Breaking News LIVE : राज्यात आज 58993 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

Breaking News LIVE Updates, 09 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Apr 2021 07:18 AM
राज्यात आज 58993 कोरोना बाधित रुग्णांची वाढ

राज्यात आज 58993 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 45391कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2695148 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 534603 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.96% झाले आहे.

सिल्वर ओक इथे झालेल्या बैठकीत शरद पवार यांची पक्षातील नेत्यांवर नाराजी

सिल्वर ओक इथे झालेल्या बैठकीत शरद पवार यांची पक्षातील नेत्यांवर नाराजी. अनिल देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नसल्याने नाराजी. देशमुख यांच्यासाठी माध्यमांमध्ये भूमिका माध्यमात मांडण्यात पक्ष कमी पडला यावरुन पवारांनी नाराजी व्यक्त केली. सीबीआय चौकशीस अनिल देशमुख सामोरे जातील तेव्हाही  पक्ष पाठीशी राहील असे पवारांनी बैठकीत केले स्पष्ट. बैठकीला जयंत पाटील, वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, प्रफुल पटेल, अनिल देशमुख हे देखील उपस्थितीत होते.

'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या 'रियालिटी शो'चा विजेता अथर्व कर्वे राष्ट्रवादीच्या चित्रपट आघाडीत करणार प्रवेश

'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या 'रियालिटी शो'चा विजेता अथर्व कर्वे राष्ट्रवादीच्या चित्रपट आघाडीत करणार प्रवेश. या आठवडाभरात ठरणार प्रवेशाचा मूहूर्त. अनेक मराठी चित्रपट, मालिका, नाटकं आणि वेब सिरीजमधून अथर्वनं दाखवली अभिनयाची चुणूक. राष्ट्रवादी चित्रपट आघाडीतील वरिष्ठ सुत्रांची माहिती.

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यात व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील व्यापाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन व साथरोग अधिनियमानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशीरा गुन्हे दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी पोलिस हवालदार गणेश तुर्के ( वय . 48 ) यांनी फिर्याद दिली आहे . त्यावरुन फेडरेशन आफ ट्रेड असोसिएशन आफ पुणेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्यासह 58 जणांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन व साथरोग अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध व्यापाऱ्यांनी गुरुवारी सकाळी लक्ष्मीरोडवर आंदोलन केले होते .

11 एप्रिल रोजी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलली

राज्यात 11 एप्रिल रोजी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलली. 

ज्येष्ठ सीपीआय नेत्या कॉम्रेड सुंदर नवलकर यांचं वृद्धापकाळाने निधन

ज्येष्ठ सीपीआय नेत्या कॉम्रेड सुंदर नवलकर यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. त्या 100 वर्षांच्या होत्या. कम्युनिस्ट चळवळीच्या अत्यंत कर्मठ, लढाऊ नेत्या अशी त्यांची ओळख होती. त्यांनी महाराष्ट्रात सीपीआयएमएल संघटनेची स्थापना केली. ट्रेड युनियनच्या कार्यकर्त्यांमधे, कामगारांमध्ये त्यांचं नाव अत्यंत लोकप्रिय होतं. विविध कम्युनिस्ट नेत्यांचं साहित्य हिंदी आणि मराठीतून निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. अनेक विदेशी कम्युनिस्ट नेत्यांचं साहित्यही त्यांनी मराठी आणि हिंदीत भाषांतर केलं. त्यांनी अमेरिकन भांडवलशाही विरोधात आवाज उठवला होता. तसंच मुंबईत तरुण मुलांसाठी स्टडी सर्कल आणि बौद्धिक वर्ग चालवत होत्या.

MPSC परीक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली

MPSC परीक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना 11 एप्रिल रोजी होणार परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. त्या पार्शवभूमीवर ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि अधिकारी यांच्याबरोबर व्हिसीमार्फत बैठक होणार आहे.


 


 

निवडणुका असणाऱ्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर निर्बंध घाला, मनसेची मागणी

निवडणुका असणाऱ्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर निर्बंध घाला, मनसेची मागणी, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडूत राजकीय सभांमध्ये होणाऱ्या गर्दीवर मनसेचं बोट

धुळे महापालिका हद्दीतील लसीकरण मोहीम पूर्णपणे ठप्प

धुळे शहरासह जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना दुसरीकडे मात्र महापालिका हद्दीतील सगळ्यात केंद्रांवरील लसीकरण मोहीम बंद करण्यात आली आहे. लसींचा साठा संपल्याने ही लसीकरण मोहीम बंद करण्यात आल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी धुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाला 36 हजार लसींचे डोस प्राप्त झाले होते मात्र सध्या लसींचा साठा संपल्याने ही लसीकरण मोहीम बंद करण्यात आली असून लवकरात लवकर पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 

सचिन वाझे आणि विनायक शिंदेची डायरी तपासू द्या, सीबीआयची विशेष एनआयए कोर्टात मागणी; कोडवर्डमध्ये वसुलीची माहिती असल्याचा संशय

'सचिन वाझे आणि विनायक शिंदेची डायरी तपासू द्या', सीबीआयची विशेष एनआयए कोर्टात मागणी. डायरी सध्या एनआयएच्या ताब्यात, डायरीत मुंबईतील हॉटेल्स, बार आणि पब्जच्या नोंदी. कोडवर्डमध्ये वसुलीची माहिती असल्याचा संशय. सचिन वाझेची एनआयए कोठडी आज संपत असल्याने कोर्टापुढे हजर करणार 

अजित पवार यांचा भाजप आणि मोहिते पाटील यांना दणका, संतोष नेहतराव आणि सुरेश नेहतराव राष्ट्रवादीत प्रवेश करणार

अजित पवार यांनी भाजप आणि मोहिते पाटील यांना दणका दिला आहे. पंढरपूर येथील मोहिते पाटील समर्थक संतोष नेहतराव आणि परिचारक गटाचे बांधकाम सभापती नगरसेवक सुरेश नेहतराव यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली. मंगळवेढा इथे हुलजंती इथल्या सभेत त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे. संतोष नेहतराव यांनी गेल्या वेळी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पंढरपूर शहरातून 18 हजार मते घेतली होती

पुण्यात आरोग्य आणीबाणी

पुण्यात आरोग्य आणीबाणी, लस आणि रेमडेसिवीरचा तुटवडा पुणे मनपा आयुक्तांची माहिती. येत्या काळात व्हेंटिलेटर बेड वाढवण्याचे प्रयत्न सुरु 

कोल्हापूरातील कंजारभाट समाजातील दोन सख्ख्या बहिणींची कौमार्य चाचणी

राजारामपुरी पोलीस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल. बेळगावातील सासकरच्या लोकांनी घेतली कौमार्य परीक्षा. एक बहीण अपयशी ठरल्यानंतर दोघींनाही माघारी धाडलं. 

मुंबईतील सर्वात मोठं बीकेसी लसीकरण केंद्र लसीअभावी बंद

सकाळच्या सत्रातच मुंबईकर लस घेण्यासाठी आले, पण लसीचा साठा नसल्यामुळं नागरिकांना ल मिळू शकलेली नाही. काही रुग्णालयांमध्ये अवघा एक दिवस पुरेल इतकाच लस पुरवठा. लस संपल्याची पूर्वकल्पना का दिली नाही, संतप्त मुंबईकरांचा सवाल 

सरपंचपदी निवड झाल्यानंतर डीजेच्या तालावर गर्दीसह मिरवणूक, अकोल्यातील आलेगावात कोरोना नियमांचे धिंडवडे

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या आलेगाव येथे काल कोरोना नियमांचे अक्षरश: धिंडवडे काढण्यात आले. याला निमित्त ठरलीय गावातील सरपंचपदाची निवडणूक. सरपंचपदाच्या निवडणुकीत गोपाल महल्ले विजयी झाले. मात्र, नव्या सरपंच साहेबांना सत्तेच्या मस्तीत कोरोना नियमांचा विसर पडला अन् डिजेच्या तालावर मोठ्या गर्दीसह गावभर मिरवणूकही काढली. या मिरवणुकीवेळी चान्नी पोलीस स्टेशनच्या ठाणेदारासह मोठा पोलीस बंदोबस्त होता हे विशेष. जिल्ह्यात कोरोनामुळे जमावबंदीचे आदेश असताना हे नियम धाब्यावर बसवले गेले. दरम्यान, चान्नी पोलिसांनी सरपंच गोपाल महल्लेंसह 20 जणांवर जमावबंदी नियमाचं उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात 300 कोविशिल्ड आणि 3700 कोवॅक्सिन उपलब्ध, 91 केंद्रावरचे लसीकरण बंद

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या 300 कोविशिल्ड आणि 3700 कोवॅक्सिन उपलब्ध आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 98 पैकी 91 लसीकरण केंद्रांवर लस देण्याचे काम बंद असून फक्त 7 ठिकाणी लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात 95 ऑक्सिजन बेड्स पैकी केवळ 10 उपलब्ध आहे तर 50 व्हेंटिलेटर बेड्स पैकी 3 उपलब्ध आहेत.

11 रोहींचा एकाच विहिरीत पडून मृत्यू, वाशिम जिल्ह्यात दुर्दैवी घटना

पाण्याच्या शोधात असलेल्या 11 रोहींचा एका विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील वरदरी खुर्द इथं घडली. काटेपूर्णा अभयारण्याच्या जवळ ही घटना घडली असून ही विहीर जमिनीच्या लेवलला असून रोहींचं टोळक पाण्याच्या शोधात  एकाच ठिकाणी पडल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. वन विभागाने सगळ्या मृत रोहींना बाहेर काढलं असून त्यामध्ये 11 रोही मृत आढळल्या आहेत.  शासकीय नियनुसार पंचनामा करून  मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे.


 

अजित पवारांच्या पंढरपूरमधल्या सभेतील गर्दीप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पंढरपूर इथल्या सभेत प्रमाणापेक्षा जास्त गर्दी केल्याप्रकरणी आयोजक श्रीकांत शिंदे यांच्यावर 188 आणि 269 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोंदियात थाटेझरी गावच्या जंगलात आग; तीन मजुरांचा मृृत्यू, दोन जखमी

गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणार पीटेझरी गेटला लागून असलेल्या थाटेझरी गावच्या जंगलात काल संध्याकाळी आग लागली. यात तीन हंगामी मंजुराचा होरपळून मृत्यू झाला तर दोन मजुरांवर नागपूर इथे उपचार सुरु आहेत. हे गाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रात असल्याने वन्य जिवांना देखील याचा फटका बसला. राकेश मडावी (वय 24 वर्षे), रेकचंद राने (वय 45 वर्ष) आणि सचिन श्रीरगे (वय 22 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. विजय मरसकोल्हे (वय 42 वर्ष )आणि राजेश हराम (वय 25 वर्ष) अशी जखमींची नावं आहेत. 

यवतमाळमधील टिपेश्वर अभयारण्य 30 एप्रिलपर्यंत बंद

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 'ब्रेक द चेन' अंतर्गत घेतलेल्या निर्णयामुळे, टिपेश्वर अभयारण्य बंद ठेवण्याचा निर्णय विभागीय वन अधिकारी यांनी घेतला आहे.

बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाच्या लसीचा तुटवडा

बुलढाणा जिल्ह्यात आजच्याच दिवशी पुरतील इतका लसीचा साठा उपलब्ध असून उद्या कदाचित अनेक लसीकरण केंद्रे बंद पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकूण 610 ऑक्सीजन बेड्स उपल्ब्ध आहेत त्यापैकी 214 रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. 

नागपुरात कोवॅक्सिनचा तुटवडा, सहा लसीकरण केंद्रे आज बंद राहण्याची शक्यता

नागपुरात कोवॅक्सिनचा तुटवडा झाल्यामुळे कोवॅक्सिनचे सहा लसीकरण केंद्र आज बंद राहण्याची शक्यता आहे. तर कोविशील्ड लसीचा दोन दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक असल्याने त्याचे केंद्र सुरु राहतील. कोवॅक्सिनचा पुरवठा आज होण्याची शक्यता असून तसे झाल्यास कोवॅक्सिनचे नागपुरातील सहा केंद्रे उद्या सुरु होण्याची शक्यता आहे.

पार्श्वभूमी

देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


कोविड लढ्यात राजकारण करणाऱ्यांना समज द्यावी, मुख्यमंत्री ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती
देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने पसरत आहे. महाराष्ट्रानंतर दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, तमिळनाडू, उत्तर प्रदेशसह काही राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी वर्च्युअली संवाद साधला. यावेळी देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करून, या लढ्यात कुठलेही राजकारण आणू नये म्हणून सांगावे अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.


राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच, गुरुवारी 56 हजार 286 रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. राज्यात आज दिवसभरात 56 हजार 286 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 376 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज 36 हजार 130 जण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईतही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताच आहे. शहरात आज 8 हजार 938 रुग्ण आढळले आहेत.


ठाण्यात कोविड चाचणीसाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या रांगा
मागील संपूर्ण आठवडा रुग्णाची संख्या ही मनात धडकी भरविणारी ठरत आहे. रुग्णसंख्येच्या वाढीसोबतच रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढला आहे. ठाण्यात रुग्णांना बेड अपुरे पडत आहेत. यासर्व गोष्टींमुळे आणि पालिकेने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची केल्याने आपण कोरोनाचे शिकार झाले आहोत काय? याची चाचपणी करण्यासाठी विविध चाचणी केंद्रावर पालिका आस्थापना आणि अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी यांनी आज गर्दी केलेली बघायला मिळाली. ठाणे महापालिका हद्दीत कोरोना चाचणीचे 12 केंद्र आहेत. यातील मानपाडा, टेम्भी नाका, कळवा, वागळे इस्टेट, सावरकर नगर, लोकमान्य नगर अशा विविध केंद्रावर आरटीपीसीआर आणि अँटीजेन अशा चाचण्या करण्यासाठी गर्दी झालेली होती. 


अजित पवार यांच्या नाईट डिप्लोमसीमुळे भाजपची हवा टाईट, रात्रभर भेटीगाठी
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल (8 एप्रिल) दिवसभर सभांचा धडाका लावल्यानंतर रात्री पंढरपूरमध्ये काही राजकीय गोळाबेरीज करणाऱ्या भेटी घेतल्या. या भेटींमुळे भाजपाची हवा टाईट झाली असून अजित पवार यांनी ही निवडणूक किती प्रतिष्ठेची केली आहे हे यावरुन दिसून आले. पहिल्यांदा धनगर समाजाचे नेते आदित्य फत्तेपूरकर, यानंतर मनसेचे राज्य समन्वयक आणि शॅडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे आणि सर्वात शेवटी परिचारक गटाच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांची भेट घेतली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.