Breaking News LIVE : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अरुण निगवेकर यांचे निधन

Breaking News LIVE Updates, 23 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Apr 2021 08:04 AM
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अरुण निगवेकर यांचे पुण्यात निधन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू,  विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आणि नॅकचे संस्थापक डॉक्टर अरुण निगवेकर यांचे पुण्यात निधन.

सर्व साखर कारखान्यांनी ऑक्सिजन उभारणीचे प्रकल्प हाती घ्यावेत,  वसंतदादा शुगर इस्टिट्यूटचे सर्व साखर कारखान्यांना पत्र

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना आता सर्व साखर कारखान्यांनी ऑक्सिजन उभारणीचे प्रकल्प हाती घ्यावेत असे पत्र वसंतदादा शुगर इस्टिट्यूटने सर्व साखर कारखान्यांना पाठवलं आहे. ऑक्सिजन प्रकल्पाला वाफ आणि विजेची गरज भासते. साखर कारखाने सुरू असताना वाफ आणि वीज उपलब्ध होते त्यामुळे कारखान्यांना ऑक्सिजन प्रकल्प उभं करायला कमी खर्च लागेल असं त्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीत ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.

येरमाळा येथील येडेश्वरी देवीची यात्रा यंदाही रद्द

कोरोनाव्हायरस या साथीच्या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार याही वर्षी श्री येडेश्वरी देवी ची यात्रा रद्द करण्यात आलेली आहे.तसेच प्रशासन ने घालून दिलेल्या नियमावली प्रमाणे यात्रा काळामध्ये देवीची महापूजा ही  पुजारी मंडळी व मानकरी यांच्या उपस्थितीत विधीवत होणार आहे. तरी भाविक भक्तांनी आपल्या घरीच राहावे व देवीच्या प्रतिमेचे पूजन नेवेद्य दाखवावा. कोणीही मंदिराकडे गर्दी करू नये. असे आव्हान श्री येडेश्वरी देवस्थान मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात येत आहे.

बुलढाणा जिल्ह्यात शासकीय व ख़ाजगी रुग्णालयाचे फायर ऑडिट नाही, उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे यांची माहिती

राज्यात कोरोनामुळे रुग्णालयावर वाढता ताण पडत आहे , जवळपास सर्वच हॉस्पिटल्स आपल्या पूर्ण क्षमतेने सेवा देत असताना मात्र अनेक आगिच्या घटना घडत असताना मात्र प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळे नगर परिषद प्रशासनाने अनेखदा नोटिसेस देऊनही फायर ऑडिट करण्यात आल नसल्याच समोर आलय.


 

विरार दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश 

विरारच्या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या रुग्णालयासोबतच राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. 

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाला भीषण आग, 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू

राज्यातील रुग्णालयांमध्ये आग लागण्याच्या घटना सुरूच असून आता विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. या आगीत 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याचं सांगण्यात येतंय. 

विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग, 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू

विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भीषण आग लागली असून यामध्ये तब्बल 13 रुग्णांचा मृत्यू झालाय. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पार्श्वभूमी

राज्यात लॉकडाऊनला सुरुवात,  1 मेपर्यंत कडक निर्बंध, सरकारकडून नव्या नियमांची घोषणा
राज्यात गुरुवारी (22 एप्रिल) रात्री आठ वाजल्यापासून 'ब्रेक द चेन' अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे कडक निर्बंध असणार आहेत. राज्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून आणखी नियम कठोर करण्यात आले आहेत. सर्व सरकारी कार्यलयात केवळ 15 टक्के उपस्थिती राहणार. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. लग्नकार्यासाठी फक्त 25 लोकच उपस्थित राहू शकतात. कुठल्याही हॉलमध्ये 2 तासांच्या आत लग्नकार्य उरकावं लागणार. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय. लोकल ट्रेनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवासाची मुभा.  खासगी व सार्वजनिक वाहतूकही केवळ अत्यावश्यक लोकांसाठीच. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नागरिकांना प्रवेश बंदी. मात्र सबळ कारण असेल तर प्रवेश दिला जाणार. किराणामालाची दुकाने, भाजीविक्री सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरु राहणार. 


विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग, 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू 
नाशिकमध्ये ऑक्सिजन यंत्रणेतील बिघाडामुळे 24 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला होता. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना मुंबईतील विरारमध्ये घडली आहे. विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भीषण आग लागली असून यामध्ये तब्बल 13 रुग्णांचा मृत्यू झालाय. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आलं आहे. 


कोरोना पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या आज तीन महत्त्वाच्या बैठका, राज्यांचे मुख्यमंत्री, ऑक्सिजन निर्मात्यांशी बातचित
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या दररोज नवे उच्चांक गाठत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक महत्त्वाच्या बैठका सुरु आहेत. पंतप्रधान मोदी आज पुन्हा एकदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तीन प्रमुख आढावा बैठका घेणार आहेत. सध्या देशात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी वर्च्युअल माध्यमातून बैठक घेणार आहेत.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.