Breaking News LIVE : महिला काँग्रेस अध्यक्षा आणि माजी खासदार सुष्मिता देव यांचा पक्षाला रामराम, सोनिया गांधींकडे सोपवला राजीनामा

Breaking News LIVE Updates, 16 August 2021 : देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Aug 2021 10:14 AM
Corona Update : राज्यात आज 4145 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 5811 रुग्ण कोरोनामुक्त, आज राज्यात 100 रुग्णांचा मृत्यू

Corona Update : राज्यात आज 4145 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 5811 रुग्ण कोरोनामुक्त, आज राज्यात 100 रुग्णांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम बंद आंदोलन स्थगित, केंद्रीय नागरी उड्डान मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांच्या भेटीनंतर नामकरण कृती समितीचा निर्णय

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय  विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे  नाव देण्यासाठी स्थानिक भूमीपुत्रांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. तीन आंदोलने करूनही सरकार दखल घेत नसल्याने विमानतळाचे सुरू असलेले काम बंद पाडण्याचा इशारा विमानतळ नामकरण कृती समितीने दिला होता. मात्र आता केंद्रीय नागरी उड्डान मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांची भेट घेतल्यानंतर विमानतळाचे काम बंद पाडण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. 

अनिल देशमुखांना अंतरिम दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

अनिल देशमुखांना अंतरिम दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, याचिकाकर्त्याला आम्ही कोणताही दिलासा देऊ इच्छित नाही, सीआरपीसीनुसार उपलब्ध असलेल्या उपायांचाच याचिकाकर्त्यांनी वापर करावा, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम यांच्या पूर्णपीठासमोर झाली सुनावणी

लसीकरणाच्या आधारे लोकांमध्ये भेदभाव करणं, घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन , सरसकट सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका

लसीकरणाच्या आधारे लोकांमध्ये भेदभाव करणं, घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन,


सरसकट सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका,


लसीकरण ऐच्छिक असताना मुंबईत लोकल प्रवासाच्या परवानगीसाठी लसीकरण सक्तीचं करणं बेकायदेशीर असल्याचा याचिकेत आरोप,


लस न घेतलेल्या नागरीकांच्या उपजीविकेवर सरकारकडनं गदा आणली जात असल्याचा याचिकेत दावा,


हे उपाय सुचवणा-या अधिका-यांवर फौजदारी कारवाईचीही याचिकेत मागणी,


सामाजिक कार्यकर्ता फिरोझ मिठबोरवाला यांच्या याचिकेवर लवकरच हायकोर्टात सुनावणीची अपेक्षा,

देशातील सध्याची कोरोनास्थिती

कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 22 लाख 25 हजार 513
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 14 लाख 11 हजार 924
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 81 हजार 947
एकूण मृत्यू : चार लाख 31 हजार 642
लसीकरणाची एकूण आकडेवारी : 53 कोटी 57 लाख 57 हजार लसींचे डोस

कोरोनाची आतापर्यंतची एकूण आकडेवारी

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 22 लाख 25 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 31 हजार 642 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 14 लाख 11 हजार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशात सध्या कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. एकूण 3 लाख 81 हजार रुग्णांवर अद्यापही उपचार सुरु आहे. 

गेल्या 24 तासांत देशात 32,937 दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद

भारतात कोरोना प्रादुर्भावात काहीशी घट झाली आहे. पण अद्यापही धोका कायम आहे. सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटनं देशात सर्वांची धास्ती वाढवली आहे. अशातच तज्ज्ञांकडून देशात तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 32,937 दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 417 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 9 ऑगस्ट रोजी 28,204 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, देशात गेल्या 24 तासांत 35,909 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 

महिला काँग्रेस अध्यक्षा आणि माजी खासदार सुष्मिता देव यांचा पक्षाला रामराम, सोनिया गांधींकडे सोपवला राजीनामा

महिला काँग्रेस अध्यक्षा आणि माजी खासदार सुष्मिता देव यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. आपला राजीनामा त्यांनी सोनिया गांधी यांना सोपवला आहे.  

नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा 50 टक्के

नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा आतापर्यंत 50 टक्के इतका झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्के कमी आहे. अजूनही अनेक तालुके पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यात एकूण 24 मोठे व मध्यम प्रकल्प आहेत. 
7 मोठ्या प्रकल्पात आजमितीस उपलब्ध पाणीसाठा - गंगापूर 80, दारणा 80, गिरणा 41, चणकापूर 43, करंजवन 30, कड़वा 81, मुकणे 57 टक्के

मंदिरं उघडण्यासाठी भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या वतीने आंदोलन

औरंगाबाद 12 ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिराच्या समोर राज्यभरातील मंदिरं उघडण्यासाठी भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. मंदिराच्या बाहेर दृष्टीने ईश्वराची प्रतीकात्मक प्रिंटर उभा करून भाजप आध्यात्मिक आघाडीच्यावतीने अभिषेक करण्यात आला. भाजपा आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले आहेत...

कोल्हापूर जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 7 रुग्ण

कोल्हापूर जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 7 रुग्ण,


कोल्हापूर शहरात 3 तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 4 रुग्ण,


दिल्ली येथील लॅबमध्ये पाठवलेल्या 100 नमुन्यांपैकी 7 डेल्टा ,


जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच डेल्टा वाढल्याने खळबळ,


जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाठवले होते नमुने,

कोरोनाबाधित मृत रूग्णाच्या अंगावर दागिने चोरीला; रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातील प्रकार

रत्नागिरी : कोरोनाबाधित मृत रूग्णाच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याची घटना रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात घडली आहे. मृत महिलेच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याचं नातेवाईकांच्या ध्यानात आले. त्यानंतर त्यांनी सदर बाब जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कानावर घातली. यानंतर चौकशी केली असता चतुर्थ श्रेणी कंत्राटी महिला कर्मचाऱ्यानं दागिने लांबवल्याचं समोर आलं आहे. याबाबत चौकशी करत संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात अहोरात्र मेहनत करत रूग्ण सेवा केली. पण, शनिवारी घडलेल्या या प्रकारामुळे मात्र कुठंतरी नाराजीचा सुरू दिसून आला.

राज्यमंत्री बच्चू कडूंनी अकोल्यात वीरमातापित्यांचे धुतले पाय, झाले पंगतीतले 'वाढपी'

अकोल्यातील 'ग्रीनलँड हॉटेल'चं सभागृह आज पार भारावून गेलेलं. एरव्ही या सभागृहानं अनेक सोहळे पाहिलेत अन् अनुभवलेही. परंतु, आजचा सोहळा सर्वार्थाने पार वेगळा. भावना, संवेदना, अभिमान अन् आपुलकीच्या भावनांनी ओथंबलेला. ज्यांच्यासाठी हा हृद्य सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यांनी आपला मुलगा, पती, वडील या देशासाठी अर्पण केलेला. या अनोख्या सन्मानानं आपल्या काळजाच्या तुकड्यांच्या 'शहीदत्वा'चा आज परत नव्यानं त्यांना अभिमान वाटला. तर ज्यांच्यामुळे आपण खरं स्वातंत्र्य उपभोगत, अनुभवत आहोत, त्यांच्या कुटूंबियांची अल्पशी सेवा करता आली, असा तृप्त सेवाभाव आयोजक असलेल्या त्या नेत्यातील कार्यकर्त्याला सुखावून गेला होता. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी आजच्या स्वातंत्र्यदिनी शहीद सैनिकांच्या कुटूंबियांचा अनोखा सन्मान केला. बच्चू कडू यांनी वीरमातांचे पाय धुतलेत. चांदीच्या ताटात या कुटूंबियांना शाही भोजन दिलंय. या अनोख्या पंगतीत बच्चू कडू स्वत:च 'वाढपी'ही झाले होते.

Pawandeep Rajan इंडियन आयडलच्या बाराव्या सिझनचा विजेता

अखेर तो क्षण आला, ज्याची संपूर्ण भारत आतुरतेनं वाट पाहत होता. इंडियन आयडलच्या बाराव्या सिझनचा विजेता (Indian Idol 12 Winner) घोषित करण्यात आला आहे. पवनदीप राजननं इंडियन आयडलच्या बाराव्या सिझनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. तर अरुणिता कांजीलाल शोची फर्स्ट रनरअप ठरली. दानिश खान (Danish Khan), शनमुखप्रिया  (Shanmukhpriya), अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal), निहाल तोरो (Nihal Tauro), सयाली कांबळे (sayali kamble) आणि पवनदीप राजन (Pawandeep Rajan) इंडियन आयडलचे फायनलिस्ट होते. गायक अनु मलिक, सोनू कक्कड आणि हिमेश रेशमिया यांच्या उपस्थितीत शोचा विनर निवडण्यात आला. 

जेसिका लालच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळवून देणाऱ्या सबरीना लाल यांचं निधन

देशभर गाजलेल्या जेसिका लाल हत्याकांडातील आरोपींना शिक्षा मिळवून देण्यासाठी मोठी कायदेशीर लढाई लढणाऱ्या सबरीना लाल यांचे रविवारी संध्याकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. सबरीना लाल (वय 53) या जेसिका लाल यांच्या बहिण होत्या. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि अशा महिलांना मदत करण्यासाठी आपण एक संस्था सुरु करणार असल्याचं सबरीना लाल यांनी गेल्या वर्षी एका मुलाखतीत सांगितलं होतं. सबरीना लाल या दीर्घ काळापासून आजारी होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होता. रविवारी त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. पण रविवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशी माहिती त्यांचे बंधू रणजित लाल यांनी पीटीआयला दिली. 

सिनेमागृह, मंदिरं मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंदच

सिनेमागृह आणि नाट्यगृह आणि धार्मिक स्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहे. शॉपिंग मॉल 10 वाजेपर्यंत सुरु राहतील मात्र त्या ठिकाणी जाणारे आहेत त्यांचे दोन डोस झालेले असावेत. कार्यालयात शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना प्रथम लसीकरण देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आजपासून खाजगी कार्यालयात 24 तास सुरू ठेवण्यास शासनाची परवानगी

खाजगी कार्यालयात एकाचवेळी गर्दी करण्यापेक्षा 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिफ्टमध्ये काम करता येईल. खाजगी कार्यालयातील कर्मचारी यांचे दोन डोस लस झालेली आहे त्यांना शंभर टक्के क्षमतेने कार्यालय सुरू राहतील.

आजपासून राज्यात मंगलकार्यालयांना सूट, विवाह सोहळ्याला 200 लोकांची मर्यादा

खुल्या जागेत जे विवाह सोहळा होणार त्यांना 200 लोकांची मर्यादा आणि हॉल मधील एकूण जागेच्या 50 टक्के मर्यादा परवानगी दिली आहे. नियमांचे  पालन करणार नाही त्यांना दंड आकारण्यात येणार आहे.

आजपासून महाराष्ट्रात निर्बंध शिथील होणार, मॉल, शॉपिंग सेंटर मधील दुकानं रात्री दहावाजेपर्यंत सुरु

आज सोमवारपासून महाराष्ट्रात निर्बंध शिथील होण्याची अंमलबजावणी होणार आहे. खासकरून राज्यभरातील मॉल, शॉपिंग सेंटर मधील दुकानं रात्री दहावाजेपर्यंत उघडी ठेवण्यास सूट देण्यात आली आहे. मात्र, मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना, दुकान मालकांना आणि या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस पूर्ण असतील तरच प्रवेश मिळणार आहे. यासोबतच खाजगी कार्यालये, लोकल ट्रेन यासाठीही सूट देण्यात आली आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात येत असताना महाराष्ट्र अनलॉक करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, हे करताना जर रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन करणार असल्याचा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलाय.

पार्श्वभूमी

Maharashtra Unlock : आजपासून महाराष्ट्रात निर्बंध शिथील होण्याची अंमलबजावणी होणार! वाचा काय सुरु, काय बंद?


आज सोमवारपासून महाराष्ट्रात निर्बंध शिथील होण्याची अंमलबजावणी होणार आहे. खासकरून राज्यभरातील मॉल, शॉपिंग सेंटर मधील दुकानं रात्री दहावाजेपर्यंत उघडी ठेवण्यास सूट देण्यात आली आहे. मात्र, मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना, दुकान मालकांना आणि या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस पूर्ण असतील तरच प्रवेश मिळणार आहे. यासोबतच खाजगी कार्यालये, लोकल ट्रेन यासाठीही सूट देण्यात आली आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात येत असताना महाराष्ट्र अनलॉक करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, हे करताना जर रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन करणार असल्याचा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलाय.


मंगलकार्यालयांना सूट
खुल्या जागेत जे विवाह सोहळा होणार त्यांना 200 लोकांची मर्यादा आणि हॉल मधील एकूण जागेच्या 50 टक्के मर्यादा परवानगी दिली आहे. नियमांचे  पालन करणार नाही त्यांना दंड आकारण्यात येणार आहे.


खाजगी कार्यालयात  24 तास सुरू ठेवण्याची परवानगी
खाजगी कार्यालयात एकाचवेळी गर्दी करण्यापेक्षा 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिफ्टमध्ये काम करता येईल. खाजगी कार्यालयातील कर्मचारी यांचे दोन डोस लस झालेली आहे त्यांना शंभर टक्के क्षमतेने कार्यालय सुरू राहतील.


लोकल प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर 1 लाख 21 हजार नागरिकांनी काढला पास; फेऱ्या वाढवण्याचा निर्णय


मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे आज 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केलेल्या प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. मात्र, आज 15 ऑगस्ट आणि रविवार असल्याने स्टेशनवर प्रवाशांची गर्दी दिसून आली नाही. तर सोमवारपासून ही गर्दी वाढण्याची शक्यता आहे, त्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये देखील वाढ केली आहे. तसेच 11 ऑगस्टपासून आजपर्यंत एक लाख वीस हजार पेक्षा जास्त नागरिकांनी पास काढल्याची आकडेवारी रेल्वेकडून देण्यात आली आहे.


सर्वसामान्य प्रवाशांना लसीकरण पूर्ण झाले असल्यास लोकलने प्रवासाची जरी मुभा देण्यात आलेली असली, तरी आज रविवार आणि 15 ऑगस्ट एकत्र आल्याने स्थानकांवर आणि लोकांमध्ये गर्दी नव्हती. सोमवारी देखील बँक हॉलिडे असल्याने गर्दी कमी असण्याची शक्यता आहे. मात्र, मंगळवारपासून ही गर्दी वाढू शकते. त्यासाठीच मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. सध्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर लोकलच्या 1612 फेऱ्या धावत आहेत. त्या वाढवून 1686 फेऱ्या दर दिवशी चालवण्यात येणार आहेत. तर पश्चिम रेल्वेवर सध्या धावत असलेल्या 1201 लोकल फेऱ्या वाढवुन 1300 करण्यात आल्या आहेत. या अतिरिक्त लोकल फेऱ्या सोमवारपासून चालवल्या जातील. 


दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यापासून 15 ऑगस्टपर्यंत तब्बल 1 लाख 21 हजार 197 नागरिकांनी रेल्वेचे मासिक पास काढले आहेत. मध्य रेल्वेवर 79 हजार 8 जणांनी तर पश्चिम रेल्वेवर 42189 जणांनी पास काढले आहेत. मध्य रेल्वेच्या डोंबिवली तर पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकात पास काढणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या वाढलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.