली असेल... ओबीसी आरक्षण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा झाली असेल.. तर ही चांगली बाब आहे... हेच महाराष्ट्राला अपेक्षित आहेत...कोणा सोबत युती करावी, कोणासोबत सरकार बनवावं, कोणासोबत सरकार बनवू नये, याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना आहेत... ते जे निर्णय घेतील ते सर्व शिवसैनिकांना मान्य असेल-  उदय सामंत

दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेचं मंगळसूत्र लांबवले

अंबरनाथ पश्चिमेच्या खुंटवली परिसरात दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका दुकानदार महिलेचं मंगळसूत्र लांबवल्याचा प्रकार घडला. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये झाली कैद झाली आहे. दूध आणि बिस्कीट घेण्याचा बहाणा करून चोरटे मंगळसूत्र खेचून पळाले. या प्रकरणी अंबरनाथ पोलिस गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही च्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेत चोरांची हातसफाई, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांना फटका

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेत चोरट्यांच्या टोळक्याने हातसफाई करत रोख रक्कमेसह  सोन्याचे दागिने असा लाखोंचा ऐवज हातोहात लांबवला. खारेपाटण येथील राणेंच्या स्वागतादरम्यान भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या खिशातील पाकीट लांबवले. काळसेकर यांच्या पाकिटात 40 ते 45 हजार रुपयांची रोकड होती. तर रत्नागिरीतही राणेंच्या स्वागतादरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरांनी हातसफाई करत रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने लांबवण्याचा प्रकार घडला.

पार्श्वभूमी

झोपडपट्टी पुनर्वसनच्या नावाखाली बँकांचे तब्बल 40 हजार कोटींचे कर्ज विकासकांनी थकवलं
दाटीवाटीच्या मुंबई शहरात वसलेल्या झोपडपट्टीला मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणली. मात्र या योजनेची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे अनेक कुटुंबांना बेघर होण्याची वेळ आली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी आढावा बैठक पार पडली. या बैठकीला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्याचे मुख्य सचिव, म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 


मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकासाचे जे प्रकल्प रखडलेले आहेत, त्या विकासकांनी विविध बॅंकांकडूनजवळपास 40 हजार कोटी कर्ज घेतलेलं आहे. मात्र ज्या कारणासाठी हे कर्ज घेतलेलं होत त्याचा उपयोग या प्रकल्पासाठी करण्यात आला नसून इतर ठिकाणी हे पैसे वापरले असल्याचं ही निदर्शनास आलं असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे. या सर्व विकासकांवर कारवाई केली जाणार आहे.


NEET परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षा ठरल्या तारखेलाच होणार
राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET) 2021 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी हजारो विद्यार्थी करत होते. मात्र, राष्ट्रीय चाचणी एजन्सीने शुक्रवारी स्पष्ट केलं की NEET पुढे ढकलली जाणार नाही. परीक्षा रविवारी (12 सप्टेंबर) ठरल्याप्रमाणे आयोजित केली जाईल. एनटीएचे डीजी विनीत जोशी म्हणाले, की "सीबीएसई बोर्डाच्या (CBSE board) परीक्षांशी नीटचा संबंध येत नाही. त्यामुळे परीक्षा 12 सप्टेंबर रोजी ठरल्यानुसार आयोजित केली जाईल." NEET मध्ये प्रयत्न वाढवण्याबाबत NTA अधिकारी म्हणाले, की “NEET मध्ये अनेक प्रयत्नांबाबत निर्णय आरोग्य मंत्रालय घेईल. वैद्यकीय प्रवेशाचे प्रयत्न वाढवण्याची कोणतीही योजना नाही ”


याआधी, एका अग्रगण्य दैनिकाशी बोलताना, शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी असेही ठामपणे सांगितले आहे की NEET-UG तारखांमध्ये बदल केल्याने लॉजिस्टिक समस्यांमुळे परीक्षा कमीतकमी 2 महिने पुढे ढकलली जाईल आणि इतर अनिश्चिततेमुळे विलंब होऊ शकतो.


तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाचे शानदार प्रदर्शन; रोहितचं अर्धशतक, पुजारा शतकाच्या उंबरठ्यावर
 भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळल्या जाणाऱ्या  हेंडिग्ले येथे तिसऱ्या कसोटीच्या  तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस  २ बाद 215 धावांपर्यंत भारताने मजल मारली.  वातावरण खराब असल्याने आजचा सामना वेळेपूर्वीच थांबवण्यात आला.  चेतेश्वर पुजारा 15 चौकारांसह 91  तर विराट कोहली 6 चौकारांसह  45 धावांवर नाबाद होते. 


भारताची दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर केएल राहुलची  क्रेग ओव्हर्टनने आठ धावांवर  तंबूचा मार्ग दाखवला. तर रोहित शर्माने 156 बॉलमध्ये  59 धावा केल्या.  ओली बॉबिन्सन रोहित तंबुत माघारी धाडले. रोहितनंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला. त्याने पुजारासोबत  99 धावांची भागीदारी केली. रोहित बाद झाल्यानंतर पुजाराचे अर्धशतक झाले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.