Breaking News LIVE :  सांगलीतील ज्येष्ठ पत्रकार, प्रख्यात निवेदक,उत्कृष्ट रंगकर्मी, अरुण नाईक यांचे निधन

Breaking News LIVE Updates, 21 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Aug 2021 06:02 PM
यवतमाळ : महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी आमदार संजय राठोड यांना पोलिसांच्या विशेष तपासणी पथकाकडून क्लीन चिट

यवतमाळ : महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी आमदार संजय राठोड यांना पोलिसांच्या विशेष तपासणी पथकाकडून क्लीन चिट

सांगलीतील जेष्ठ पत्रकार,प्रख्यात निवेदक,उत्कृष्ट रंगकर्मी, अरुण नाईक यांचे निधन

सांगलीतील जेष्ठ पत्रकार,प्रख्यात निवेदक,उत्कृष्ट रंगकर्मी, अरुण नाईक यांचे सांगलीतील राहत्या घरी  वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 90 व्या वर्षी  अखेरचा श्वास घेतला

माळशिरस तालुक्यातील माळेवाडी येथील साठे कुटुंबियांनी आक्रमक होऊन ग्रामपंचायत समोर केले अंत्यसंस्कार, या प्रकरणात अट्रोसिटीसह तीन गुन्हे दाखल

माळशिरस तालुक्यातील माळेवाडी येथील साठे कुटुंबियांनी आक्रमक होऊन ग्रामपंचायत समोर केले अंत्यसंस्कार, या प्रकरणात अट्रोसिटीसह तीन गुन्हे दाखल

महाराष्ट्रात आज देखील चांगल्या पावसाचा अंदाज, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सर्वदूर पाऊस

महाराष्ट्रात आज देखील चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सर्वदूर पाऊस, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच पावसाची हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि नाशिकला यलो अलर्ट, नाशकातील घाट परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे.पालघरसाठी ऑरेंज अलर्ट, पालघरमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाड्यात 23 तारखेपासून पावसात घट होणार आहे. मात्र रिपरिप असणार त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस, घाट माथ्यावर पावसाची रिपरिप असण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांना झटका, ठाणे सेशन कोर्टाकडून गजानन काळे यांचा जामीन अर्ज फेटाळला

नवी मुंबई - मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांना झटका.  ठाणे सेशन कोर्टाकडून गजानन काळे यांचा जामीन अर्ज फेटाळला,  'आपल्या जीवाला धोका आहे. काळे यांचे सहकारी गुंड प्रवृत्तीचे आहेत. मला धमकावण्याचा प्रयत्न झाला, मुलाची साक्ष अजून पोलिसांनी नोंदवली नाही' या मुद्द्यांवर जामीन नाकारावा अशी संजीवनी काळे यांची कोर्टात साक्ष, गजानन काळे यांना जामीन दिल्यास जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता.. पोलीसांकडून कोर्टात स्पष्टीकरण .. वरील मुद्दे लक्षात घेवून ठाणे सेशन कोर्टाकडून गजानन काळे यांना जामीन देण्यास नकार

अहमदनगर -  पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी

अहमदनगर - 


पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी....


जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी सादर केला उपविभागीय आयुक्तांकडे चौकशी अहवाल....


देवरे यांनी अनेक कामात हस्तक्षेप करून हलगर्जीपणा केल्याचा ठपका,
तसेच वाळू साठ्यात गैरव्यवहार करून शासनाचे मोठं नुकसान केल्याचा ठपका....


ज्योती देवरे यांनी शासकीय कामात नितांत सचोटी व कर्तव्यपरायणता ठेवली नाही. कामाची जबाबदारी नीटपणे पार पाडली नाही... कामात हयगय केली आहे. वरिष्ठांच्या आदेशाचा भंग केला आहे. 
असे अहवालात नमूद.... 


महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 म नियम 3 च्या तरतुदीचा भंग केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.

 घरगुती गॅस दरवाढ कमी करण्यासाठी सोलापुरात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांचं आंदोलन

 घरगुती गॅस दरवाढ कमी करण्यासाठी सोलापुरात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तोंडाला काळी फिर बांधून आंदोलन केले. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पार पडले.  मागील काही महिन्यांपासून घरगुती गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा गॅस सिलेंडरचे दर 25 रुपये 50 पैशांनी वाढवलेले आहेत. याआधी राष्ट्रवादीतर्फे मोर्चे आंदोलन केले होते मात्र त्याचा आवाज सरकारपर्यंत पोहचत नाहीये. त्यामुळे मुक आंदोलन करत असल्याची भावना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळेस वक्त केली. 

काबूल विमानतळावर तालिबान्यांकडून150 हून अधिक नागरिकांचं अपहरण, भारतीयांचा समावेश

काबूल विमानतळावर तालिबान्यांकडून 150 हून अधिक नागरिकांचं अपहरण करण्यात आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, अपहरण झालेल्यांमध्ये सर्वाधिक भारतीय नागरिकांचा समावेश असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमस्थळी केली स्वच्छता

 उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत.. अजित पवार हे स्वच्छतेच्या बाबतीत फार शिस्तप्रिय आहेत.. त्यांना कुठेही कचरा दिसला तर ते अधिकारी आणि कार्यकर्त्यांची कानउघडणी करत असतात.. बारामतीच्या दौऱ्यावर असताना अजित पवारांना कार्यक्रम स्थळी कचरा आढळून आला.. यावेळी त्यांनी स्वतः कचरा  उचलत बाजूला केला..


 

 
पालघरमध्ये रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर फक्त महिलांसाठी लसीकरण सुरु

पालघर जिल्ह्यात आज रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर फक्त महिलांसाठीच लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील 79 लसीकरण केंद्रावर लसीकरण होत आहे. यामध्ये कोविशील्ड लसीचे जवळपास पंधरा हजार डोस तर कॉवाक्सिन लसीचे जवळपास पंधराशे डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. यामध्ये 18 वर्षावरील महिलांचे लसीकरण करण्यात येत असून जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्रावर महिला वर्गाकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल, वसूलीसंदर्भात गोरेगाव पोलिसात गुन्हा

 
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल, वसूलीसंदर्भात गोरेगाव पोलिसात गुन्हा 

राज्यातील मुदत संपलेल्या 200 नगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार, प्रभाग रचनेचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश 

राज्य निवडणुक आयोगाने मुदत संपलेल्या नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतीत प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत . यामुळे आता मुदत संपणाऱ्या राज्यातील जवळपास 200 नगरपालिका आणि नव्याने मंजुरी दिलेल्या 20 नगरपंचायत आणि नागरपरिषदांना प्रभाग रचना आणि सदस्य संख्या तयार करून घ्यावी लागणार आहे . याबाबत आयोगाने प्रभाग रचना कशी करायची याबाबत अजून डिटेल्स दिलेले नसले तरी येत्या दोन तीन दिवसात याचाही तपशील मिळू शकणार आहे . राज्यातील डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत ज्यांची मुदत संपत आहे आणि ज्या नगरपरिषद आणि नगरपंचायत याना नव्याने मंजुरी दिली आहे अशा सर्व ठिकाणी ही प्रभाग रचना करण्याच्या सूचना दिल्या आहेत .

बुलढाण्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु

जिल्ह्यात गेल्या 48 तासापासून संततधार सुरु असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील मेहकर, लोणार, संग्रामपूर, शेगाव, खामगाव तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु असून अनेक सखल भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून जिल्ह्यातील अनेक प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 64 टक्के पाऊस झाला असून सर्वात जास्त मेहकर तालुक्यात सरासरीच्या 110 टक्के पाऊस बरसला आहे.

अकोल्यातील काटेपूर्णा प्रकल्पाचे दोन दरवाजे एक फुटाने उघडले

अकोला जिल्ह्यातील महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाचे दोन दरवाजे एक फुटांनी उघडलेत. तर तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचे दोन दरवाजे 50 सेमीने उघडलेत. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

पार्श्वभूमी

इंजेक्शनशिवाय दिल्या  जाणाऱ्या 'ZyCoV-D' लसीच्या आपत्कालीन वापराला केंद्राची मंजुरी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विळख्यातून देश हळूहळू बाहेर पडत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेची टांगती तलवार कायम आहे. आस्वदेशी कंपनी झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीच्या कोविड -19 वरील लस झायकोव्ह-डी (ZyCov-D)च्या आप्तकालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. देशात कोव्हिशिल्ड, को-व्हॅक्सिन, स्पुटनिक, मॉर्डनानंतर उपलब्ध होणारी ही पाचवी लस आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढा आणखी मजबूत होणार आहे. झायडस कॅडिलाची लस कोविड -19 विरूद्ध ही एका प्लाज्मिड डीएनए लस आहे, असा असा दावा कंपनीने केला आहे.  झायडस कॅडिला लसची  चाचणी 28,000 हून अधिक व्हॉलिन्टियर्सवर केली गेली आहे. त्यामुळे या लसीला मंजुरी मिळाल्यामुळे केवळ प्रौढच नव्हे तर 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना देखील लाभ होणार आहे.


लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर टीम इंडिया इतिहास रचणार? जाणून घ्या मागील रेकॉर्ड्स
 टीम इंडिया आणि इंग्लड यांच्या तिसरा कसोटी सामना 25 ऑगस्टपासून लीड्समध्ये खेळवण्यात येणार आहे. 19 वर्षांनी लीड्समधील हेडिंग्ले मैदानात भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या 6 सामन्यांमध्ये टीम इंडियाला दोन सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. तर इंग्लंडनं 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आलेला एक सामना ड्रॉ राहिला आहे. 


लीड्समध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये इंग्लंडनं विजय मिळवला होता. परंतु, 1986 आणि 2002 मध्ये भारतीय संघानं या मेदानावर फक्त विजयच मिळवला नाही, तर पहिल्या डावात 279  धावांनी आणि दुसऱ्या डावात 46 धावांच्या फरकानं इंग्लंडचा पराभव केला होता. अशातच आता पुन्हा एकदा टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची संधी आहे. 


राज्यातील शाळा सुरू झालेल्या ठिकाणचा अहवाल शिक्षण विभागाकडून जाहीर, वाचा.. कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक उपस्थिती
आतापर्यत इयत्ता 8 ते 12 वी शाळा सुरू केल्यानंतर प्राप्त माहितीचा अहवाल शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला. यामध्ये 18 ऑगस्ट या एका दिवशी माहिती गोळा करून हा अहवाल तयार केलेला आहे. यामध्ये इयत्ता 8 वी ते 12 वी वर्गात शिकणारे या दिवशी राज्यातील 15,12,404 विद्यार्थी शाळेत उपस्थित राहिले आहेत. तर राज्यभरात इयत्ता आठवी ते बारावी वर्गाच्या आतापर्यत 17,701 शाळा सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. 


ज्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, त्यात इयत्ता 8 वी ते 12 वी वर्गाचे एकूण विद्यार्थी 1,03,07,457 संख्या आहे. त्यातील फक्त 14.67 टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित दर्शवली आहे. तर एकूण शाळेच्या संख्या लक्षात घेता 38.18 टक्के शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक शाळा अमरावती विभागात 2,282 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, त्यात यवतमाळ जिल्ह्यात 779 शाळा सुरू झाल्या आहेत. तर शाळेत उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही लातूर विभागाची सर्वाधिक असून या विभागात 56.58 विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. यामध्ये काही जिल्ह्यांची माहिती शिक्षण विभागाला आणखी प्राप्त होणे बाकी आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.