Breaking News LIVE : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथिल

Breaking News LIVE Updates, 07 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Apr 2021 06:51 AM
पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 12090 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 12090 नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर 70 बाधितांचा मृत्यू...

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथील

 


पंढरपूर --  पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सोलापूर जिल्ह्यात जारी करण्यात आलेली संचारबंदी 16 एप्रिल 2021 रोजीच्या रात्री आठ वाजल्यापासून ते 18 एप्रिल 2021 रोजीच्या सकाळी सात वाजेपर्यंत शिथील करण्यात आली आहे. मात्र जमावबंदीचे आदेश लागू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले आहेत.


 पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिलला मतदान आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी  आज आदेश जारी केला आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम, दिवसभरात तब्बल 6 हजार 508 नवे कोरोना रुग्ण, 34 रुग्णांचा मृत्यू,आजवरचा एका दिवसात रुग्ण वाढ आणि मृत्यूचा उच्चांक, एकीकडे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हानाचे डोंगर उभे असताना रुग्ण वाढीचा आलेख चढताच,


 

सचिन वाझेंची CBI चौकशी सुरू

सचिन वाझेंची CBI चौकशी सुरू, NIA ऑफिसमध्ये CBIच्या टीमकडून वाझेंची चौकशी

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, गेल्या 24 तासात 3161 नमुने तपासणीतून 668 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

सातारा शहर व सातारा तालुक्यातील आठवडी बाजार बंद

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग बाधीत रुग्ण मोठया प्रमाणात आढळत असल्याने सातारा शहर व सातारा तालुक्यातील सर्व आठवडी बाजार पुढील आदेश हाईपर्यंत  बंद करण्यात आलेला आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच याबाबत स्थानिक प्राधिकरण तसेच पोलीस विभाग यांनी योग्य ती कार्यवाही करावी. या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निर्दशनास आल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदी नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सातारा उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले आहे.

प्राथमिक चौकशीत अनिल देशमुख निर्दोष आढळले तर मंत्रिमंडळात पुन्हा दिसतील- जयंत पाटील

प्राथमिक चौकशीत अनिल देशमुख निर्दोष आढळले तर मंत्रिमंडळात पुन्हा दिसतील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांचं वक्तव्य

अनिल देशमुख यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

अनिल देशमुख यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, देशमुखांना सुप्रीम कोर्टात कुठलाही दिलासा नाही

येत्या रविवारी 11 एप्रिलची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात खासदार नवनीत राणांचं राज्यपालांना पत्र



 


येत्या रविवारी म्हणजे 11 एप्रिलला एमपीएससीची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा पार पडणार आहे. मात्र कोरोनाचं संकट लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात खासदार नवनीत राणा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्र लिहिलं आहे.

बीड जिल्ह्यात दिवसभरात 711 कोरोना बाधित रुग्ण आढळले

कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा रोज 500 पेक्षा जास्त कोरणा बाधित रुग्ण आढळून येत आहेत आज तब्बल 711 कोरोना रूग्ण आढळून आल्याने नागरिकांतून भीती व्यक्त केली जात आहे. 


बीड जिल्ह्यातील आज 5 हजार 899 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 711 अहवाल पॉझिटिव्ह तर 5 हजार 188 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात 158, आष्टी 102, बीड 189, धारूर 11, गेवराई 54, केज 45, माजलगाव 56, परळी 44, पाटोदा 22, शिरूर कासार 16, वडवणी 14 असे रूग्ण आढळून आले आहेत.

सुप्रीम कोर्टात अनिल देशमुख प्रकरणात सुनावणीला सुरूवात

सुप्रीम कोर्टात अनिल देशमुख प्रकरणात सुनावणीला सुरूवात, महाराष्ट्र सरकारच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडत आहेत तर कपिल सिब्बल हे देशमुख यांच्या वतीने बाजू मांडतील

कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंद्राचं पथक बुलढाण्यात दाखल

बुलढाणा : जिल्ह्यातिल कोरोनाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी केंद्राचं आरोग्य विभागाचं दोन सदस्यीय पथक बुलढाणात दाखल झाले आहे. या पथकात डॉ. नवीन वर्मा आणि डॉ. धृति सुंदर दास या सदस्यांचा समावेश आहे. जिल्ह्याधिकारी यांच्या दालनात या सदस्यांची आरोग्य अधिकारी, आरडीसी यांच्या समवेत बैठक संपन्न झाली आणि तात्काळ जिल्हा मुख्यल्याच्या कोविड सेंटर, कोविड लॅब, जिल्हा रुग्णालय यांची तापासणी आणि निरीक्षण सुरु झालं आहे. उद्यापासून 5 दिवस जिल्ह्यातील विविध भागात दौरा करुन कोरोनाची परिस्थितीचा आढावा घेणार आहे. त्यानंतर जिल्ह्याचा सविस्तर आढावा केंद्र सरकारकडे पाठविल्या जाणार आहे. 

बार्शीतील शाह हॉस्पिटलमध्ये असलेल्या केमिस्टचे व्यवहार तत्काळ थांबवले

सोलापूर : बार्शीतील शाह हॉस्पिटलमध्ये असलेल्या शाह ड्रग्स मेडिकलमधील व्यवहार तात्काळ थांबवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. बार्शीतील शहा ड्रग्समध्ये काल कागदोपत्र न घेता रेमेडीसिविर इंजेक्शन विकल्याची तक्रार प्राप्त झाली होती. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ देखील रेकॉर्ड करण्यात आलेला होता. तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा अन्न आणि औषध प्रशासन सहायक आयुक्तांनी बार्शीत जाऊन आज पाहणी केली. तहसीलदार तसेच अन्न आणि औषध प्रशासनाच्या संयुक्त पाहणीत विविध त्रुटी आढळलल्या आहे. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन कागदपत्रे विना विकल्याने या मेडिकलमधील सर्व प्रकारची खरेदी-विक्री बंद केल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. तसेच मेडिकल चालकाला या संदर्भात लेखी नोटीस देण्यात आली असून त्यांची बाजू ऐकून घेतली जाईल. यामध्ये स्पष्टकरण न मिळाल्यास मेडिकल परवाना रद्द किंवा निलंबित करण्यात येईल अशी माहिती देखील सोलपूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

मालेगाव शहरात लॉकडाऊन मागे घ्यावा या मागणीसाठी एमआयएमचा मोर्चा

मालेगाव शहरात लावलेला लॉकडाऊन मागे घ्यावा या मागणीसाठी आज एमआयएम तर्फे मोर्चा काढण्यात येऊन धरणे आंदोलन करण्यांत आलं. जमाव बंदीचा आदेश आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करता आज एमआयएम नगरसेवक आणि महापालिका गटनेत डॉक्टर खालीद परवेज यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आणि शहर पोलीस स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ धरणे आंदोलन करण्यात आले. येत्या काही दिवसांनी रमजान महिना सुरु होणार आहे. अशावेळी अनेक छोटे, मोठे व्यावसायिक रोजी रोटीसाठी काम करीत असतात. मात्र शासनाने लावलेल्या लॉकडाऊनमुळे या व्यावसायिकांना आपले व्यवहार बंद ठेवण्याची वेळ आल्याने लॉकडाऊन मागे घ्यावा, अशी मागणी करत जेल भरो आंदोलन करण्यात आले. विनापरवानगी आणि प्रतिबंधात्म आदेशाच उल्लंघन केल्याप्रकरणी डॉक्टर खालीद परवेज यांच्या सह एमआयएमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

केंद्रीय पथक बीडमध्ये दाखल, जिल्हा रूग्णालयाची केली पाहणी, कोरोना स्थितीचा घेतला आढावा

बीड : बीड  जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय पथक बीडमध्ये दाखल झाले. शहरात येताच पथकाने जिल्हा रूग्णालयास भेट देऊन तब्बल दोन तास पाहणी केली. यावेळी पथक प्रमुख डॉ. रक्षा कुंडल, डॉ.अरविंद सिंग कुशवाहानी  यांजिल्हा रूग्णालयात तब्बल दोन तास पाहणी केली. यावेळी रूग्णांशी संवाद साधून सद्यस्थितीचा आढावा घेतला. हे पथक कोरोना उपाययोजनासंबंधी आढावा घेत असून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरु होती. पुढील चार दिवस हे पथक बीडमध्ये ठाण मांडून असणार आहे. कोराना परिस्थितीचा आढावा घेताना रूग्ण संख्या, मृत्यू संख्या, लसीकरण परिस्थितीची माहिती घेऊन केंद्र शासनाला सादर करणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जे जे रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जे जे रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. तर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही आज कोरोना लस घेतली

महाराष्ट्राला बदनाम करण्याचा हा प्रयत्न, कोरोना लढ्याबाबत केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र एक मोठं राज्य आहे, इथं सर्व प्रकारचा ताण आहे. वाढतं संक्रमण, आर्थिक संकट राज्यापुढं आहे. हा सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. 

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी दुपारी बैठक बोलावली

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे आज दुपारी चार वाजता बैठक घेणार आहेत. रेमडेसिवीर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित असतील.

नांदेड येथे रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार; चार जणांना अटक

नांदेड : कोरोना रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रेमडिसिवीर इंजेक्शन 100 एमजी चा काळाबाजार करणाऱ्या चौघांना 7 रेमडिसिवीर इंजेक्शनसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढल्याने कोरोनावर अत्यावश्यक असणाऱ्या रेमडिसिव्हर इंजेक्शनची मागणी वाढली याचा फायदा घेत काही औषध विक्रेत्यांनी ज्यादा दराने दाम दुप्पट किमतीत रेमडिसिवीर इंजेक्शन विकत आहेत.तर काहींनी हे इंजेक्शन विकण्यासाठी औषध विक्रेत्यांचे रॅकेट तयार केले आहे. हे रॅकेट गरजू रुग्णांचा नातेवाईकांना हेरून अडवणूक करून जास्त भावाने रेमडिसिव्हर इंजेक्शन विक्री होत होती. याविषयी जिल्हाधिकारी व अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप  कोणतीही कार्यवाही झाली नव्हती.त्यामुळे सामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होता.दरम्यान नांदेड येथील शिवसैनिक गौतम जैन यांच्या नातेवाईकांना रेमडिसिवीर इंजेक्शन 100 एमजी ची आवश्यकता होती.या औषधांची मूळ किंमत 5 हजार 400 रुपये असताना विक्री करणारा 8 हजार रुपये दराने औषधी देत होता.सदर बाब पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांना निदर्शनास आणून दिली.त्यानुसार  स्थानिक गुन्हे शाखेने  कार्यवाही करत वीरभद्र स्वामी,गोकुलनगर नांदेड ,बाबाराव पडोळे हिंदुस्थान मेडिकल वाजेगाव,बालाजी धोंडे मनस्वी एजन्सी संजीवनी हॉस्पिटल,विश्वजित कांबळे व्यवसाय एमआर अशा चार व्यक्तींन वर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

गोंदियात लसीकरण बंद

गोंदियात लसीकरण मोहिम बुधवारपासून बंद आहे. लस संपल्याने आतापर्यंत १ लक्ष ८ हजार लोकांना लस देण्यात आली असुन, ३ लक्ष लोकांना लस देण्याचं उदिष्ट होतं. पण, ते अद्यापही अपूर्ण आहे. पुढील चार दिवसांत लस उपलब्ध होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (8 एप्रिल) राजधानी दिल्लीतील एम्समध्ये कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. ट्विटरवरुन त्यांनी याबाबतची माहिती दिली. "मी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोनाव्हायरसला आळा घालण्यासाठी लसीकरण हा काही पर्यायांपैकी एक आहे. लसीकरणासाठी तुम्ही पात्र असाल तर लवकरच लस घ्या. त्यासाठी CoWin.gov.in. वर नोंदणी करा," असं पंतप्रधान मोदींनी लस घेतल्यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.



राज्यात बुधवारी विक्रमी 59907 कोरोना बाधित रुग्णांची वाढ, 30296 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात काल सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. काल (बुधवारी)  59 हजार 907 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 30 हजार 296 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 26 लाख 13 हजार 627 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यात 322 रुग्णांचा काल मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 56 हजार 652 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 5 लाख 01 हजार 559 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.36 टक्के  झाले आहे. राज्यात काल 55 हजार 469 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. सोमवारी 47 हजार 288 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. रविवारी राज्यात 57,074 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. 

ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन अयोग लागू, महासभेत प्रस्ताव सुचनेसह मंजूर

ठाणे : राज्य सरकारने दीडवर्षापूर्वी ठाणे पालिकेच्या कर्मचारी वर्गाला सातवा वेतन अयोग लागू करण्याच्या दृष्टीने हिरवा कंदील दाखवला होता. मात्र अद्याप तो लागू करण्यात आलेला नव्हता. बुधवारी झालेल्या वेबिनार महासभेत सदर प्रस्ताव सुचानेसह मंजूर झाला. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या नव्या सातव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात 15 टक्क्यांच्या आसपास वाढ होणार आहे.

इन्स्टाग्रामद्वारे ड्रग्ज विकणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला एनसीबीकडून अटक

मुंबईच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने आतापर्यंत अनेक मोठे आणि अनोख्या पद्धतीचा वापर करणाऱ्या तस्करांना पकलं आहे. आता एनसीबीने एका 21 वर्षीय तरुणीला मुंबईच्या डोंगरी परिसरातून अटक केली आहे, जी लोकांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवत असे. एनसीबीने तिच्याकडून दीड लाख रुपयांची रोकड आणि एमडी ड्रग्ज जप्त केलं आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांचं पथक मागील तीन महिन्यांपासून तिच्या मागावर होतं. पण दरवेळी ती पळ काढण्यास यशस्वी ठरत असे. एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितलं की, त्यांना या मुलीची माहिती होती, पण तिला पकडणं फार सोपं नव्हतं.

पार्श्वभूमी

राज्यात बुधवारी विक्रमी 59907 कोरोना बाधित रुग्णांची वाढ, 30296 रुग्ण कोरोनामुक्त


राज्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. आज  59 हजार 907 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आज नवीन 30 हजार 296 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 26 लाख 13 हजार 627 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यात 322 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 56 हजार 652 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 5 लाख 01 हजार 559 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.36 टक्के  झाले आहे. राज्यात काल 55 हजार 469 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. सोमवारी 47 हजार 288 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. रविवारी राज्यात 57,074 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. 


ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन अयोग लागू, महासभेत प्रस्ताव सुचनेसह मंजूर


राज्य सरकारने दीडवर्षापूर्वी ठाणे पालिकेच्या कर्मचारी वर्गाला सातवा वेतन अयोग लागू करण्याच्या दृष्टीने हिरवा कंदील दाखवला होता. मात्र अद्याप तो लागू करण्यात आलेला नव्हता. बुधवारी झालेल्या वेबिनार महासभेत सदर प्रस्ताव सुचानेसह मंजूर झाला. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या नव्या सातव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात 15 टक्क्यांच्या आसपास वाढ होणार आहे.


ठाणे महापालिका (Thane Municipal Corporation) कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर पालिकेच्या तिजोरीवर प्रती वर्षाला 114 कोटी रुपयांच्या आसपास भार पडणार आहे. बुधवारी झालेल्या महासभेत या संदर्भातील प्रस्ताव सुचनेसह मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता पालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अस्थापनेवर 10 हजार 500 पदं मंजूर झाली असून 6500 पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. तर, शिक्षण मंडळात दीड हजार कर्मचारी आहेत. त्यांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे.


इन्स्टाग्रामद्वारे ड्रग्ज विकणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला एनसीबीकडून अटक


मुंबईच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने आतापर्यंत अनेक मोठे आणि अनोख्या पद्धतीचा वापर करणाऱ्या तस्करांना पकलं आहे. आता एनसीबीने एका 21 वर्षीय तरुणीला मुंबईच्या डोंगरी परिसरातून अटक केली आहे, जी लोकांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवत असे. एनसीबीने तिच्याकडून दीड लाख रुपयांची रोकड आणि एमडी ड्रग्ज जप्त केलं आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांचं पथक मागील तीन महिन्यांपासून तिच्या मागावर होतं. पण दरवेळी ती पळ काढण्यास यशस्वी ठरत असे. एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितलं की, त्यांना या मुलीची माहिती होती, पण तिला पकडणं फार सोपं नव्हतं.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.