Breaking News LIVE : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Breaking News LIVE Updates, 27 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Aug 2021 08:57 PM
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावी बोर्डाची पुरवणी परीक्षा 22 सप्टेंबर पासून सुरु होणार असून 10 ऑक्टोंबरपर्यंत ही परीक्षा असेल. बारावी बोर्डाची पुरवणी परीक्षा 16 सप्टेंबरपासून सुरू होऊन 11 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. जे विद्यार्थी दहावी ,बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाही, तसेच एटीकेटी साठी पात्र विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल.

राज्यातील विमानतळांसंदर्भात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले पत्र

महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या कामांबाबत नागरिक उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले. पत्रात अकोला विमानतळासाठी आवश्यक उर्वरित जमीन त्वरित द्यावी, औरंगाबाद विमानतळासाठी आवश्यक असलेली 182 एकर जमीन द्यावी,  गोंदिया, कोल्हापूर विमानतळासाठीही आवश्यक जमीन द्यावी, अमरावती, रत्नागिरी विमानतळाचा विकास करावा, सोलापूर विमानतळाच्या आड येणारी चिमणी पाडावी यासह अनेक अन्य गोष्टींचाही पत्रात उल्लेख केला आहे.

चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीचं निधन

सीमाभागातल्या लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेले चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींचं  आज वृद्धापकाळाने निधन झालं. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातल्या नूल गावी त्यांची प्राणज्योत मालवली.  सुरगीश्वर मठाचे ते मठाधीपती होती.

पासबुक, चेकबुक हरवल्यास अॅफिडेव्हिटची मागणी बेकायदेशीर, मुंबई पोलीस आयुक्तांनी काढले परिपत्रक

पासबुक, चेकबुक, ड्रायव्हिंग लायसन किंवा अन्य महत्वाची कागदपत्रं हरवल्यास पोलीस तक्रार केली जाते. मात्र कधी कधी पोलीस अशा वस्तू हरवल्याचं अॅफिडेव्हिट आणण्यास सांगतात. हे बेकायदेशीर असून  याची मागणी करणाऱ्यावर आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी काढले परिपत्रक

गोंदियात एसटीच्या तिकीट वेंडिंग मशीनचा स्फोट, महिला वाहकाच्या हाताला इजा

गोंदियात एसटीच्या तिकीट वेंडिंग मशीनचा स्फोट, महिला वाहकाच्या हाताला इजा , मशीनच्या अनेक तक्रारी येत असताना ही गंभीर घटना,  

11 प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर 

दुसऱ्या गुणवत्ता यादीत या विद्यार्थ्यांना सामील करून घेतल्यास कट ऑफ मध्ये वाढ होण्याची शक्यता


मुंबई विभागात 1,17,883 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज प्राप्त झाले आहे 
मुंबई विभागात एकूण अर्ज भरल्यापैकी 61.69 टक्के विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहेत


मुंबई विभागात 48,788 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे


मुंबईत सायन्स 40,354, कॉमर्स 65028, आर्टस् 11768 शाखेसाठी  विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत कॉलेज मिळाले आहेत



11 प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर 
मुंबईतील नामांकित महाविद्यालयांचे कट ऑफ - 


एच आर कॉलेज - 
कॉमर्स -93.4 टक्के


के सी कॉलेज
आर्टस् - 88.2 टक्के
कॉमर्स -91.4 टक्के
सायन्स - 90 टक्के


जय हिंद कॉलेज
आर्टस् - 91.6 टक्के
कॉमर्स - 92 टक्के
सायन्स - 89  टक्के


रुईया कॉलेज
आर्टस् - 93 टक्के
सायन्स - 93.4 टक्के


रुपारेल कॉलेज
आर्टस् - 88 टक्के
कॉमर्स -90.4 टक्के
सायन्स - 91.6टक्के


मिठीबाई कॉलेज
आर्टस् - 89.6 टक्के
कॉमर्स -91.6टक्के
सायन्स - 90 टक्के


वझे केळकर कॉलेज
आर्टस् - 89 टक्के
कॉमर्स -91.8 टक्के
सायन्स - 93.6 टक्के


झेवीयर्स कॉलेज
आर्टस् - 95.2 टक्के
सायन्स - 92.8 टक्के


एन एम कॉलेज - 
कॉमर्स -94 टक्के


पोदार कॉलेज -
कॉमर्स - 92.8 टक्के

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, मुंबईत नामांकित कॉलेज कट ऑफ नव्वदी पार

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर


मुंबईत नामांकित कॉलेज कट ऑफ नव्वदी पार


मागच्या वर्षीच्या तुलनेत कॉलेज कट ऑफ मध्ये फारसा फरक नाही


40 हजार विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग 2 न भरल्याने पहिल्या गुणवत्ता यादीत मागील वर्षीच्या तुलनेत कॉलेजच्या कट ऑफ मध्ये फारसा फरक नाही


दुसऱ्या गुणवत्ता यादीत या विद्यार्थ्यांना सामील करून घेतल्यास कट ऑफ मध्ये वाढ होण्याची शक्यता


मुंबई विभागात 1,17,883 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज प्राप्त झाले आहे 
मुंबई विभागात एकूण अर्ज भरल्यापैकी 61.69 टक्के विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहेत


मुंबई विभागात 48,788 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मालमत्ता ईडीने केली जप्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. लोणावळा आणि जळगाव येथील ही मालमत्ता असून ती 5 कोटी 73 लाख रुपयांची असल्याची माहिती आहे. 

ओबीसी राजकीय आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय बैठक

ओबीसी राजकीय आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय बैठक,  नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार,अनिल परब, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर , अशोक चव्हाण सह्याद्रीवर 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त ईडीकडून जप्त


Breaking News LIVE : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त ईडीकडून जप्त, 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त, लोणावळा, जळगाव येथील मालमत्ता जप्त  000674

मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई राजगड पक्ष कार्यालयात दाखल

मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई राजगड पक्ष कार्यालयात दाखल,


पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

सोलापुरात आढळला दुर्मिळ प्रजातीचा स्किललेस नाग

सोलापुरात दुर्मिळ प्रजातीचा स्किललेस नाग आढळून आला आहे. नाग प्रजातीच्या सापाच्या अंगावर विविध प्रकारचे खवले असतात. मात्र या नागाच्या अंगावर कोणतेही खवले नव्हते. सोलापुरातील डीआरएम रेल्वे ऑफिस समोरच्या गेटमध्ये एक साप तेथील कर्मचारी संदीप पैकेकरी यांना दिसला. रिकाम्या बाटलीचा वापर करून त्यात सापाला बंदिस्त केले. मात्र दिसायला वेगळाच असलेल्या या सापाची ओळख पटत नव्हती. यावेळी संदीप पैकेकरी यांनी सापाचे फोटो वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे सदस्य रोहन तोडकरी आणि संतोष धाकपाडे यांना पाठविले. वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन सोलापूरच्या सदस्यांनी त्या सापाचे नीट निरीक्षण करून पाहिलं असता तो साप नाग प्रजातीचा असल्याचे समजले. 

सांगली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार विक्रम सावंत यांची निवड

सांगली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड जाहीर  झाल्या आहेत. सांगली जिल्ह्याच्या कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी जतचे आमदार विक्रम सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी अकोल्यात पोलिस निरीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल 

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली पोलिस निरीक्षक विजय पाटकर यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.  गुरुवारी ही कारवाई पोलिसांनी केली. 

पार्श्वभूमी


 

 

 

 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.