Breaking News LIVE : सीरियल बॉम्बस्फोटांमुळे काबुल स्तब्ध, 4 अमेरिकन सैनिक ठार, 60 हून अधिक जखमी, तालिबानकडून घटनेचा निषेध

Breaking News LIVE Updates, 26 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Aug 2021 12:07 AM
सीरियल बॉम्बस्फोटांमुळे काबुल स्तब्ध, 4 अमेरिकन सैनिक ठार, 60 हून अधिक जखमी, तालिबानकडून घटनेचा निषेध

सीरियल बॉम्बस्फोटांमुळे काबुल स्तब्ध, 4 अमेरिकन सैनिक ठार, 60 हून अधिक जखमी, तालिबानकडून घटनेचा निषेध

अमरावती : मेळघाटच्या धारणीत 41 किलो गांजा जप्त

गुप्त माहितीच्या आधारे धारणी पोलिसांनी दीया फाट्या जवळ असलेल्या एपीएमसी नाक्यावर संशयित दोन आरोपींना नाक्यावर अडवून तपासणी केली असता मोटर सायकलच्या मधात पांढऱ्या रंगाच्या बोरीत गांजा असल्याचे निदर्शनास आले.. तात्काळ कार्यवाही करून घटनास्थळावर मुद्दे मालाचा पंचनामा केला आणि जागेवरच किलो काटा आणून जागेवर गाज्याची मोजणी केली असता एकूण 41 किलो गांजा आरोपी अर्पित संजय मालवीय (वय 20) आणि सय्यद अली सय्यद हसन (वय 19) या दोन आरोपींना जवळून जप्त करण्यात आला..

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांची उपाध्यक्ष म्हणून निवड

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, 18 उपाध्यक्ष, दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांची उपाध्यक्ष म्हणून निवड, पृथ्वीराज चव्हाण शिस्तपालन कमिटीचे अध्यक्ष, अमरजीत मनहास काँग्रेसचे खजिनदार

उल्हासनगरात भाजप नगरसेवकाला काळं फासल्याचं प्रकरण, पाच शिवसैनिकांना अटक आणि जामिनावर सुटका

उल्हासनगरात भाजप नगरसेवकाला काळं फासल्याचं प्रकरण, पाच शिवसैनिकांना अटक आणि जामिनावर सुटका, प्रत्येकी 20 हजारांच्या जातमुचलक्यावर झाली सुटका, शिवसेनेनं पाचही जणांचा न्यायालयाच्या बाहेर केला सत्कार

सोलापुरातील प्रसिद्ध पैलवान अप्पालाल शेख यांचं दीर्घ आजाराने निधन

सोलापुरातील प्रसिद्ध पैलवान अप्पालाल शेख यांचं दीर्घ आजाराने निधन झाले आहे. 1991 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अप्पालाल यांना सुवर्ण पदक, तर 1992 साली महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकला.  जवळपास वर्षभरापूर्वी त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या, तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात काही वेळापूर्वी अखेरचा श्वास घेतला असल्याची परिवारातील सदस्यांनी माहिती दिली आहे

 वर्धा : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जाम चौरस्ता येथे रस्ता रोको आंदोलन

 वर्धा : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जाम चौरस्ता येथे रस्ता रोको आंदोलन, जवळपास अर्धा तास आंदोलन, शेतकरी संघटना विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आंदोलन, शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग, वर्धा जिल्हा विदर्भ राज्य आंदोलन समिती समन्वय मधुसूदन हरणे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष उल्लास कोटमकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

कल्याणमध्ये दोन तरुणांकडून 10 ते 12 दुचाकी, चार चाकी गाड्यांची तोडफोड

काल मध्यरात्री  दोन वाजण्याच्या सुमारास कल्याण पूर्व भागातील चिकणीपाडा परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत परिसरात आले. हे दोघे एका तरुणाच्या शोधात होते मात्र तो तरुण सापडला नाही. या दोघांनी दारुच्या नशेत दहशत माजवण्यासाठी परिसरातील  बाईक आणि चार चाकी वाहनांना लक्ष करत  बाईक, कार, रिक्षांची तोडफोड केली. एका तरुणाला जखमी केले. या प्रकरणाचा तपास कोळसेवाडी पोलिस करीत आहेत. अखेर दहशत माजविणारे हे दोन तरुण कोण होते याचा शोध पोलिस घेत आहेत. 

कोरोना रुग्ण संख्या जास्त असलेल्या सांगोला तालुक्यातील 18 गावात 15 दिवसांसाठी कडक निर्बंध लागू

कोरोना रुग्ण संख्या जास्त असलेल्या सांगोला तालुक्यातील 18 गावात 15 दिवसांसाठी कडक निर्बंध लागू .. प्रांताधिकारी उदय भोसले यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उचलले कडक पाऊल

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधक डॉ. गेल ऑम्वेट यांच्यावर कासेगावमध्ये अंत्यसंस्कार

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधक डॉ. गेल ऑम्वेट तथा शलाका पाटणकर यांच्यावर कासेगाव मधील क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारात अंत्यसंस्कार पार, 


मुलगी प्राचीने गेल यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला, भारत पाटणकर यावेळी उपस्थित

डॉ. गेल ऑम्वेट यांचा अंत्यसंस्कार पार

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधक डॉ. गेल ऑम्वेट तथा शलाका पाटणकर यांच्यावर कासेगाव मधील क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारात अंत्यसंस्कार पार पडला. मुलगी प्राचीने गेल यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. भारत पाटणकर यावेळी उपस्थित होते.

सोलापूर महानगरपालिका निवडणूका आधी पालिकेतील तिसरा मोठा नेता राष्ट्रवादीत जाणार?

सोलापूर महानगरपालिका निवडणूका आधी पालिकेतील तिसरा मोठा नेता राष्ट्रवादीत जाणार? ,


शिवसेनेचे महेश कोठे, एमआयएमचे तौफिक शेख यांच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा,


त्यातच आज आनंद चंदनशिवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घेतली भेट, यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे देखील होते उपस्थित,


चंदनशिवे यांनी प्रवेशाबाबत बोलणे टाळले असून सोलापुरातील विविध प्रश्नांबाबत भेट झाल्याची दिली माहिती,

अफगाणिस्तान संदर्भात केंद्र सरकारने बोलवली महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक

अफगाणिस्तान संदर्भात केंद्र सरकारने बोलवली महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक, 


राष्ट्रवादी कडून शरद पवार तर शिवसेनेकडून खासदार गजानन कीर्तिकर उपस्थित राहणार

पुणे मेट्रोचे तिकीट दर दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर असतील- ब्रिजेश दीक्षित

बहुप्रतिक्षेत पुणे मेट्रोचे या डिसेंबर पूर्वी प्रवासाच्या सेवेत दाखल होईल. शिवाय यासाठीचे तिकीट दर हे दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर असतील असं पुणे मेट्रोचे महाव्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षितांनी जाहीर केलं. त्यानुसार पहिल्या किलोमीटर साठी प्रवाश्यांना दहा रुपये मोजावे लागतील. प्रवास जितका वाढेल तसा दर कमी होत जाईल. असं दिक्षितांनी सांगितलं. डिसेंबर पूर्वी पिंपरी पालिका ते फुगेवाडी असा सात किलोमीटर तर कोथरूड ते गरवारे महाविद्यालय असा पाच किलोमीटर प्रवास खुला केला जाणार आहे. तेंव्हा या तिकीट दराने प्रवास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे

सुप्रीम कोर्टात नियुक्तीसाठी कॉलेजियमकडून पाठवण्यात आलेल्या सर्व 9 नावांना केंद्राची मंजूरी

सुप्रीम कोर्टात नियुक्तीसाठी कॉलेजियमकडून पाठवण्यात आलेल्या सर्व 9 नावांना केंद्राची मंजूरी,  यात 3 महिला न्यायाधीश- जस्टिस हिमा कोहली, जस्टिस बी वी नागरत्ना, जस्टिस बेला त्रिवेदी यांच्यासह जस्टिस ए एस ओका, विक्रम नाथ, जे के माहेश्वरी, सी टी रविंद्रकुमार, एम एम सुंदरेश, वरिष्ठ वकील पी एस नरसिम्हा यांचा समावेश

अमित ठाकरे यांच्यासह प्रमुख मनसे नेते तीन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे शहरावर लक्ष केंद्रीत केल्यानंतर अमित ठाकरे नाशिकमध्ये संघटना बांधणी करणार आहेत. विधानसभा मतदारसंघानुसार ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. शहरातील प्रत्येक वार्डात शाखा अध्यक्षांची मजबूत फळी उभारणार असल्याची माहिती आहे. या दौऱ्यात अमित ठाकरे यांच्याबरोबर बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, अमेय खोपकर आणि इतर मनसेचे वरीष्ठ पदाधिकारी सहभागी होणार आहेत. 

 अमित ठाकरे यांच्यासह प्रमुख मनसे नेते 3 दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर

 अमित ठाकरे यांच्यासह प्रमुख मनसे नेते 3 दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर,  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे शहरावर लक्ष केंद्रीत केल्यानंतर अमित ठाकरे नाशिकमध्ये संघटन बांधणी करणार , 


विधानसभा मतदारसंघनुसार पदाधिकारीशी चर्चा करणार,


शहरातील प्रत्येक वार्डात शाखा अध्यक्षांची मजबूत फळी उभारणार,



एक सदस्यीय वार्ड रचनेनुसार मनसे करणार संघटनात्मक बांधणी,


- 27,28, 29 तीन दिवस चालणार बैठका,


अमित ठाकरे यांच्याबरोबर बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, अमेय खोपकर सर्व मनसेचे वरीष्ठ पदाधिकारी दौऱ्यात सहभागी होणार,



अमित ठाकरे आज रात्री मुक्कामी येण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री बाळासाहेब थोरात आज राज्यपालांची भेट घेणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री बाळासाहेब थोरात आज राज्यपालांची भेट घेणार

आईची दत्तक घेतलेल्या मुलीसह वारणा नदीत उडी मारून आत्महत्या

आईने दत्तक घेतलेल्या मुलीसह वारणा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली परिसरातील ही घटना घडली असून आत्महत्या केलेल्या आईचं नाव रेश्मा पाडगावकर असं आहे तर मुलीचं नाव रुद्रा असं आहे. दत्तक घेतलेली रुद्रा गतिमंद असल्याने आलेल्या नैराश्येतून आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. रेश्मा यांच्या पतीचे दोन वर्षापूर्वी अपघाती निधन झालं आहे.

नागपूरमधील रेस्टॉरंटला काल रात्री आग, सुदैवाने कोणतीही जीवीतहानी नाही

नागपूरच्या वेस्ट हाय कोर्ट रोडवर "बार्बेक्यू" नावाच्या रेस्टॉरंटला काल रात्री नऊच्या सुमारास आग लागली होती. शॉर्टसर्किटमुळे लागलेली ही आग सुदैवाने फक्त रेस्टोरंटच्या साइन बोर्ड पुरती मर्यादित राहिली आणि लगेच नियंत्रणात आली. या आगीमध्ये हॉटेलचा समोरील साइन बोर्ड आणि एका खिडकीच काही प्रमाणात नुकसान झालय. हॉटेल व्यवस्थापनाने लगेच आगीची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या एका गाडीने येऊन लगेच आग विझविली.वेस्ट हाय कोर्ट रोड नागपूरचे महत्वाचे मार्ग असून अनेक मोठ्या ब्रँडचे शोरूम आणि दुकानं या रस्त्यावर आहेत.

पार्श्वभूमी

नारायण राणेंना हायकोर्टाचा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याची राज्य सरकारची ग्वाही
भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंना 17 सप्टेंबरपर्यंत हायकोर्टानं दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत राणेंविरोधात कोणतीही कठोर कारवाई करणार नाही अशी ग्वाही राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. त्यामुळे तूर्तास नारायण राणेंना चौकशीसाठी कुठेही हजेरी लावण्याची गरज नाही. मात्र महाड कोर्टानं जामीनाच्या ज्या अटीशर्ती लावल्या आहेत त्या मात्र त्यांना पूर्ण कराव्याच लागतील.


दरम्यानच्या काळात नारायण राणेंनी अशी कोणतीही विधानं अथवा कृत्य करू नयेत ज्यानं आम्हाला पुन्हा कारवाईसाठी भाग पाडलं जाईल अशी अट विशेष सरकारी वकील अमित देसाई यांनी कोर्टापुढे मांडली होती. याला विरोध करत अशी हमी देता येणार नाही, कारण असं करणं याचिकाकर्त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्यासारखं होईल असा युक्तिवाद नारायण राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी हायकोर्टात केला. जो ग्राह्य धरत हायकोर्टानं तशी कोणतीही अट न घालता नारायण राणेंना अंतरिम दिलासा दिला आहे.


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे राहुल गांधी यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर, म्हणाल्या तुम्हाला मुद्रीकरण समजते का?
नॅशनल मोनेटाइजेशन पाईपलाईन (NMP) वरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. आज त्यांनी ट्विटरवर #IndiaOnSale या हॅशटॅगसह लिहलंय, की "सर्वात आधी विश्वास विकला आणि आता.." याआधी मंगळवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 70 वर्षात जनतेच्या पैशाने बनवलेली देशाची संपत्ती त्यांच्या काही उद्योगपती मित्रांना विकत आहेत. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. 


एका प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या, की "त्यांना (राहुल गांधी) मोनेटाइजेशन समजते का? काँग्रेसनेच देशाची संसाधने विकली आणि त्यात लाच घेतली." त्या म्हणाल्या की, काँग्रेस सरकारने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे 8,000 कोटी रुपये उभारण्यासाठी मोनेटाइजेशन केलं, 2008 मध्ये नवी दिल्ली रेल्वे स्थानकासाठी प्रस्ताव मागवण्या आले होते.


पालघर जिल्ह्याचा प्रवास कोरोनामुक्तीकडे; 95 टक्के कोरोना हद्दपार, 859 गावं कोरोनामुक्त
पालघरचा प्रवास कोरोनामुक्तीकडे सुरु असून जिल्ह्यातून  95 टक्के कोरोना हद्दपार झाला आहे. यामध्ये 859 गावं कोरोना मुक्त झाली आहेत. जिल्ह्यासमोर विधवा महिला तसेच एकल माता यांच्या पुनर्वसनाचं आव्हान असून याकरिता उपसमिती गठीत करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जिल्हा प्रशासनाला  दिल्या आहेत. नीलम गोऱ्हे यांनी पालघरमध्ये जिल्हा विकास कार्यक्रमांमध्ये अंतर्भूत न होणाऱ्या नऊ विभागांचा बुधवारी पालघर मध्ये आढावा घेतला.
 
एकल व विधवा महिला यांचं पुनर्वसन आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नोंदणी करण्याबाबत नीलम गोऱ्हे यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. जिल्हा विकास कार्यक्रमांमध्ये अंतर्भूत न होणाऱ्या कामगार, परिवहन, आदिवासी विकास, नाभिक, एकल महिला, रोजगार हमी, रिक्षा चालक, फेरीवाले इतर मागास प्रवर्ग, लोककलाकार यांच्यासह नऊ विभागांचा आढावा दौरा पूर्ण झाल्यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.