Breaking News LIVE :  दिपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी अपर प्रधान मुख्य वनसरंक्षक श्रीनिवासा रेड्डी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Breaking News LIVE Updates, 03 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Apr 2021 07:17 AM
नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत 5 जवान शहीद

नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत 5 जवान शहीद, छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील घटना

नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत 5 जवान शहीद

नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत 5 जवान शहीद, छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील घटना

बुलढाणा सैलानी यात्रा अपडेट

जमावबंदी झुगारत यात्रा भरविल्या प्रकरणी एक हजार नागरिकांवर गुन्हा दाखल. तहसीलदार रूपेश खंडारे यांच्या तक्रारी नंतर रायपुर पोलिसात गुन्हा दाखल. पोलिस निरीक्षक सुभाष दुधाळ यांची माहिती. आता पर्यन्त सहा जनाना घेतल ताब्यात.

बांगलादेशमध्‍ये सोमवारी 7 एप्रिलपासून सात दिवस लॉकडाऊन

बांगलादेशमध्‍ये सोमवारी 7 एप्रिलपासून सात दिवस लॉकडाऊन. देशात कोरोनाबाधितांचा वाढती संख्‍येमुळे सोमवारपासून सात दिवसांचे लॉकडाउनची घोषणा बांगलादेश सरकारने आज केली. यासंदर्भातील माहिती सत्ताधारी अवामी लीगचे अब्‍दुल कादिर यांनी शनिवारी माध्‍यमांना दिली.

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण अपडेट

IFS रँक दर्जाचे असणारे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसरंक्षक श्रीनिवासा रेड्डी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. दिपाली चव्हाण केसमध्ये अचलपूर न्यायालयात अटकपूर्व जामिनसाठी केलेल्या अर्जावर अचलपूर जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी होती.
दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्या पूर्वी सुसाईट नोटमध्ये वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं पत्र त्यांनी श्रीनिवासा रेड्डी यांना लिहलं होतं. याप्रकरणात DFO विनोद शिवकुमार यांना अटक झालेली आहे.

चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चोरांच्या आंतरराज्यीय टोळीकडून 3 किलो सोने जप्त

चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चोरांच्या आंतरराज्यीय टोळीकडून 3 किलो सोने जप्त. जिल्ह्यातील टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये झालेल्या चोरीचा माग काढतांना उत्तरप्रदेश च्या बदायू जिल्ह्यातून अटक करण्यात आले आरोपी, गॅस कटरच्या मदतीने बँक आणि ATM मध्ये चोरी करण्याची या टोळीची विशिष्ठ पध्दत पोलिसांनी काढली हुडकून, बदायू येथून 2 आरोपींसह त्यांच्या महाराष्ट्रातील 3 मदतनीसांना पोलिसांनी केली अटक

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षल्यवाद्यांमध्ये जबरदस्त चकमक, 5 जवान शहीद झाल्याची भीती

गडचिरोली: छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षल्यवाद्यांमध्ये जबरदस्त चकमक सुरू, बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवरील टेकुलगुडम- तर्रेम जंगल परिसरात सुरू आहे चकमक, चकमकीत 5 जवान शहीद झाल्याची भीती, तर 3 नक्षली मारले गेल्याची माहिती पुढे, बिजापूर एसपीनी चकमक सुरू असल्याची दिली कबुली मात्र चकमकीत 5 जवान शहीद झाल्याची पोलिसांकडन अजूनपर्यंत अधिकृत माहिती नाही

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षल्यात जबरदस्त चकमक सुरू

गडचिरोली: छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षल्यात जबरदस्त चकमक सुरू, बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवरील टेकुलगुडम- तर्रेम जंगल परिसरात सुरू आहे चकमक, चकमकीत 5 जवान शहीद झाल्याची भीती, तर 3 नक्षली मारलs गेल्याची माहिती पुढे आली आहे. बिजापूर एसपी नी चकमक सुरू असल्याची दिली कबुली मात्र चकमकीत 5 जवान शहीद झाल्याची पोलिसांकडन अजूनपर्यंत अधिकृत माहिती नाही

पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना विना परीक्षा पुढच्या वर्गात प्रवेश

पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना विना परीक्षा पुढच्या वर्गात प्रवेश, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती 

राज्य आणि केंद्र सरकारने पत्रकारांचा समावेश फ्रन्टलाइन वर्कर म्हणून करावा
राज्य आणि केंद्र सरकारने पत्रकारांचा समावेश फ्रन्टलाइन वर्कर म्हणून करावा आणि त्यांच्यासाठी लसीकरणाची सोय करून द्यावी अशी मागणी नागपूर श्रमिक पत्रकार ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी केली आहे. आज नागपुरात श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने नागपुरातील पत्रकारांसाठी लसीकरणाचे कॅम्प आयोजित करण्यात आले.. स्थानिक प्रशासनाने पत्रकारांसाठी लसीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर नागपूरच्या प्रेस क्लबमध्ये हे लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आले... मात्र राज्यभरात हजारोंच्या संख्येने पत्रकार कार्यरत असून त्या त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासन त्यांचा समावेश फ्रन्टलाइन वर्कर मध्ये मान्य करत नाहीये.. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी धोका पत्करून वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना लसीकरणापासून मुकावे लागत आहे.. 
कल्याण-डोंबिवली : मनसेच्या आंदोलनानंतर मनसे पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल

दोन दिवसापूर्वी मनसेने कल्याण डोंबिवली संथ गतीने  सुरू असलेल्या पुलाच्या कामाच्या निषेधार्थ ठाकुर्ली पुलावर निषेधात्मक आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर मनसे जिल्हाध्यक्षासह कार्यकर्त्याविरोधात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी कोरोना प्रादुर्भाव मनसेमुळेच होतो का? असा सवाल केलाय .या आंदोलनाच्या माध्यमातून कोरोनाचे नियमांचे पालन करत लोकांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला होता, मनसे पोलिसांसोबत आहे, मात्र न्याय सगळ्यांना समान असावा. वडवली पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात डीसीपी उपस्थित होते, त्यावेळी शेकडो शिवसैनिक होते गर्दी होती, मग त्यांच्यावर कारवाई केली नाही, असा सवाल केला. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील मनसेला गृहीत धरू नका, प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनू नका, पोलिसांनी पक्षपातीपणा करु नये, असं ट्वीट गृहमंत्र्यांसह पोलिसांना टॅग करुन केलं आहे. याबाबत पोलिसांनी मात्र बोलण्यास नकार दिलाय. 

PMPML सुरू ठेवण्यासाठी पुण्यात भाजपचे आंदोलन


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पीएमपीएमएल बस सेवा सात दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. भारतीय जनता पक्षाकडून पीएमपीएमएल बस सेवा बंद ठेवण्यास विरोध करण्यात येतोय. भाजपचे खासदार गिरीष बापट आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत पुण्यातील पीएमपीएमएल बस डेपोमधे भाजपकडून आंदोलन करण्यात येतंय.

पुणे : पीएमपीएमएल बस सेवा बंद ठेवण्यास भाजपचा विरोध

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पीएमपीएमएल बस सेवा सात दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. भारतीय जनता पक्षाकडून पी एम पी एम एल बस सेवा बंद ठेवण्यास विरोध करण्यात येतोय. भाजपचे खासदार गिरीष बापट आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत पुण्यातील पी एम पी एम एल बस डेपोमधे भाजपकडून आंदोलन करण्यात येतंय.  भाजपचे नेते डेपोमधे उभ्या असलेल्या  एका बंद बसमध्ये जाऊन बसलेत.

वर्षा बंगल्यावर एकामागोमाग एक कोरोनाची लागण 

 


मुख्यमंत्री कार्यालयातल्या आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोनीची लागण झाली आहे. त्या आधी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. रश्मी ठाकरे या एचएन रुग्णालयात दाखल आहेत तर आदित्य ठाकरे दुसरी चाचणी निगेटिव्ह येण्याची वाट बघत आहेत.

 पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनाने निधन
 पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनाने निधन झाले. ते 54 वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.  राजेंद्र सरग यांच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मनमिळावू व्यक्तीमत्व म्हणून त्यांचे माध्यम क्षेत्रामध्ये नावलौकिक होता.

 
मनोरंजन सृष्टीत काम करणाऱ्यांनाही कोविड लस प्राधान्याने द्यावी, आरोग्यमंत्र्यांना पत्र

इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कौन्सिलने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं आहे. यात मनोरंजन सृष्टीत काम करणाऱ्या कलाकार तंत्रज्ञ यांनाही कोविड लस प्राधान्याने द्यावी अशी मागणी वजा विनंती  पत्राद्वारे करण्यात आली आहे.

सदाभाऊ खोत आणि रयत क्रांती मंडळाचं शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार

सदाभाऊ खोत आणि रयत क्रांती मंडळाचं शिष्टमंडळ आज संध्याकाळी 5 वाजता राज्यपालांची भेट घेणार. लॉकडाऊन न करण्याची विनंती राज्यपालांना करण्यासाठी भेट घेणार,  लॉकडाऊन केल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक कामगार, श्रमिकांच्या खात्यावर 10 हजार रक्कम जमा करावी. शेतकरी आणि मत्स्यशेती करणाऱ्या मच्छिमारांसाठी आधी उपाययोजना कराव्या, महाराष्ट्रातील कामगाराला आर्थिक मदत देऊनच लॉकडाऊन जाहीर करावा ही मागणी आहे

अँटिलिया स्फोटकं प्रकरण, एनआयएकडून आणखी एक गाडी ताब्यात घेण्यात आली

अँटिलिया स्फोटकं प्रकरण, एनआयएकडून आणखी एक गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. पांढऱ्या रंगाची मर्सिडिज गाडी MH 46 X 3420 असून काल संध्याकाळी एनआयए कार्यालयात आणण्यात आल्याची माहिती आहे.

मीरा भाईंदर मध्ये वाहनांच्या दुकानाला आग, सर्व सामान जळून खाक

मीरा भाईंदर मधील गोल्डन नेस्ट येथील सर्वोदय कॉम्पलेक्स समोर हेल्मेट हब  या वाहनाच्या दुकानाला आज पहाटे 4.30 च्या दरम्यान भीषण आग लागली होती. 
मीरा भाईंदर पालिकेच्या अग्निशमनदल विभागाने आग नियंत्रणात आणली आहे. मात्र या आगीत दुकानातील सर्व सामान जळून खाक झालं आहे. या दुकानात वाहनांचे सुटे  सामना विकले जात होते. ही आग कशामुळे लागली याची खात्रीशीर माहिती मिळाली नाही. मात्र ही आग शॉर्ट सर्किट ने लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Corona Cases: राज्यात कोरोना परिस्थिती गंभीर! आज तब्बल 47 हजार 827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज तर कोरोना रुग्णसंख्या 50 हजारांच्या जवळपास पोहचली आहे. राज्यात आज तब्बल 47 हजार 827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. दरम्यान, राज्यात परिस्थिती आणखी बिघडली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ पहाता काही दिवसांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल, त्यामुळे इच्छा नसताना निर्णय घ्यावा लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.


Pune Lockdown : पुणेकरांनो कामाशिवाय घराबाहेर पडू नका! पुण्यात आजपासून सात दिवस मिनी लॉकडाऊन
 कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत पुण्यात आजपासून मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आजपासून पुढील सात दिवस हा मिनी लॉकडाऊन असणार आहे. सात दिवस सर्व हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, शाळा, कॉलेजेस, पीएमपीएमएलची बससेवा इत्यादी गोष्टी पूर्णपणे बंद असतील. कोरोना संकट कमी व्हावं या उद्देशाने हा मिनी लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे या लॉकडाऊनला लोकांचा प्रतिसाद देखील तितकच महत्वाचं आहे. 


CoronaVirus | पालघर जिल्ह्यातील शाळा 5 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत बंद
पालघर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तसेच यापूर्वी विविध शाळांमध्ये आजाराचे झालेले संक्रमण लक्षात घेऊन, वसई- विरार महानगरपालिका क्षेत्र वगळून जिल्ह्यातील सर्व शाळा 5 एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी जारी केले आहेत.


Maharashtra Coronavirus | 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग व्यक्तींसाठी घरोघरी जाऊन लसीकरण सुरू करा
राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पाश्वभूमीवर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांग व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस ही घरोघरी जाऊन द्यावी अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत राज्य सरकारसह, मुंबई महापालिका आणि केंद्र सरकारलाही प्रतिवादी केलेलं आहे. केंद्र सरकारनंदेखील ज्येष्ठ आणि अशा विशेष नागरिकांच्या बाबतीत घरोघरी जाऊन लसीकरणाची परवानगी देत धोरण निश्चित करावे, अशी या याचिकेत मागणी केलेली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.