Breaking News LIVE :महाराष्ट्राला 21 ते 30 एप्रिलपर्यंत 2लाख 69 हजार रेमडेसिवीर औषधं पुरवली जाणार

Breaking News LIVE Updates, 21 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Apr 2021 07:11 AM
महाराष्ट्राला 21 ते 30 एप्रिलपर्यंत 2लाख 69 हजार रेमडेसिवीर औषधं पुरवली जाणार

महाराष्ट्राला 21 ते 30 एप्रिलपर्यंत 2लाख 69 हजार रेमडेसिवीर औषधं पुरवली जाणार आहे. यामध्ये  झायडस कॅडेला 50 हजार, हेटेरो 50 हजार, मायलॅन 32 हजार, सिप्ला 92 हजार 400, सन 23 हजार, जुबिलन्ट 16 हजार, डॉ. रेड्डी 5 हजार 800 वायल पुरवणार  आहे. 

उत्तर प्रदेश, आसाम, केरळनंतर बिहारकडूनही 18 वर्षांवरील सर्वांसाठी मोफत लसीची घोषणा.

उत्तर प्रदेश, आसाम, केरळनंतर बिहारकडूनही 18 वर्षांवरील सर्वांसाठी मोफत लसीची घोषणा.

नागपूर खंडपीठात रेमडेसिवीर पुरवठ्यासंदर्भात सुनावणी सुरु

नागपूर खंडपीठात रेमडेसिवीर पुरवठ्यासंदर्भात सुनावणी सुरु, 12000 व्हायल रेमडीसीविर आज रात्री किंवा उद्या पर्यंत येणार, त्यातील 5245  आल्या असल्याची  विभागीय आयुक्तांची माहिती, विभागीय आयुक्त म्हणाले, सप्लाय खूप कमी आहे, डिमांड खूप जास्त आहे. पण कोर्टाचे म्हणणे आहे की एकीकडे साठेबाजी होते आहे आणि विषय सप्लायचा नाही तर असमतोलाचा आहे

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांवर देशातील पहिलाच ड्रोन बॉम्ब हल्ला झाल्याचा नक्षलवाद्यांचा दावा

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांवर देशातील पहिलाच ड्रोन बॉम्ब हल्ला झाल्याचा नक्षलवाद्यांचा दावा, नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल जोनल कमिटीचा प्रवक्ता विकल्प याने फोटोसह जारी केले प्रसिद्धीपत्रक, 19 एप्रिलच्या पहाटे बिजापूर जिल्ह्यातील बोत्तालंका आणि पलागुडेम गावांच्या दरम्यान एकूण 12 ड्रोन बॉम्ब हल्ले झाल्याचा दावा, आदिवासी क्षेत्रातील देशातील पहिल्या ड्रोन बॉम्ब हल्ल्याचा 26 एप्रिल रोजी निषेध पाळण्याचे केले आवाहन, 19 एप्रिल हा एक काळा दिवस असल्याचे केले स्पष्ट, 3 एप्रिल रोजी सीआरपीएफच्या मोठ्या तुकडीसोबत झालेला संघर्ष आम्ही उधळून लावल्याने ड्रोन बॉम्बहल्ले करत असल्याचा आरोप, सरकार कोरोना निवारणात अपयशी ठरल्यानंतर आता आदिवासी भुभागांवर ड्रोन बॉम्ब हल्ले करत असल्याचा आरोप, नक्षलग्रस्त भागातील लोकप्रतिनिधी या ड्रोन बॉम्ब हल्ल्याला समर्थन करतात की विरोध हे स्पष्ट करण्याचा इशारा.

तब्बल दोन तास रुग्ण ऑक्सिजनविना, रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप

नाशिकमधील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे 22 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रकृती सुधारल्यानंतरही अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून तब्बल दोन तास ऑक्सिजनचा पुरवठा होत नव्हता असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. 

नाशिक रुग्णालय ऑक्सिजन गळतीमुळे 22 जणांचा मृत्यू, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची माहिती

रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी  सूरज मांढरे यांनी दिली आहे. 

दोषींवर कारवाई करणार, महापौरांचे आश्वासन

नाशिक हॉस्पिटल गळती प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन नाशिकचे महापौर सतिश कुलकर्णी यांनी दिलीय. आतापर्यंत 22 रुग्ण दगावले आहेत.

नाशिक ऑक्सिजन गळतीची उच्चस्तरीय चौकशी होणार-नाशिक मनपा आयुक्त

नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती लागल्याने  11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं नाशिक मनपा आयुक्तांनी सांगितलं. 

नाशिक येथे ऑक्सिजन टॅन्कर लीक 



नाशिक येथे ऑक्सिजन टॅन्कर लीक 

नाशिकमधील डॉ. झाकिर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन भरताना एक टॅन्कर लीक झाल्याने सर्व ऑक्सिजन हवेत मिसळत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्याचे हॉस्पिटल प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. 

रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्या तिघांना मीरा रोड येथे अटक

मीरा रोड येथे रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पकडण्यात आलेल्या तिघांकडून रेमडेसिवीरचे तीन इन्जेक्शन आणि 2.25 लाख रुपयांची कॅश जप्त करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया केली जाणार

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया केली जाणार आहे. काल रात्री मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांना शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आलं आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राज्यातील जनतेला श्रीरामानवमी निमित्त शुभेच्छा

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेला श्रीरामानवमी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. "प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यांच्या जीवनातून जगण्याचा आदर्श निर्माण केला. धैर्य, शौर्य, स्नेह, त्याग, संयम, कर्तव्यनिष्ठेचं महत्व दाखवून दिलं. प्रभू श्रीरामचंद्र मर्यादापुरुषोत्तम होते. श्रीरामभक्ती आणि श्रीरामकथा देशवासियांसाठी जगण्याची ताकद आहे. श्रीरामभक्तीच्या सांस्कृतिक धाग्यानं आपण सारे जोडले गेलो आहोत. श्रीरामभक्तीचं आध्यात्मिक, सांस्कृतिक वैभव जपत असताना प्रभू श्रीरामचंद्रांनी दाखवलेल्या सत्याच्या, लोककल्याणाच्या मार्गावरुन चालण्याचा सर्वांनी प्रयत्न करुया. श्रीरामनवमीनिमित्त प्रभू श्रीरामांना भावपूर्ण वंदन. श्रीरामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा", असं म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

शिर्डीत रामनवमीच्या दिवशी शुकशुकाट, साई मंदिर दर्शनासाठी बंद, मात्र उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई

आजपासून शिर्डीच्या साई मंदिरात 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांसाठी साई मंदिर दर्शनाला बंद करण्यात आले आहे. त्यामुळे साईनगरित शुकशुकाट पाहायला मिळत आहे. यावर्षीचा रामनवमी उत्सव भक्तांविना साजरा होणार आहे. मात्र रामनवमी उत्सवानिमित्त साईबाबा संस्थानाच्या वतीनं साई मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.  

पोहरादेवीत रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

वाशिमच्या पोहरादेवी येथे रामनवमी निमित्त यात्रेचं आयोजन केलं जातं, दरवर्षी लाखोंच्या संख्येनं इथं बंजारा भाविक नतमस्तक होण्यासाठी दाखल होत असतात. मागितलेला नवस फेडतात, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. त्यामुळे पोहरादेवी येथे मंदिर परिसर आणि धर्मपीठावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. संत सेवालाल महाराज आणि जगदंबादेवीची पूजा अर्चा घरी करावी आणि पोहरदेवीला गर्दी न करण्याचं आवाहन महंतांनी केलं आहे. 

नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरात आज रामनवमीची विधिवत पूजा

नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरात आज रामनवमीची विधिवत पूजा केली जात आहे. रामनवमीच्या दिवशी पोद्दारेश्वर राम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा करण्याची आणि त्यानंतर भव्य श्रीराम शोभायात्रा काढण्याची गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त कालावधीची परंपरा आहे.  मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीही शोभायात्रा रद्द करण्यात आली होती. यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर शोभायात्रा पुन्हा रद्द करण्यात आली आहे. मात्र आज रामनवमीच्या दिवशी प्रशासनाकडून घालून देण्यात आलेल्या नियमांच्या आधीन राहून पुजाऱ्यांकडून प्रभू श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांची विधिवत पूजा केली जात आहे. आज सकाळी प्रभू श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींचे शृंगार केल्यानंतर पुजाऱ्यांनी मंदिराचे पट उघडे केले. दुपारी बारा वाजता मंदिरात पुजाऱ्यांद्वारे श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात कोणत्याही भाविकाला प्रवेश दिले जाणार नाहीये. त्यामुळे मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी पूजेचे थेट प्रक्षेपण विविध समाज माध्यमांद्वारे करण्याची व्यवस्था केली आहे...


 

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या गरजा

लॉकडाऊन जवळपास निश्चित झालेला असतानाच अनेकांनी गावची वाट धरली आहे. त्यामुळं मुंबईतील काही प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची एकच गर्दी पाहायला मिळत आहे. परप्रांतीय मजुरांना लॉकडाऊनची धास्ती सतावत असल्यामुळं त्यांनी आपला मोर्चा पुन्हा गावच्या दिशेनं वळवला आहे. 

काळाराम मंदिरात राम जन्मोत्सव भक्ताविना साजरा होणार

नाशिकच्या अतिप्राचीन श्री काळाराम मंदिरात सलग दुसऱ्या वर्षी राम जन्मत्सोव भक्ताविना साजरा होणार आहे.दर वर्षी हजारो भाविक हा जन्म सोहळा आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी मंदिरात उपस्थित असतात. मात्र कोरोनाच्या सावटामुळे भविकाना यंदाही परवानगी नाकारण्यात आलीय. मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

रामनवमी निमित्त पंंढरपुरात विठुरायाच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

आज चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी निमित्त विठुरायाच्या मंदिराला रंगीबेरगी फुले आणि फळांची रंगसंगती साधत आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोरोणाच्या संकटामुळे सध्या विठुराया कुलूपबंद असला तरी मंदिरातील वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरा मात्र नियमितपणे सुरु आहेत. गंगाखेड येथील भाविक गोविंदराव तांदळे यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे. झेंडू, जरबेरा, गुलछडी या फुलांसह अननसाचा वापर कल्पकतेने या सजावटीत करण्यात आला आहे. विठ्ठल रुक्मिणी गाभारा, सोळखंबी, चौखंबी येथे केलेल्या सजावटीमध्ये विठुरायाचे मंदिर खुलून उठले आहे. 

भक्ताविना रामनवमी! शेगाव येथील मंदिरात शुकशुकाट

दरवर्षी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात राम नवमी साजरी करन्यासाठी दोन ते अडीच लाख भाविक येतात पण यावार्षिहि मंदिर बंदच असल्याने आता भक्ताविना रामनवमी साजरी होत आहे. मंदिर बंद असल्याने मंदिराच्या आतच फक्त मोजकया पाच भाविकांच्या उपस्थितीत आज येथील रामनवमी साजरी केली जाणार आहे. दरवर्षी ज्या ठिकाणी  भाविकांच्या भल्या मोठ्या रांगा बघायला मिळतात त्या ठिकाणी आता शुकशुकाट पहायला मिळतोय.

पार्श्वभूमी

राज्यांनी लॉकडाऊनचा अंतिम पर्याय म्हणून वापर करावा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशातील कोरोनाच्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधला. कोरोनाच्या संकटात संयम कायम राखला पाहिजे. नागरिकांनी नियम पाळून देशाला लॉकडाऊनपासून वाचवलं पाहिजे. राज्यांनी देखील लॉकडाऊनचा शेवटचा पर्याय म्हणून वापर करावा. तसेच राज्यांनी मायक्रो कंटेन्मेंट झोनवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. 


राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच, आज तब्बल 62 हजार नवीन कोरोना बाधित तर 54 हजार रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. आज 62 हजार 97 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 54 हजार 224 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 32 लाख 13 हजार 464 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 83 हजार 856 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.14 टक्के  झाले आहे. दरम्यान, आज 519 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर 1.55 एवढा झाला आहे.


18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकारचा मेगाप्लॅन, कसा असेल आराखडा?
देशभरात 1 मे पासून कोरोनाविरोधातल्या लढाईचा एक नवा अंक सुरु होत आहे. सर्वांचं सरसकट लसीकरण करवं ही मागणी गेले अनेक दिवस जोर धरत होती. आता 18 वर्षांवरील नागरिकांच्या सरसकट लसीकरणाची घोषणा तर झाली आहे मात्र, तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार का हा प्रश्न आहे.


केंद्र सरकारचा मोठा निर्णय; रेमडेसिवीर आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात कर हटवला
देशभरात हाताबाहेर जाणाऱ्या कोरोना संसर्गाच्या संकटामध्ये रेमडेसिवीरची मागणी दिवसागणिक वाढतच चालली आहे. परंतु देशातील अनेक राज्यामध्ये रुग्णसंख्या झपाट्यानं वाढल्यामुळं रेमडेसिवीरचा पुरवठा मात्र पुरेशा गरजा पूर्ण करत नाही आहे. त्यामुळंच आता रेमडेसिवीरचा तुटवडा पडू न देता रुग्णांपर्यंत हे इंजेक्शन सहजपणे पोहोचवण्यासाठी म्हणून केंद्रानं एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या निर्णयाअंतर्गत रेमडेसिवीरवरील आयात कर हटवण्यात आला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.