Breaking News LIVE : सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते कोरोना पॉझिटीव्ह
Breaking News LIVE Updates, 07 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते कोरोना पॉझिटीव्ह,
रात्री 9 वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार सातपुते यांना कोरोनाची लागण,
काही दिवसांपूर्वी तेजस्वी सातपुते यांनी प्रतिबंधात्मक लस देखील घेतली होती,
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा पदभार अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्याकडे
ज्येष्ठ निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी घेतली कोविड प्रतिरोधक लस... अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील सरकारी रुग्णालयात घेतली लस...
गिरणी कामगार नेते दत्ता ईस्वलकर यांचं 72 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन. मुंबईत जे जे हॉस्पिटलमध्ये आज संध्याकाळी निधन. उद्या सकाळी वरळी स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
'गिरणी कामगार नेते दत्ता ईस्वलकर यांचं 72 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन. मुंबईत जे जे हाँस्पिटलमध्ये झालं आज संध्याकाळी निधन. उद्या सकाळी वरळी स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार.'
केंद्राचे पथक उद्यापासून तीन दिवस नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर, जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने केंद्रीय पथकाचा दौरा, अधिकाऱ्यांकडून घेणार आढावा, नाशिक शहर, मालेगाव आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाच्या उद्रेकाचा घेणार आढावा
राज्यात आज 59907 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 30296 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2613627 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 501559 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.36% झाले आहे.
शिक्षकांच्या बदल्यांचे नवे धोरण आज जाहीर करण्यात आले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ शिक्षकांच्या बदल्या ॲाफलाईन करण्यास इच्छुक होते. मात्र त्यामुळे राज्यात शिक्षकांच्या बदल्यात पुर्वी होत होता तसा पैशांच्या खेळ होईल असा शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला होता. राज्यभर या संदर्भात बैठका झाल्या. त्या बैठकांनाही संघटनांनी सहभाग नोंदवतांना ॲानलाईनचीच मागणी केली होती. ती आज मान्य करण्यात आली. पुर्वीच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या काळात बदल्या ॲानलाईन सूरू झाल्या होत्या
अकोला जिल्हा न्यायालयासमोरील पाण्याच्या टाकीवर आज एक थरारक नाट्य पहायला मिळालं. कौटुंबिक कलहामूळे अकोल्यातील स्थानिक वृत्तवाहिनीचा पत्रकार राजेश अम्रुतकर याने पाण्याच्या टाकीवर चढत उडी मारण्याची धमकी दिली. सोबतच टाकीच्या ग्रीलला त्याने गळफासही बांधला. राजेश गळफास घेत उडी मारल्यानंतर त्याचा आत्महत्येचा निर्णय परावर्तीत झाला. अन् त्याचा संघर्ष सुरू झाला तो गळफास सैल करण्यासाठी. त्याने कित्येक प्रयत्न केलेत. मात्र, त्याला अपयश येत होते. यावेळी पोहोचलेल्या पोलिसांचाही त्याला वाचविण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर, राजेशला दैवाने साथ दिली अन् गळफासाची दोरी तुटली अन् तो वाचला. सध्या राजेश अम्रुतकरवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सचिन वाझेंनी केलेले आरोप मंत्री अनिल परब यांनी फेटाळले, खंडणी गोळा करण्याचे संस्कार आमच्यावर नाहीत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि दोन मुलींची शपथ घेत अनिल परब यांनी आरोप फेटाळले, माझी नार्को टेस्ट केली तरी मी सामोरा जायला तयार आहे, NIA, CBI, रॉ कुठलीही चौकशी लावली तरी मी तयार आहे.
पुण्यात जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पुणे महापालिकेची आणि जिल्ह्याची आरोग्य सेवा आता कमी पडायला लागली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सौरव राव यांनी लष्कराकडे मदत मागितली आहे. त्यानुसार पुण्यातील लष्कराच्या कमांड हॉस्पिटलमधील 330 बेड पुणे जिल्ह्यातील रुग्णांसाठी उद्यापासून (गुरुवारपासून) उपलब्ध होणार आहेत. त्यापैकी 270 ऑक्सिजन तर 60 व्हेंटिलेटर बेडचा समावेश आहे. पुणे बिभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली...
संपत्तीच्या वादातून मुलाने आईला गळफास देऊन मारलं. दौंड तालुक्यातील पाटस गावातील घटना
इंदुमती हाळदे अस मृत आईचे नाव. दत्ता हाळदे असं आरोपीचे नाव असून जमीन वाटून देण्यास विरोध केल्याने आईला फासावर लटकवले. आईला फास देऊन मुलगा फरार झाला होता. यवत पोलिसांनी अवघ्या 12 तासांत पुण्यातील ढोले पाटील रोडवरून आरोपीला ताब्यात घेतलं.
हिंगोली जिल्ह्यात सातत्याने संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे हाल होत आहे. त्यातच राज्य शासनाने जाहीर केलेल्या ब्रेक द चेन उपक्रमा अंतर्गत लागु केलेल्या निर्बंधांमुळे पुन्हा एकदा व्यापाऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली आहे, त्यामुळे येत्या दोन दिवसांत हे निर्बंध मागे घ्या अन्यथा आदेश झुगारून आम्ही बाजारपेठ उघडू असा इशारा हिंगोली व्यापारी महासंघाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्व व्यापाऱ्यांनी आज हातात फलक घेऊन सरकारी निर्बंधाविरोधात आंदोलन केले आहे. या आंदोलनात भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, राष्ट्रवादीचे नेते दिलीप चव्हाण यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते. त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
दोन महिण्यापूर्वी लेहमध्ये हिमस्खलन होत असताना बचवकार्य करताना जवान सुनील शिंदे बेपत्ता झाले होते. बर्फाखाली गाडले गेल्याने त्यांचा शोध लागत नव्हता, काही दिवसांपूर्वी बर्फ वितळण्यास सुरुवात झाली आणि त्याच्यासह काही जवान मृतावस्थेत आढळले. दरम्यान ही माहिती शहीद शिंदे यांच्या कुटुबियांना देण्यात आली. मंगळवारी रात्री तीनच्या सुमारास शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिंदे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.
सचिन वाझेंकडून 36 लाख रूपयांची रोकड हस्तगत, वाझेंसाठी एनआयएनं चार दिवसांची एनआयए कोठडी वाढवून मागितली, हा पैसा कठून आला, तो कशासाठी वापरायचा होता याची चौकशी होणं आवश्यक - एनआयए
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार, शरद पवार यांच्या प्रकृती संदर्भात चौकशी करण्यासाठी फडणवीस भेट घेणार, फडणवीस आज किंवा परवा भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती
सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जशी रुग्णांची संख्या वाढतेय तसं आरोग्य व्यवस्था किती सक्षम आहे याची गंभीर स्थिती देखील समोर येत आहे. सोलापुरात एकीकडे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात बेड शिल्लक नाहीयेत. तर खासगीत उपचार घेणाऱ्यांसाठी रेमडिसीवर मिळत नाहीये. त्यामुळे सोलापुरातील लोकांनी नेमकं करायाचं तरी काय? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
लक्षणं नसणाऱ्यांनी विनाकारण चाचणी करु नये, इक्बाल सिंह चहल यांचं आवाहन. मुंबईत प्रत्येक वॉर्डमध्ये वॉररुमची सुविधा
10 फेब्रुवारी ते 7 एप्रिल दरम्यानच्या काळात मुंबईत कोरोनाची दुसरी लाट. या काळात 1 लाख 60 हजार केसेस आल्या आहेत. ज्यापैकी 1 लाख 36 हजार रुग्णांना लक्षणं नाहीत.
दररोज येणारा रुग्णसंख्येचा आकडा पाहून घाबरु नका. पालिका आयुक्तांचं आवाहन. आतापर्यंत मागील दिवसात 10 हजार कोरोनाबाधित आढळले. ज्यामध्ये 8 हजार 700 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत. रुग्णांसाठी लागणाऱे बेडही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे.
प्रतापगड ते पोलादपूर जाणाऱ्या आंबेनळी घाटात आग्यामहूच्या मधमाशां संतप्त झाल्या असून त्यांनी अनेकांचा चावा घेतला आहे. घाटातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांवरही मधमाशांनी हल्ला केला असून त्यामध्ये अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत.
सांगली जिल्ह्यात कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या फक्त 15 हजार एवढेच डोस प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. म्हणजेच फक्त एक दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अडीच लाख जणांना लस देण्यात आली. राज्य शासनाकडे जिल्हा आरोग्य विभागाने वारंवार पाठपुरावा आणि मागणी करुनही पुरेसा पुरवठा झालेला नाही.
20 ते 40 या वयोगटातील तरुण वर्ग मोठ्या संख्येनं बाहेर फिरतो. त्यामुळं आता वयवर्ष 18 च्या पुढे महाराष्ट्रात सर्वांनाच लसीकरण करण्याची अनुमती द्या, अशी केंद्राकडे मागणी.
केंद्रांच्या सर्व निकषांचं आम्ही पालन केलं, आता केंद्राने राज्याच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं. दररोज सहा लाख लसीकरण करण्याचं केंद्राचं आव्हान पूर्ण करण्याच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरु आहे, परंतु अनेक जिल्ह्यात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहीमेत अडसर निर्माण होत आहे : राजेश टोपे
केंद्रानं लसीकरण वाढवण्याचं आव्हान दिलं ते राज्यानं स्वीकारलं. आजमितीस दिवसाला साडेचार लाख नागरिकांना लस. पण, आता मात्र लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. राज्यातील अनेक केंद्रांवर हीच परिस्थिती. लसींचा पुरवठा अधिक गतीनं करा, जेणेकरुन राज्यात अधिक चांगल्या पद्धतीनं काम करता येईल- राजेश टोपे
कोरोनाच्या बाबतीत केंद्राच्या सर्व नियमावलीचं आणि निर्णयांकडून महाराष्ट्रात काटेकोरपणे पालन. व्यापाऱ्यांचा विरोध घेऊन गर्दी टाळण्यासाठी शक्य त्या सर्व मार्गांचा अवलंब. राज्य सरकारनं केंद्राच्या अपेक्षा पूर्ण केल्या- राजेश टोपे
सांगलीत प्रशासनाकडे फक्त 15 हजार लसींचा साठा. मागणी करुनही लसींचा पुरवठा नाही.
कोल्हापुरातील जिल्हा बंदीचा आदेश अखेर मागे घेण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने अवघ्या 24 तासात हा निर्णय मागे घेतला. त्यामुळे आता परजिल्ह्यातील किंवा जिल्हा अंतर्गत येणाऱ्या व्यक्तींना कुठलीही बंधन नसतील. नागरिकांना त्रास होणार असल्याने निर्णय मागे घेतल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
केंद्रानं महाराष्ट्राला अधिकाधिक लसींचा पुरवठा करावा, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची मागणी. मुंबईतही कोरोना लसींचा तुटवडा
भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. "माझी कोरोना टेस्ट आज पॉझिटिव्ह आली असून मी क्वॉरन्टीन आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की आपणही आपली कोरोनाची टेस्ट करुन घ्या व स्वतःची काळजी घ्या," असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारात रणजितसिंह मोहिते पाटील सहभागी झाले होते. भाजप उमेदवार आणि सोबत प्रचार करणाऱ्या नेत्यांच्या अडचणी वाढणार वाढणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. पवार यांना घरीच कोरोनाची लस देण्यात आली. शरद पवार यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी डॉ. तात्याराव लहाने आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसंच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे आभार मानले.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह एनआयए कार्यालयात दाखल झाले आहे. एनआयए परमबीर सिंह यांचा जबाब नोंदवणार असून यातून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.
राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. अशातच भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारला इशारा दिला आहे. उदयनराजे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये लॅाकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करावा अन्यथा जनतेतून उद्रेक होईल, असा इशारा दिला आहे.
"आम्ही आधीच सांगितलं होतं की अर्थचक्र आणि निर्बंध याचा समतोल राखला गेला नाही तर सर्वसामान्यांमध्ये भडका उडेल याचा काल प्रत्यय काल राज्यभरात पाहिला मिळालं. सरकारने मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली जनतेची फसवणूक केली आहे आणि प्रत्यक्षात लॉकडाऊन लावला गेला आहे," अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. ते म्हणाले की, "सरकारने छोट्या उत्पादकांना उत्पादन करण्याची परवानगी दिली परंतु ते माल विकू शकणार नाही कारणं दुकानं बंद आहेत. दंडुकेशाहीच्या जोरावर लोकशाही जास्त दिवस टिकू शकणार नाही. त्यामुळे सरकारने याचा विचार करावा. अन्यथा काही दिवसांत जनतेचा मोठ्या प्रमाणात उद्रेक पाहिला मिळेल. सरकारने पुढील काही दिवसांत निर्णय घ्यावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील सरकारच्या भूमिकेवर आपली पुढील भूमिका जाहीर करेल."
राज्यात लॉकडाऊनसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना परप्रांतीय मजुरांनी पुन्हा एकदा घरचा रस्ता पकडला आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर मजुरांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश, बिहारसह उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या पकडण्यासाठी इथे लोक मोठ्या प्रमाणात येत आहोत. लॉकडाऊनसदृश्य परिस्थितीमुळे हाताला तितकसं काम नाही, तसेच निवडणुकांचा काळ असल्यामुळे मतदान करायला जात असल्याचंही या मजुरांनी सांगितलं.
मुंबईतील नायर रुग्णालयातील 400 निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेचा इशारा मागे घेतला आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या आश्वासनानंतर सामूहिक रजा मागे घेत असल्याची माहिती नायर मार्डने दिली आहे. मागील एक वर्षांपासून होत असलेल्या शैक्षणिक नुकसानामुळे डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. नायर हॉस्पिटल पूर्णपणे कोविडच्या रुग्णांसाठी नको, नॉन कोविड रुग्णांची गैरसोय नको अशी डॉक्टरांची मागणी आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मुंबईतील इतर रुग्णालयांमध्ये देखील वर्ग करा अशीही त्यांची मागणी आहे.
लस पुरवठ्यात राजकारण बाजूला ठेवा, राज्याच्या भल्यासाठी एकत्र या; कोरोना लढाईत एबीपी माझाचं आवाहन, सरसकट लसीकरणासाठी सर्व स्तरातून आग्रह, एबीपी माझाचाही भूमिकेला पाठिंबा
किनवट तालुक्यातील सारखणी जंगल परिसरातील मांडवी वन परिक्षेत्राला गेल्या दोन दिवसांपासून भीषण आग,आगीच्या मोठमोठया ज्वाळा अद्याप सुरू, दुर्लभ,पक्षी, प्राणी,वनस्पती व झाडे आगीमुळे नामशेष होण्याची भीती, वन विभागाकडून अद्याप आग विझवण्याचा कोणताही प्रयत्न नाही.
रेमडीसीविरच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे याची समिती स्थापन करण्याता आली आहे. या समितीला रेमडीसीविरचा कमाल दर ठरवून अहवाल तात्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या
सर्वत्र कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली जात आहे. पण अजूनही लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे आता लसीकरण वाढवण्यासाठी वर्धा जिल्ह्यात ग्रामपंचायत, नगरपरिषदांच्या वॉर्डांसाठी प्रोत्साहन अनुदान योजना राबवण्यात येणार आहे. सध्या 45 वर्षांवरील व्यक्ती तसंच ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केलं जातं आहे. लसीकरणाचे केंद्रही वाढवण्यात येत आहे. आता पात्र लाभार्थ्यांचं शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणाऱ्या वर्धा जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील तीन ग्रामपंचायत आणि नगरपरिषदेच्या दोन वॉर्डांना पाच लाख रुपयांच प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. पालकमंत्री सुनील केदार यांच्या सूचेनवरुन ही योजना जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. लसीकरणासाठी अशी बक्षीस योजना राबवणारा वर्धा जिल्हा पहिलाच असावा.
पार्श्वभूमी
महाराष्ट्राला मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा, राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा. 25 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश द्यावेत, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.
Remdesivir : नागपुरात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मेडिकलमधील थेट विक्रीवर बंदी
कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने रेमडेसिवीर (Remdesivir) या औषधाची मागणीही वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हे औषध मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. तर अनेक ठिकाणी या औषधाचा काळाबाजार होत असल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिवीरच्या मेडिकलमधील थेट विक्रीवर बंदी घातली आहे.
'ब्रेक द चेन' अंतर्गत लावलेले निर्बंध शिथिल करा,' यशोमती ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अमरावती जिल्ह्यातील पूर्वीचे लॉकडाऊन आणि त्यानंतर रुग्णसंख्येत घट पाहता आता 'ब्रेक द चेन'अंतर्गत लावलेले निर्बंध शिथिल करावेत, असं पत्र अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे..
1. अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचा ॲक्शन प्लॅन, पहिल्यांदा परमबीर सिंह यांचा जबाब, त्यांच्यासोबतच्या सात पोलिस अधिकाऱ्यांनाही सीबीआय बोलावणार, अनिल देशमुखांसोबत त्यांच्या स्वीय सहाय्यकांचीही होणार चौकशी
2. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात अनिल देशमुख आणि राज्य सरकारच्या दोन स्वतंत्र याचिका सुप्रीम कोर्टात दाखल, तातडीने सुनावणी घेण्याची मागणी
3. कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडिसिव्हर इंजेक्शनसाठी सोलापूरपाठोपाठ नाशिकमध्येही रांगा, प्रशासनाचा मात्र तुटवडा नसल्याचाच दावा
4. राज्यातल्या लॉकडाऊन सदृश्य निर्बंधाचा व्यापाऱ्यांकडून राज्यभरात निषेध, नागपूरमध्ये व्यापारी रस्त्यावर, दादरमध्येही दुकानांवर निषेधाचे फलक
5. नववी आणि अकरावी परीक्षेबाबत आज निर्णय होण्याची शक्यता, सरसकट पास करायचं की वर्षभरातल्या मूल्यमापनावर याबाबत आज निर्णय, दहावी-बारावीच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना प्रमोट करावं, राज ठाकरे यांची सूचना, शाळा बंद असतानाही सुरू असलेल्या फी वसुलीवर आक्षेप
6. गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी पदभार स्वीकारला, प्रशासकीय कामात हस्तक्षेप होणार नसल्याची ग्वाही
7. लसीकरणासाठी असलेली वयाची अट शिथील करुन वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्यांना सरसकट कोरोना प्रतिबंधक लस द्या, आयएमएचं पंतप्रधान मोदींना पत्र
8. मनसुख हिरण यांच्या हत्येवेळी सचिन वाझे यांचा लोकलने सीएसएमटी ते ठाणे प्रवास; रेल्वे स्टेशनच्या CCTV मध्ये खुलासा
9. मुंबईत पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या सोसायट्यांमध्ये मायक्रो कंटेनमेंट झोन; नियम न पाळल्यास 10 हजारांचा दंड
10. बॉलिवूडमध्ये कोरोनाचा विळखा वाढतोय, अभिनेत्री कतरिना कैफ पॉझिटिव्ह, होम क्वॉरन्टीन होण्याचा निर्णय
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -