Breaking News LIVE : अत्यावश्यक सुविधा वगळता पुण्यातील सर्व दुकानं देखील उद्यापासून बंद
Breaking News LIVE Updates, 05 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
अत्यावश्यक सुविधा वगळता पुण्यातील सर्व दुकानं देखील उद्यापासून बंद राहणार. पुण्यात आतापर्यंत संध्याकाळी सहा ते पहाटे सहा या कालावधीत नाईट कर्फ्यु होता. मात्र दिवसा सर्व दुकानं उघडी ठेवण्याची परवानगी होती. मात्र राज्य सरकारने राज्यात सर्वत्र अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो पुण्यात देखील उद्यापासून लागू होणार आहे.
अत्यावश्यक सुविधा वगळता पुण्यातील सर्व दुकानं देखील उद्यापासून बंद राहणार. पुण्यात आतापर्यंत संध्याकाळी सहा ते पहाटे सहा या कालावधीत नाईट कर्फ्यू होता. मात्र दिवसा सर्व दुकानं उघडी ठेवण्याची परवानगी होती. मात्र राज्य सरकारने राज्यात सर्वत्र अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो पुण्यात देखील लागू होईल . व्यापारी महांघानेही उद्यापासून अत्यावश्यक सुविधा वगळून इतर दुकानं बंद राहतील असं म्हटलय.
मुंबईहून भंडारा येथे परत जात असलेल्या पोलिसांच्या वाहनाला टायर फुटल्याने अपघात झाला. या अपघातात कारागृहातील बंदीवानाचा मृत्यू झाला असून तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. नागपूर - अमरावती महामार्गावर कारंजा (घाडगे) लगत राजनी शिवारात दुपारी 2 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. मृताचे नाव श्रावण बावणे (65) असे आहे. जखमी कर्मचाऱ्यांवर कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पनवेल महापालिकेत आज मालमत्ता कराबाबत चर्चा करण्यासाठी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. कोराचा संसर्ग वाढत असल्याने या सभेला महानगरपालिकेच्या नगरसेवकांना ॲानलाईन पद्धतीचा उपयोग करून हजर राहण्याचे आदेश महापौरांनी दिले होते. मात्र महापौरांचा आदेश धुडकावत शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादीच्या 15 नगरसेवकांनी सभागृहात प्रत्यक्ष प्रवेश करत घोषणाबाजी करण्यास सुरवात केली होती. मालमत्ता करात सत्ताधारी भाजपाने मोठ्या प्रमाणात वाढ केली असल्याने पनवेलकरांना याचा भूर्दंड बसत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केलाय. या विरोधात आवाज उठवला असता ॲानलाईन आपल्याला बोलू देत नसल्याचा आरोप महापौरांवर करण्यात आलाय. त्यामुळे जनतेचा आवाज उठवण्यासाठी विरोधी पक्षांनी सभागृहात उपस्थितीत लावली असल्याचे स्पष्टीकरण दिलंय. सभागृहात उपस्थितीत राहिलेले शेकाप, राष्ट्रवादीचे नगरसेवक बाहेर जात नसल्याने भाजपाच्या महापौर कविता चौतमल यांनी 15 नगरसेवकांचे निलंबन केले. यानंतर पोलीसांनी सभागृहात येत नगरसेवकांना बाहेर काढले .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये आज संध्याकाळी 6 वाजता व्हीसीद्वारे बैठक झाली. या बैठकीत लॅाकडाऊनसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली.
अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार? देशमुख सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता, उच्च न्यायालयातल्या निकालानंतर देशमुख
यांना द्यावा लागला राजीनामा, काही मोठ्या व्यक्ती आणि वकिलांशी चर्चा करण्याची शक्यता
लॉकडाऊनमध्ये समाविष्ट केल्याने नाभिक संघटना आक्रमक झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मुंडन आंदोलन करून त्यांनी सरकारचा निषेध केला. कोरोना नियमांच्या अधीन राहून इतर व्यवसाय सुरू ठेवलेत, तसेच आमचे व्यवसाय सुरू ठेवण्याची सरकारने परवानगी द्यावी. आधीच्या लॉकडाऊनमुळं निर्माण झालेली परिस्थिती निस्तारताना आमचं कंबरडे मोडले आहे, पुन्हा ती वेळ आमच्या येऊन देऊ नये. अशी मागणी नाभिक संघटनेने केली.
दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री, उत्पादन शुल्क खाते अजित पवार यांच्याकडे जाणार
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असून तो सोपवण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. ते म्हणाले की, उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांना भेटून राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. पवारांनी यासाठी होकार दिला आहे.
नववी, अकरावी आणि दहावी, बारावीच्या परीक्षांचं काय होणार? याबाबत उद्या शिक्षण विभागाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड निर्णयाची घोषणा करतील. पहिली ते आठवीप्रमाणेच नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट पास करण्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. तर दहावी आणि बारावीच्या परीक्षा मात्र ऑफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाऊ शकतात. जर दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेतल्या तर विकेण्ड लॉकडाऊनच्या वेळी शनिवारी येणाऱ्या पेपरसाठी काय व्यवस्था करता येईल याबाबतही उद्याच्या बैठकीत चर्चा होईल. उद्या शिक्षण विभागातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयाचा पूर्ण निकाल काय आहे ते माहित नाही, त्यामुळे याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय कोणतंही मत व्यक्त करणार नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास राज्य सरकार करेल आणि मग मुख्यमंत्री काय तो निर्णय घेतील असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले .
उच्च न्यायालयाच्या सीबीआय चौकशीच्या निकालानंतर गृहमंत्री राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकतेच 'ब्रेक द चेन' अंतर्गत काही नवीन नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरकारच्या या निर्णयाला विरोध करत पुण्यातील सलून व्यवसायिक रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यातील वाघोली येथे सलून असोसिएशनची एक बैठक पार पडली असून या बैठकीनंतर राज्यातील सर्व सलून बंद न ठेवण्याचा निर्णय सलून व्यावसायिकांनी घेतला आहे. सलूनची दुकाने उघडी ठेवून असहकार आंदोलन करण्याचे सलून असोसिएशनच्या बैठकीत ठरले आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर ही बैठक होणार आहे. राज्यात कडक निर्बंध लागू झाल्यानंतर परीक्षा कशा पद्धतीने घ्यायची यावर चर्चा होणार आहे. तसंच शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन घोषित झाला आहे. त्यामुळे होणार्या परीक्षांचे काय होणार यावरही चर्चा केली जाणार आहे.
मुंबई महानगरपालिकेला हायकोर्टाने दणका दिला आहे. भाजप नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांना दिलासा देत त्यांचं स्थायी समिती सदस्यपद रद्द करण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने राज्यात सुरू असलेल्या हप्तेखोरीला आता आळा बसेल, त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करत असून राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी सांगितलं.
गृहमंत्री अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करण्याचा न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी असून यामुळे चुकीचा पायंडा पडण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्त असताना का कारवाई केली नाही याचं उत्तर परमबीरांनी दिलं नाही, त्याची चौकशी करायला हवी असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी होणार असून सीबीआयला 15 दिवसांत प्राथमिक चौकशीचा तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. आता यावरून गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घ्या अशी मागणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.
सातारा जिल्ह्यात रविवारी 758 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 68,719 इतका झाला असून एकूण 1918 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 61,379 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले असून सध्या रुग्णालयात 5422 रुग्ण उपचार घेत आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी होणार, सीबीआयला 15 दिवसांत प्राथमिक चौकशीचा तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी होणार, सीबीआयला 15 दिवसांत प्राथमिक चौकशीचा तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश
राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा कोरोना तपासणी अहवाल पॅाझिटिव्ह आल्यामुळे ते होम आयसोलेटेड आहेत. आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी व तपासणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.
उद्या पासून राज्यात खाजगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईतल्या बीकेसी परिसरात मोठ्या प्रमाणात खाजगी कंपन्या आणि सरकारी कार्यालय आहेत याशिवाय या परिसरात मोठं डायमंड मार्केटही आहे आज नेहमीप्रमाणे डायमंड मार्केटमध्ये कर्मचाऱ्यांची ये-जा सुरू होती सोशल डिस्टन्स आणि मास्क घालण्याचं आवाहन करण्यात येत होतं.
कोल्हापुरात पुन्हा कोरोना रुग्ण वाढले तर शिवाजी विद्यापीठाची इमारत कोविड सेंटरसाठी घेणार अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांची एबीपी माझाशी बोलताना दिली. घोडावत कॉलेजमध्ये देखील मोठं कोविड सेंटर उभ करणार आहे. तालुका स्तरावर देखील सेंटर उभं करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.
गेल्या 24 तासात नाशिक जिल्ह्यात 4 हजार 772 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून 25 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात सर्वाधिक 3 हजार 72 नवे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 2472 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केलेला कोरोनाबाधित आरोपी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना वॉर्डमधून पळाल्याची घटना घडली आहे. आरोपीचे नाव मुबारक बंडीलाला आदीवाशी असं असून त्याच्यावर कोरोना वार्डमध्ये उपचार सुरू होते. आरोपी मध्यप्रदेशातील कटणी येथील असून पोलिसांना मारहाण करणे, चोरी, दरोडा, या गुन्ह्याखाली त्याला अटक केली होती.
मुंबईतल्या दादर भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. सोलापुरात देखील तीच परिस्थिती पाहायला मिळतेय. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी लोकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. सोलापुरात काल तब्बल 800 पेक्षा जास्त रुग्ण आढळले. राज्य सरकारने देखील कोरोनाच्या संदर्भात मिनी लॉकडाउन जाहीर करत कडक निर्बंध लागू केले. या निर्बंधात अत्यावश्यक घटकांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत नियम अधिक कठोर करता येणार नाही. पण नागरिकांनी स्वतःहून नियमांचे पालन केले नाही तर सोलापुरातील परिस्थिती आणखी गंभीर होईल.
कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध कडक करण्यात आले आहेत. गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामध्ये उद्याने, मैदानाचा समावेश आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने देखील वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शहरातील उद्याने मैदाने बंद केली आहेत. कल्याण पश्चिमेकडील काळा तलाव येथे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी एकच गर्दी होते. त्यामुळे काळा तलाव हा बंद करण्यात आला होता. तसेच या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन महापालिकेने केलं होतं. मात्र नागरिकांनी पुन्हा एकदा पालिकेच्या आवाहनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. नागरिकांनी चक्क गेटवरुन उड्या मारुन काळा तलावात प्रवेश केल्याचे दिसून आले. बंदी करण्यात आलेली असून सुद्धा नागरिकांनी आज सकाळी काळा तलाव परिसरात मोडण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून येत होते. या ठिकाणी कोणत्या कोणत्याही नियमांचे पालन केलं नव्हतं.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर जात असून त्यांच्या उपस्थितीत दुपारी साडेतीन वाजता कोरोना उपाययोजनांवर आढावा बैठक होणार आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता या बैठकीत नेमक्या कोणत्या उपाययोजनांवर चर्चा होते याकडे लक्ष आहे. तसेच रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत, यावरदेखील आरोग्यमंत्री नेमका काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यात कोरोनासोबत लढताना लसीकरणाची अतिरिक्त जबाबदारी पार पाडणाऱ्या योद्ध्यांचं वेतन थकलं. 52 आरोग्य केंद्रातील 117 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन थकलं आहे. जिल्हा आरोग्य अधिकारीही चार महिन्यांपासून वेतनाशिवाय आहेत. "आम्ही तुमच्यासाठी करतोय तुम्ही आमच्या वेतनाचं बघा," असं भावनिक आवाहन मेग्मो अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत दुपारी साडेतीन वाजता कोरोना उपाययोजनांवर आढावा बैठक होणार आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता या बैठकीत नेमक्या कोणत्या उपाययोजनांवर चर्चा होते तसेच रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत, यावर देखील आरोग्यमंत्री नेमका काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
पुणे जिल्ह्यात रविवारी 12,494 नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर 64 बाधितांचा मृत्यू झाला आहे. ही आजपर्यंतची एका दिवसात आढळून आलेली सर्वाधिक वाढ आहे.
विशेष म्हणजे 30,351 व्यक्तींची चाचणी केल्यानंतर 12,494 व्यक्ती बाधीत आढळल्यात. यावरून पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव किती मोठ्या प्रमाणात झालाय हे स्पष्ट होतंय.
भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना वर्ध्यात घडली आहे. नागपूर ते चंद्रपूर महामार्गावरील समुद्रपूर परिक्षेत्रातील शेडगाव फाटा शिवारात वाहनाने मादी बिबट्याला उडवलं. संबंधित मादी बिबट्या सुमारे अडीच वर्षाची असून पाण्याच्या शोधात भटकंती करत महामार्गावर आल्याची शक्यता मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर यांनी वर्तवली. बिबट्याला धडक देणाऱ्या वाहनाचा शोध घेणे सुरु आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर इथे रात्री नऊच्या सुमारास एका डॉक्टरच्या घरात घुसून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत डॉक्टर गंभीर झाले असून त्यांच्या छातीवर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले आहेत. शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात रात्री नऊच्या सुमारास एका संशयिताने डॉक्टर आत्माराम भगवान लोखंडे (वय वर्षे 65) यांच्या घरात घुसून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. तीक्ष्ण हत्याराने वार करत असताना लोखंडे यांच्या पत्नीने घराबाहेर येऊन आरडाओरड केली. यानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. मात्र या घटनेमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. डॉक्टर लोखंडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टर आत्माराम लोखंडे हे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी असून आरोपीचा शोध सुरु आहे.
पार्श्वभूमी
1. महाराष्ट्रात संपूर्ण नाही मात्र विकेंड लॉकडाऊन, उद्यापासून कडक निर्बंध लागू होणार, मिशन 'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर
2. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारचे काही महत्वाचे निर्णय, जिम, सिनेमागृह, नाट्यगृह, गार्डन, मैदानं, प्रार्थनास्थळंही बंद, अत्यावश्यक सेवांना परवानगी, लोकलमध्ये आसनक्षमतेनुसार प्रवासाला परवानगी
3. 'उद्योजकांनी कामगारांची जबाबदारी घ्यावी, शासन तुमच्यासमवेत', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उद्योग जगताला आवाहन, कोरोना परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची राज ठाकरे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा, सहकार्याचं आवाहन
4. लॉकडाऊनबाबत जर काही निर्णय घेण्याची वेळ आलीच तर नागरिकांना दोन दिवसांचा वेळ देण्यात येईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
5. मुंबईतील सोसायट्यांसाठी महापालिकेची विशेष नियमावली जाहीर, मुंबईतील चार ठिकाणं कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट; सर्वाधिक सक्रिय रुग्ण अंधेरीत
6. महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद, शनिवारी राज्यात विक्रमी 4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून यंत्रणेचे अभिनंदन
7. नांदेडमध्ये RTPCR चाचणीसाठी रुग्णांकडून जास्तीची रक्कम घेणाऱ्या खाजगी लॅबवर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई, बुलडाण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, ऑक्सिजनचं प्रमाणही कमी
8. कोरोना काळात विकासकामांना कात्री तुम्हाला भ्रष्टाचार करण्यासाठी लावली का? राजू शेट्टी यांचा सरकारला घरचा आहेर
9. बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारला कोरोनाची लागण, अभिनेते गोविंदा यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, गायक आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अगरवालही कोरोनाबाधित
10. प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन, मुंबईतील कुलाबा येथील राहत्या घरी अखेरचा श्वास
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -