Breaking News LIVE : टेम्पोचे ब्रेक फेल झाल्यानं अपघात, अकोले तालुक्यातील म्हैसवळण घाटातील घटना
Breaking News LIVE Updates, 1 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
टेम्पोचे ब्रेक फेल झाल्यानं अपघात. रस्त्याच्या कडेला 20 फूट दरीत टेम्पो पलटी. अपघातात 1 ठार तर 17 जण जखमी. अकोले तालुक्यातील म्हैसवळण घाटातील घटना. घोटीकडे जाणाऱ्या मार्गावर झाला संध्याकाळी अपघात. बांधकामावर काम करणाऱ्या मजूरांना घेऊन जात असताना अपघात घडल्याची माहिती. जखमींना घोटी जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे सध्याची परिस्थिती नाजूक बनली आहे. म्हणून मंत्रालयात सध्या अभ्यंगताना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आता मुंबईत असलेल्या आकाशवाणी या आमदार निवासांमध्येही अभ्यांगतांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे, तसे परिपत्रक विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी काढले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या जिवाला धोका निर्माण होईल, म्हणून आकाशवाणी आणि विस्तारित आमदार निवासामध्ये बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश देण्यात येणार नाही, असे परिपत्रकात म्हटले आहे.
किल्ले रायगड येथील रोपवे 3 एप्रिल ते 18 एप्रिल या दरम्यान बंद राहणार. रोप वेच्या देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार. रायगड रोपवे कंपनीच्या व्यवस्थापनाची माहिती.
जिल्ह्यातील खामगाव शहरातील निर्मल चौकात आज सायंकाळी 6.30 वाजता दोन रिक्षा चालकात प्रवासी बसवण्याच्या वादातुन एका रिक्षा चालकाने दुसऱ्या रिक्षा चालकाची हत्या केल्याची घटना घडली. या वादामुळे निर्मल चौकात तणाव निर्माण झालाय.
किल्ले रायगड परिसरातील 21 गावातील पाणी प्रश्ना संदर्भात बैठक, नाना पाटेकर उपस्थित राहणार. पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न. जिल्हाधिकारी, संभाजीराजे भोसले उपस्थित राहणार, शुक्रवार सकाळी 11 वाजता पाचाड येथे बैठक.
किल्ले रायगड परिसरातील 21 गावातील पाणी प्रश्ना संदर्भात बैठक, नाना पाटेकर उपस्थित राहणार. पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न. जिल्हाधिकारी, संभाजीराजे भोसले उपस्थित राहणार, शुक्रवार सकाळी 11 वाजता पाचाड येथे बैठक.
12 वी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट 3 एप्रिलपासून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन उपलब्ध होणार,
एप्रिल-मे 2021 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत (Hall Tickets) परिपत्रक बोर्डाकडून जाहीर करण्यात आले आहे.
त्यानुसार 23 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या 12 वी बोर्डाचे परिक्षेचे हॉल तिकीट 3 एप्रिल शनिवार पासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे
विद्यार्थ्यांना हे हॉल तिकीट प्रिंट करून महाविद्यालय, शाळांनी द्यायचे आहेत
हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्यध्यापक , प्राचार्य यांची सही शिक्का विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे
विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटमध्ये विषय, नाव इतर गोष्टींची दुरुस्ती असल्यास महाविद्यालय, शाळांनी त्या दुरुस्त करण्यास मंडळाकडून दुरुस्त करायचे आहे
नांदेड येथे हल्ला मोहल्ला मिरवणुकी दरम्यान घडलेल्या दंगलीत 400 पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. सदर दाखल झालेले गुन्हे हे चुकीच्या पद्धतीने दाखल झाले असून निर्दोष लोकांवरील गुन्हे मागे घेण्याची शीख समुदायाची मागणी आहे. यात संशयित म्हणून पोलिसांनी नागिना घाट गुरुद्वारा लंगर चे पुजारी परमजीत सिंग यांना अटक केल्यामुळे शीख समाजाकडून संताप व्यक्त होतोय. नांदेड येथे पोलिसांवर झालेल्या हल्ला प्रकरणात पोलिसांनी सुरु केलेल्या अटकसत्राविरोधात शीख समाजातील महिलांचा आज आक्रोश पहायला मिळालाय. या बाबतीत आज शेकडो महिलानी संचखंड गुरुद्वारामध्ये एकत्र येऊन पोलिसांच्या कार्यवाहीचा निषेध केलाय. पोलिसांवर हल्ला प्रकरणात दोषी नसलेल्या तरुणांना या प्रकरणात गोवल्या जात असल्याचा आरोप महिलानी केलाय. संत बाबा कुलवंत सिंघजी यांची देखील महिलानी भेट घेतली. पोलिसांवर झालेल्या हल्यानंतर पोलिसांनी 18 तरुणांना ताब्यात घेतले असून 400 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातच पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरु केली आहे. मात्र, दोषी नसलेल्या तरुणांना अटक करुन विनाकारण पोलीस मारहाण करत असल्याचा आरोप महिलांनी केलाय.
पुणे: पुण्यात लाचखोर महिला न्यायाधीशाला लाचलुचपत विभागाकडून अटक, अर्चना दीपक जतकर असं महिला न्यायाधीशाचे नाव, मावळ न्यायलायात सुरु असलेला फौजदारी खटला मॕनेज करुन रद्द करण्यासाठी एका महिलेच्या माध्यमातून 50 हजार लाच स्विकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल
काँग्रेसने बोलवलेली मंत्री आणि जिल्हाध्यक्षची बैठक रद्द,
कोरोनाच्या रुग्ण सांख्य वाढीच्या पार्शवभूमीवर काँगेसने बोलवलेली बैठक रद्द,
महाराष्ट्रचे काँग्रेस प्रभारी एच के पाटील दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते,
त्यावेळी काँग्रेसचे मंत्री आणि महत्वाच्या नेत्याची बैठक बोलवण्यात आली होती
आजपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यात येते आहे मात्र नाशिक शहरात कालपासून लसीचा तुटवडा जाणवतोय. सध्या महापालिकेचे 27 लसीकरण केंद्र आहेत तर 18 खासगी रुग्णालयात नागरिकांना लस दिली जाते आहे. मात्र आज यातील महापालिकेच्या फक्त तीनच केंद्रावर लस दिली असून आज संध्याकाळ पर्यंत आपल्याला 50 हजारांचा लसीचा साठा उपलब्ध होईल आणि लगेच आज संध्याकाळ किंवा उद्या सकाळपासून पूर्ण क्षमतेने आपण लसीकरण सुरु करू असं स्पष्टीकरण महापालिका आयुक्तांनी दिलंय.
काँग्रेसने बोलवलेली मंत्री आणि जिल्हाध्यक्षची बैठक रद्द, कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढीच्या पार्शवभूमीवर काँगेसने बोलवलेली बैठक रद्द, महाराष्ट्रचे काँग्रेस प्रभारी एच के पाटील दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी काँग्रेसचे मंत्री आणि महत्वाच्या नेत्याची बैठक बोलवण्यात आली होती
मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली वागदे येथे पेट्रोल पंप व गोपुरी आश्रमाच्या समोर माल वाहतूक करणारा कंटेनरचा अपघात झाला. चालकाला या वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. या अपघातात चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. चालकाला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं असून महामार्ग पोलीस व घटनास्थळी दाखल झाले आहेत. वळणाच्या ठिकाणी महामार्गाचा एक मार्ग बंद असल्याने वळणावर एकेरी वाहतूक सुरू असल्याने हा अपघात झाला आहे. वागदे पेट्रोल पंपासमोर वळणाच्या ठिकाणी महामार्गावर रस्ता डायव्हर्ट केल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना अनेक अडचणींचा सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे वळण अपघातास कारणीभूत ठरत आहे.
सिंधुदुर्गातील आंबोली परिसरात गेले काही दिवस स्थिरावलेल्या जंगली हत्तीकडून शेतीचं नुकसान केलं जातं आहे. आंबोली गावातील गडदूवाडी परिसरात केळी बागायतीचे मोठ्या प्रमाणात हत्ती कडून नुकसान केले आहे. रात्रीच्या वेळी भरवस्तीत हा हत्ती फिरत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. आंबोली परिसरात हत्तीला ऊस, केळीची बागायतीत खाद्य मिळत असल्याने हत्ती गेली अनेक दिवस आंबोली परिसरात स्थिरावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून रश्मी ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. रश्मी ठाकरे यांच्यावर सध्या HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना कोविड संसर्गाची लागण झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनकरून रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.
राज्यातील साखर उत्पादनाचा विक्रम झाला आहे. ३१ मार्चअखेरपर्यंत राज्यातील साखर कारखान्यांना उत्पादित केलेली साखर शंभर लाख टनांवर जाऊन पोहोचली आहे. त्याशिवाय गत वर्षातील शिलकी साखर साठे पाहता कारखान्याची गेदामे तुडूंब भरली आहेत. साखरेला अपेक्षित मागणी नसल्यामुळे साखरेच्या भावाचा आणि येणार्या हंगामात ऊस दराचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
नांदेडमध्ये आज पासून लॉकडाऊनला शिथिलता देण्यात आली आहे. जिल्ह्यात 25 मार्च ते 5 एप्रिल पर्यत सुरू असणाऱ्या लॉकडाऊनला 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पण 6 एप्रिलपासून 15 एप्रिल दरम्यान काही अंशी शिथिलता देण्यात आली आहे. यात नागरिकांनी मास्कचा वापर ,फिजिकल डिस्टन्स बंधनकारक असणार, या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याना 500 रुपये दंड ठोटावण्यात येणार आहे.
आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये 30 तर आसाममध्ये 39 जागांसाठी आज मतदान होणार आहे.
पार्श्वभूमी
दिवसभरात नव्या कोरोनाबाधितांमध्ये भीतीदायक वाढ; मृतांचा आकडाही वाढला
कोरोना विषाणू साऱ्या विश्वात थैमान घालत असतानाच महाराष्ट्रावरही कोरोनाची दुसरी लाट धडकली आहे. ज्यामुळं नियंत्रणात येऊ पाहणारा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा एकदा झपाट्यानं वाढू लादगला आहे. बुधवारी राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत मोठी भर पडल्याचं पाहायला मिळालं. राज्याच्या आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार बुधवारी दिवसभरात संपूर्ण राज्यात तब्बल 39 हजार 544 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ज्यामुळं राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 28,12, 980 वर पोहोचला आहे.
आजपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना मिळणार लस
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आजपासून देशातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे दरम्यान, कोरोनानं पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं बोलंलं जात आहे. अशा परिस्थितीत राज्य आणि केंद्र सरकार कोरोनापासून कसा बचाव करता येईल यावर पूर्ण लक्ष देत आहे. त्यासाठी लस हा सर्वात उत्तम मार्ग असून सर्वांचं लसीकरण करणं आवश्यक असल्याचंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 10 रुपयांनी कपात; नवे दर आजपासून लागू
एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमती गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आता एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 10 रुपयांची कपात करण्याची घोषणा इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने केली आहे. हे नवीन दर आजपासून म्हणजे 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. गेल्या काही महिन्यांत गॅस सिलेंडर्सच्या किंमतीत झालेली वाढ आणि आता कमी करण्यात आलेली किंमत यात बरीत तफावत आहे. परंतु त्यातून थोडा का होईना दिलासा सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे.
जवळपास सर्व बचत योजनांमध्ये व्याजदरात कपात
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच उद्यापासून सुरू होणाऱ्या 2021-22 मध्ये लहान बचत योजनांमध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अशा सर्व योजनांवरील व्याज दर कपात करण्याचे जाहीर केले आहे. हे नवीन दर उद्यापासून लागू होणार असून 30 जून 2021 पर्यंत लागू असतील. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सामान्यांना झटका बसला आहे. जवळपास सर्व बचत योजनांमध्ये व्याजदरात कपात करण्यात आलीय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -