Breaking News LIVE : Breaking News LIVE : उद्या मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे सुरू राहणार, आज BMCला दीड लाख कोविशिल्ड लशींचा पुरवठा

Breaking News LIVE Updates, 24 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Apr 2021 07:24 AM
बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील कोलावडे गावात अचानक धूर सदृश्य वायू गळती

पालघर : बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील कोलावडे गावात अचानक धूर सदृश्य वायू गळती, वायू गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज, गावातील नागरिकांना चक्कर, मळमळणे, डोळे चरचरणे असे प्रकार सुरू, काही नागरिकांना रुग्णालयात पाठविल्याची माहिती https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-25-april-2021-983793

आज राज्यात ६६,१९१ नवीन रुग्णांचे निदान

आज ६१,४५० रुग्ण बरे होऊन घरी,  आज राज्यात ६६,१९१ नवीन रुग्णांचे निदान, राज्यात आज ८३२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद  

कोल्हापुरातील ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटांसह पावसाची जोरदार हजेरी

कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाला पावसाने झोडपले, चंदगड, नेसरी भागात मुसळधार पाऊस, अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित, विजांच्या कडकडाटांसह पावसाची जोरदार हजेरी,  उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना मोठा दिलासा

उद्या मुंबईतील सर्व लसीकरण केेंद्रे सुरू राहणार, आज मुंबई महापालिकेला दीड लाख कोविशिल्ड लशींचा पुरवठा

उद्या मुंबईतील सर्व लसीकरण केेंद्रे सुरू राहणार, आज दीड लाख कोविशिल्ड लशींचा पुरवठा मुंबई महापालिकेला झाला ,


कोव्हॅक्सिन लशीचा साठा मर्यादीत असल्यानं ज्यांचा दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा असणाराय त्यांनाच ती दिली जाणाराय,


मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांची माहिती,


आज लशींचा तुटवडा असल्यानं १३२ पैकी केवळ ३७ लसीकरण केंद्रे मुंबईत सुरू होती

चंद्रपूर : वाघाच्या अवयवांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या 4 जणांना वन विभागाकडून अटक

चंद्रपूर : वाघाच्या अवयवांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या 4 जणांना वनविभागाने केली अटक... आरोपींकडून वाघाची 12 नखं, 4 दात आणि 15 मिश्या जप्त, गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाला माहिती मिळाली की काही जण वाघाचे अवयव विकण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे वनविभागाने सापळा रचून या चौघांना चंद्रपूर तालुक्यातील चेकबोर्डा - चेकनिंबाळा मार्गवर अटक केली. 

मुंबईत ऑक्सिजन तुटवड्याची चिंता मिटली

मुंबईत ऑक्सिजन तुटवड्याची चिंता मिटली...कोणताही तांत्रिक बघाड नसल्याची आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत असल्याची लिंडे कंपनीकडून फोनवरुन माहिती...प्लान बी रेडी असल्याचीही आयुक्तांची माहिती...

माजी मंत्री भाजप नेते संजय देवतळे यांचे आज (25 एप्रिल) निधन

माजी मंत्री भाजप नेते संजय देवतळे यांचे आज (25 एप्रिल) निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मागील काही दिवसांपूसन त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण करण्यास सरकार सकारात्मक

राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण करण्यास सरकार सकारात्मक असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोफत लसीकरणासाठी अनुकूल असल्याचं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं आहे.

शिवसेनेची अशी ही सामाजिक बांधिलकी , covid-19 रुग्णांच्या नातेवाईकांना दिली मोफत जेवणनाची सुविधा

कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला उपचाराकरिता  रुग्णालयामध्ये घेऊन आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणासाठी होणारी  परवड लक्षात घेता सामाजिक बांधिलकी जोपासत बुलडाणा जिल्हा शिवसेनेने रुग्णांच्या नातेवाईकांसाठी  कोविड रुग्णालयाच्या परिसरातच मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आहे . बुलढाणा येथील काेवीड  हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था करून दिली आहे  या  सुविधेमुळे कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा आधार मिळाला आहे

कोरोनाशी लढणाऱ्या भारताला मदत करा: हवामान कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांचे जगाला आवाहन

भारतात सध्या कोरोना महामारीमुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर स्वीडन येथील हवामान कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन ट्व‍ृीट करत भारत देशातील ऑक्सिजन कमरतेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहले आहे की, 'भारत देश सध्या कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेतून जात आहे. यामुळे देशात ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर आदींची कमतरता भासत आहे. त्यामुळे जगाने पुढाकार घेत कोरोनाच्या लढाईत संघर्ष करणार्‍या भारत देशाला मदत केली पाहिजे.' 

वाशिम शहरात आज पाटणी चौक इथं जुन्या भाजी मंडई मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी

वाशिम शहरात आज  पाटणी चौक इथं जुन्या भाजी मंडई मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचं चित्र आहे  इथं सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडाल्याच चित्र आहे  इथं ना पोलिसांचा बंदोबस्त ना नगरपालिका चे कर्मचारी, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी मोठी मदत होण्याची शक्यता आहे. आधीच कोरोना बाधित रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे अशा वेळी नागरिकांचा गाफीलपणा पुन्हा भोवण्याचं चित्र आहे. वेळीच प्रशासनाने सतर्कता बाळगली नाही तर मोठ्या प्रमाणात कोरोना स्फोट होऊ शकतो

आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या बदनामीचा डाव फसला, सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुण्यातील खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटिल यांना बदनाम करण्याचा हनी ट्रॅप फसला असून सातारा तालूका पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या हनी ट्रॅपमध्ये आमदारांच्या भावकितील शैलेश पाटील याचा हात असल्याच समोर आलय. या प्रकरणी सातारा तालूका पोलीस ठाण्यात शैलेश मोहिते पाटील, राहुल कांडगे, सोमनाथ शेडगे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तालूका पोलिसांनी सोमनाथ शेडगेला अटक केली आहे. 

खासदार प्रीतम मुंडे होम क्वारंटाईन

कोरोनाची काही लक्षण आढळल्यामुळे खासदार प्रीतम मुंडे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे, लवकरच आपल्या सेवेत पुन्हा रुजू होणार असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत प्रीतम मुंडे यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली असली तरीही त्या योग्य की काळजी घेत असल्याची माहिती दिली. 

औरंगाबादमध्ये आतापर्यंत एक लाख 888 रुग्ण कोरोनामुक्त

औरंगाबादेतून आजपर्यंत एक लाख 888  कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काल जिल्ह्यात तब्बल 2378 जणांना डिस्जार्ज देण्यात आला असून यामध्ये मनपा हद्दीतील 1460 तर ग्रामीण भागातील 918 रुग्णांचा समावेश आहे. आज एकूण 1497 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,17,488 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2,346 जणांचा मृत्यू झाला आहे..

पार्श्वभूमी

Covaxin Vaccine Prices : सीरम पाठोपाठ भारत बायोटेककडूनही कोरोना लसीच्या किमती जाहीर; काय असतील दर?


भारत बायोटेकने संपूर्ण स्वदेशी लस COVAXIN लसीच्या प्रति डोसच्या किमतीची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितलं की, राज्य सरकारसाठी प्रति डोस 600 रुपये आणि खाजगी रुग्णालयांसाठी 1,200 रुपये प्रति डोस दराने देण्यात येणार आहे. भारत बायोटेकने सांगितलं की, केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार, आम्ही कोवॅक्सिन लसीच्या डोसच्या किमतींची घोषणा केली आहे. 


यापूर्वी बुधवारी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ने सांगितलं होतं की, "कोविड-19 लस 'कोविशील्ड' ची किंमत राज्य सरकारसाठी 400 रुपये प्रति डोस आणि खासजी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस असणार आहे. 


'उत्पादन वाढवण्यासाठी गुंतवणुकीची गरज', कोविशिल्डच्या किंमतीवरील चर्चेवर सीरमचं स्पष्टीकरण


सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आज कोविड 19 प्रतिबंधक लस कोविशिल्डच्या किंमतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आगाऊ निधी मिळाल्यामुळे सुरुवातीला या लसीची किंमत जागतिक पातळीवर कमी होती, परंतु आता लस उत्पादन वाढवण्यात गुंतवणुकीची आवश्यकता आहे, असं स्पष्टीकरण सीरमने दिलं आहे.


सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आज कोविड 19 प्रतिबंधक लस कोविशिल्डच्या किंमतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आगाऊ निधी मिळाल्यामुळे सुरुवातीला या लसीची किंमत जागतिक पातळीवर कमी होती, परंतु आता लस उत्पादन वाढवण्यात गुंतवणुकीची आवश्यकता आहे, असं स्पष्टीकरण सीरमने दिलं आहे.


राज्यात शनिवारी 67,167 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, तर 63,118 रुग्णांची कोरोनावर मात


राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज  67 हजार 160 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 63 हजार 818 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 34 लाख 68 हजार 610 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.02 टक्के  झाले आहे. राज्यात आज 676 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 टक्के आहे.


मुंबई गेल्या 24 तासात 5867 कोरोना बाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 5867 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 29 हजार 817 वर पोहोचली आहे. सध्या 78 हजार 226 एकूण सक्रिय रुग्ण आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.