Breaking News LIVE : मुंबईत उद्या नियोजित इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द
Breaking News LIVE Updates, 11 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
मुंबईत उद्या नियोजित इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यात आली आहे. बीएमसी शिक्षण विभागानंतर आता शिक्षण उपसंचालककडून मुंबईतील सर्व शाळेत शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या संपूर्ण राज्यात इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा जरी होत असली तरी मुंबईतील शाळांमध्ये ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. सुरवातीला काल करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई महापालिकेने शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता मुंबईतील सर्व शाळांमध्ये उद्या होणारी शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यात आल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून परिपत्रकद्वारे काळविण्यात आले आहे
ठाकरे सरकार दारुड्याचे सरकार आहे, पुन्हा एकदा सिद्ध झालं. मंदिरा विषयीचा आकस दिसून आला.देव धर्म यावर उपजीविका करणाऱ्याच्या उपासमारीची चिंता नाही हे पुन्हा स्पष्ट झाले. या सरकारला गुडघे टेकवण्यास भाग पाडू, आचार्य तुषार भोसले यांची प्रतिक्रिया.
शिक्षण शुल्कात 15 टक्के कपातीचा निर्णय आजही नाही. मंत्रीमंडळ बैठकीत आज चर्चा झाली मात्र ठोस निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. या निर्णयाला अनेक मंत्र्यांचा विरोध असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे तूर्तास तरी शिक्षण शुल्कात 15 टक्के कपातीचा निर्णयाचा दिलासा पालकांना मिळण्याची शक्यता धूसर आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील कोविड लॉकडाऊन निर्बंध शिथील करण्याची घोषणा करत असतानाच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकार सज्ज असल्याचा दावा केला. तिसरी लाट आल्यावर राज्याला ज्या क्षणी दररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागेल, त्याक्षणी राज्यात लॉकडाऊन लागू होईल, अशा स्पष्ट इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यातील नरेगा घोटाळा प्रकरणी कारवाई करण्यास हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची तातडीने बदली करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने राधाबिनोद शर्मा यांची बीडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
मुंबई : आज लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांचा रेल्वेचा मासिक पास काढण्यासाठी प्रचंड प्रतिसाद, मध्य, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गावर पहिल्याच दिवशी 12 हजार 771 पास लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या प्रवाश्यांनी काढल्याची संख्या आहे.
हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू करण्यासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा, हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत उघडी राहणार, 15 ऑगस्ट नंतर अंमलबजावणी होणार, सूत्रांची माहिती
औरंगाबादेत आणखी एका कंपनीतील एचआर मॅनेजरला लाठ्याकाठ्यांनी मारहाण. काल संध्याकाळी सहा वाजताची घटना. शिरीष कुमार राजे भोसले असं मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव. श्रीगणेश प्रेस आणि कोटिंग या कंपनीमध्ये गणेश एचआर मॅनेजर आहेत. सांध्याकाळी 6 च्या दरम्यान आणभाऊ साठे चौकात वाळूज भागात झाली मारहाण. मारहाणीत हाताने डोळ्याला इजा. लेबर कॉन्ट्रॅक्ट का दिलं नाही म्ह्णून मारहाण केल्याचा आरोप.
मुंबईत हॉटेल, रेस्टॉरंट आणि मॉल्स संदर्भात रात्री उशिरापर्यंत निर्णय होण्याची शक्यता,
हॉटेलला रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी मिळणार,
मॉल मधील रेस्टॉरंट आणि थेटर्स बंद राहणार,
ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत त्यांना मॉलमध्ये प्रवेश राहणार,
सध्या रेल्वे पास साठी जो क्यू आर कोड वापरला जातोय तोच मॉल मध्ये प्रवेश करण्यासाठी आणि इतर ठिकाणी वापरला जाण्याची शक्यता,
भांडुप : भांडुप गाढव नाका परिसरामध्ये बेस्ट चालकाचा बसवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एक जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. 605 क्रमांकाची ही बस भांडुप रेल्वे स्थानकावरून टेंभीपाडा परिसराकडे जात होती. भांडुपचा गाढव नाका परिसरामध्ये भरधाव वेगात असताना बेस्ट चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि या बेस्ट बसणे रस्त्यावरून जात असलेल्या दोन नागरिकांना धडक दिली यामध्ये 82 वर्षाचे कुंडलिक भगत यांचा जागीच मृत्यू झाला. तर 65 वर्षीय रवींद्र तिवारी हे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर भांडुप पोलिसांनी बेस्ट चालकाला ताब्यात घेतले असून मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास भांडुप पोलीस करत आहेत.
एकीकडे महाराष्ट्र सरकार 15 ऑगस्ट पासून दोन्ही डोस घेतलेले सर्वसामान्य लोकांना लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी परवानगी देणार आहे, मात्र दुसरीकडे बदलापूरमधील सरकारी लसीकरण गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. बदलापुरात लसीकरण बंद असल्याने नागरिक संतापले आहे.
एकीकडे महाराष्ट्र सरकार 15 ऑगस्ट पासून दोन्ही डोस घेतलेले सर्वसामान्य लोकांना लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी परवानगी देणार आहे, मात्र दुसरीकडे बदलापूरमधील सरकारी लसीकरण गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. बदलापुरात लसीकरण बंद असल्याने नागरिक संतापले आहे.
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचे निधन,
हृदविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाल्याची माहिती,
वयाच्या 56 व्या वर्षी सोलापुरातील सहकारी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास,
सुहास भोसले मूळ माढा तालुक्यातील पिंपळे गावचे रहिवासी,
राज्यात चार प्रकारातील डाळींच्या साठ्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. तूर, मसूर, उडीद आणि हरभरा डाळीच्या साठ्यावर 31 ऑक्टोबरपर्यंत हे निर्बंध असतील राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सहसचिव चारुशीला तांबेकर यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार केंद्र शासनाने डाळीच्या साठ्यावर घाऊक किरकोळ व्यापाऱ्यांनी मिलरसाठी साठा निर्बंध लागू केले. त्यामुळे राज्यात घाऊक व्यापारी आता डाळींचा पाचशे टनापेक्षा जास्त आणि एकाच प्रकारच्या डाळीचा दोनशे टनापेक्षा जास्त साठा करू शकणार नाहीत.
शिराळामध्ये निर्मिती झालेल्या कोरोनावरील लसीच्या चाचणीचा पहिला टप्पा काही दिवसांतच पूर्ण होणार,
ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मानवी चाचणीचा टप्पा पूर्ण होणार,
शिराळा मधील आयसेरा कंपनीत कोरोना प्रतिबंध लसीची झालीय निर्मिती,
71 ते 90 तासात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होत असल्याचा कंपनीचा दावा,
एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट,कोरोना प्रोटोकॉलच्या किरकोळ गुन्ह्यांमुळे पासपोर्ट व्हेरिफिकेशनमध्ये अडचणी सोसाव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेतले जाणार
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे स्वतः गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोलून विनंती करणार
सोलापूरच्या तरुणाची बातमी दाखवली होती एबीपी माझाने.. त्यानंतर सुप्रिया सुळेंकडून या प्रकरणात तातडीची दखल
कोल्हापूरवरुन साताऱ्यात लग्नाला आलेल्या कारला सातारा शहरात अपघात झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे.काल रात्री ते मुक्कामी सातारा शहरातील एका हॉटेलमध्ये थांबले होते. कारमधून शहरातील फेरफटका मारण्यासाठी ते रात्री बाहेर निघालेल्या असताना यांची कार सातारा जिल्हा न्यायालयच्या समोर असलेल्या पुलावरून खाली ओढ्यात कोसळ. अपघात एवढा भीषण होता की या कारमधील दोघे जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला. या तिघांनाही छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीम च्या कार्यकर्त्यांनी या सगळ्यांना बाहेर काढले.जखमेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत
झाकीर हुसेन हॉस्पिटल गॅस गळती प्रकरण, गॅस गळती प्रकरणाचा ठपका ठेकेदार कंपनीवर, निष्कळजीपणामुळे दुर्घटना झाल्याचा निष्कर्ष, मनपाच्या वैद्यकीय विभागाला क्लिनचिट, ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्णांचे गेले होते प्राण, पुण्याच्या ताईवो निपॉन आणि नाशिकच्या जाधव ट्रेंडर्सला ठोठावला दंड, निपॉंन कम्पनीला 22 लाख तर जाधव ट्रेंडर्स ला 2 लाखांचा दंड, 21 एप्रिलच्या दुर्घटनेनंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमली होती समिती, समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर, सरकारच्या सूचनेनुसार मनपा ने ठोठावला दंड
- भद्रकाली पोलिस ठाण्यात लाचलूचपत प्रतिबंधक कायद्यानूसार शिक्षणाधिकारी वैशाली विर यांच्यासह प्राथमिक शिक्षक आणि शासकीय चालकावर गुन्हा दाखल.
- प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते आणि शासकीय चालक ज्ञानेश्वर येवले अटकेत
- शिक्षणाधिकारी वैशाली विर थोड्याच वेळात चौकशीसाठी भद्रकाली पोलिस ठाण्यात होणार हजर
राज्यात चार प्रकारातील डाळींच्या साठ्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. तूर, मसूर, उडीद आणि हरभरा डाळीच्या साठ्यावर 31 ऑक्टोबरपर्यंत हे निर्बंध असतील राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सहसचिव चारुशीला तांबेकर यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार केंद्र शासनाने डाळीच्या साठ्यावर घाऊक किरकोळ व्यापाऱ्यांनी मिलरसाठी साठा निर्बंध लागू केले. त्यामुळे राज्यात घाऊक व्यापारी आता डाळींचा पाचशे टनापेक्षा जास्त आणि एकाच प्रकारच्या डाळीचा दोनशे टनापेक्षा जास्त साठा करू शकणार नाहीत.
कोरोनाची राज्यातील स्थिती हळूहळू सुधारत असताना शाळा देखील सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहेत. येत्या 17 ऑगस्ट पासून राज्यातील शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावी व ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत.
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र सरसकट आम्ही शाळा सुरू करत नाहीत. ज्या ठिकाणी सुरक्षा आहे त्याच ठिकाणी शाळा सुरू करत आहोत. शिक्षकांचं लसीकरण केलं जाणार आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन निर्णय घेतील. टास्क फोर्सने जे संगितलं आहे ते समोर ठेऊन हा निर्णय घेत आहोत.
गेल्या अठरा दिवसांपासून दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल आणि डिझेलची किंमती स्थिर आहेत.
शहरं | पेट्रोलची किंमत | डिझेलची किंमत |
दिल्ली | 101.84 | 89.87 |
मुंबई | 107.83 | 97.45 |
चेन्नई | 102.49 | 94.39 |
कोलकाता | 102.08 | 93.02 |
बंगळुरु | 105.25 | 95.26 |
भोपाळ | 110.20 | 98.67 |
चंदीगड | 97.93 | 89.50 |
रांची | 96.68 | 94.84 |
लखनौ | 104.25 | 95.57 |
सरकारी तेल कंपन्यांनी सलग पंचविसाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ केलेली नाही. गेल्या महिन्यात 17 जुलैनंतर तेलाच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. या दिवशी पेट्रोलच्या दरात 29 ते 30 पैशांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती.
आज देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचे दर 101.84 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 89.87 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोलची किंमत 107.83 रुपये आणि डिझेलची किंमत 97.45 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 102.08 रुपये, तर डिझेलचे दर 93.02 रुपये प्रति लिटर आहेत. तसेच, चेन्नईतही पेट्रोलचे दर शंभरीपार पोहोचले आहेत. चेन्नईत पेट्रोल 102.49 रुपये लिटर आहे, तर डिझेल 94.39 प्रति लिटरनं विकलं जात आहे.
दादरच्या शिवाजी पार्कचं रुपडं आता पालटणार असून शिवाजी पार्क आता कायमस्वरुपी आकर्षक रोषणाईत न्हाऊन निघणार आहे. विशेष म्हणजे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीचा सर्वप्रथम विनियोग शिवाजी पार्क परिसरात आकर्षक रोषणाईसाठी होणार आहे.
दादरच्या शिवाजी पार्कचं 24 एकर क्षेत्रफळाचं हे मैदान महाराष्ट्राच्या राजकीय , सामाजिक, सांस्कृतीक इतिहासाचं अभिन्न अंग आहे. मैदानात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळ, मीनाताई ठाकरे चौक आणि समोर असलेलं संयुक्त महाराष्ट्र कलादालन यांनी शिवाजी पार्कशी जोडल्या गेलेल्या असंख्य आठवणी याच मैदानात कोरल्या गेल्या आहेत. या मैदानावरच ठाकरे कुटुंबातल्या पहिल्या ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेच मुख्यमंत्री आता आपल्या आमदार निधीतला पहिला खर्च हा शिवाजी पार्कवर करत आहेत.
ज्या प्रवाशांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत, त्यांना मुंबई लोकल रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी सातत्याने मागणी होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय जाहीर केला. लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली होती. त्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात आली आहे. पण ही यंत्रणा नक्की काम कशी करणार, याबाबत सर्वसामान्यांच्या मनात गोंधळ आहे. त्याबाबतची माहिती जाणून घेऊया.
नागरिकांना लोकल रेल्वे प्रवास करणं सोयीचं व्हावं, त्यांना मासिक रेल्वे प्रवास पास मिळावा यासाठी कोविड लसीकरण पूर्ण झालेल्यांची ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 53 रेल्वे स्थानकांवर तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात 109 स्थानकांवर सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत सलग दोन सत्रांमध्ये सुरु होणार आहे.
डोंबिवली : कोरोना निर्बंधांमुळे बंद असलेली मुंबईची जीवनवाहिनी लोकल ट्रेन 15 ऑगस्टपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु होणार आहे. मात्र या लोकलमधून कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवसांचा कालावधी झालेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. या प्रवाशांचे करोना लसीकरण प्रमाणपत्र तपासून त्यांना पास देण्यासाठी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून तयारी सुरु झाली असून उद्या बुधवारी सकाळपासून कल्याण डोंबिवली महापालिकेकडून रेल्वे स्थानकात प्रवाशासाठी मदत कक्ष सुरु केलेत. नागरिकांना आज जरी पास मिळाला असला तरी प्रवास मात्र 15 ऑगस्ट पासूनच करता येणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रात कल्याण, डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली, शहाड, आंबिवली, टिटवाळा या रेल्वे स्थानकावर तिकीट काउंटर शेजारीच महापालिकेकडून स्टोल्स असणार असून आजपासून सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत हे मदत कक्ष सुरु राहणार आहेत.
लातूर शहरातील मध्यवर्ती भागामध्ये एका व्यक्तीचा कोयत्याने मारून निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. आर्थिक व्यवहारातून हा खून करण्यात आला होता. अवघ्या काही तासात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
पार्श्वभूमी
राज्यात 17 ऑगस्टपासून शाळा सुरु; शाळा सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना काय आहेत?
कोरोनाची राज्यातील स्थिती हळूहळू सुधारत असताना शाळा देखील सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहेत. येत्या 17 ऑगस्ट पासून राज्यातील शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावी व ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत.
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र सरसकट आम्ही शाळा सुरू करत नाहीत. ज्या ठिकाणी सुरक्षा आहे त्याच ठिकाणी शाळा सुरू करत आहोत. शिक्षकांचं लसीकरण केलं जाणार आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन निर्णय घेतील. टास्क फोर्सने जे संगितलं आहे ते समोर ठेऊन हा निर्णय घेत आहोत.
कोरोना मुक्त गावांमध्ये 15 जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावी वर्ग सुरू करण्यात आले होते. त्यानंतर या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी ग्रामीण भागांमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. तर शहरी भागांमध्ये इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व इतर शहरी भागात कोरोना परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याबाबत संबंधित महापालिका आयुक्त यांना अधिकार असणार आहे.
सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती विचारात घेऊन व अन्य जिल्ह्यांत देखील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना अधिकार असतील. महापालिका क्षेत्रात शाळा सुरू करण्यासाठी खास समिती गठित केली जाईल. समिती शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेईल. यामध्ये महापालिका आयुक्त हे अध्यक्ष असतील नगरपंचायत, नगरपालिका ग्रामपंचायत, स्तरावर सुद्धा समिती गठीत केली जाणार आहे. यामध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असतील.
शाळा सुरु करण्याला प्राधान्य द्या; WHO च्या मुख्य शास्ज्ञज्ञ सौम्या स्वामीनाथन यांचं आवाहन
जगभरातल्या देशांनी शाळा सुरु करण्याला प्राधान्य द्यावं असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी केलं आहे. कोरोना काळामुळे गेल्या वर्षीच्या मार्चपासून जगभरातील शाळा बंद आहेत. यामुळे मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि नव्या गोष्टी शिकण्याच्या क्षमतेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे असंही त्यांनी सांगितलं.
शाळा बंद राहिल्याने मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि नव्या गोष्टी शिकण्याच्या क्षमतेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता असून यावेळी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर,अंतर्गत गर्दी टाळणे, हाताची स्वच्छता ठेवणे आणि शिक्षकांचे लसीकरण या गोष्टींसह शाळा सुरु करण्यासाठी प्राथमिकता द्यायला हवी असं आवाहन डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी आपल्या ट्विटरवरुन केलं आहे. भारतात गेल्या मार्चपासून शाळा बंद आहेत. पण काही राज्यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात काल 5,609 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 137 रुग्णांचा मृत्यू
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काल 5,609 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 720 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 59 हजार 676 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.8टक्के आहे.
राज्यात काल 137 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 30 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 66 हजार 123 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (4), धुळे (0) , हिंगोली (78), नांदेड (52), अमरावती (76), अकोला (34), वाशिम (18), बुलढाणा (60), यवतमाळ (10), वर्धा (11), भंडारा (1), गोंदिया (2), चंद्रपूर (73), गडचिरोली (26) या नऊ जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13, 892 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मालेगाव, धुळ्यात, नंदूरबार, परभणी, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यामध्ये सर्वाधिक 782 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 99,05, 096 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,63, 442 (12.75 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,13,437 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 860 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -