Breaking News LIVE : गोकुळच्या निवडणुकीचं काय होणार? काही ठरावदार कोरोना पॉझिटिव्ह

Breaking News LIVE Updates, 19 April 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Apr 2021 06:40 AM
Muttiah Muralitharan Admitted Apollo Hospital : मुथैया मुरलीधरन प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल

Muttiah Muralitharan Admitted Apollo Hospital : इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनला सुरुवात झाली आहे. अशातच हैदराबादच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा बॉलिंग कोच मुथैया मुरलीधरनची अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या छातीत अचानक दुखू लागल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना श्रद्धांजली

ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी सामाजिक कार्यकर्ती आणि संवेदनशील दिग्दर्शिका म्हणून केलेले काम या दोन्ही क्षेत्रासाठी यापुढेही मार्गदर्शक ठरेल. समाजातील संवेदनशील विषयावर भाष्य करण्यासाठी त्यांनी चित्रपट या माध्यमाच्या ताकदीचा पुरेपूर वापर केला. आपल्या दिग्दर्शन कौशल्याने त्यांनी सामाजिक प्रश्नांची जाणीव करून देणारा आरसाच समाजासमोर धरला.  मनोरंजन क्षेत्राचा हा पैलू उलगडून दाखवून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला वेगळी वाटही घालून दिली. उत्तम चित्रपट निर्मिती बरोबरच त्यांनी  समाजप्रबोधनातही मोठे योगदान दिले आहे.त्यांच्या निधनामुळे या दोन्ही क्षेत्रांना जोडणारा दुवा निखळला आहे. ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

यवतमाळ :मानसिक संतुलन बिघडलेले युवकाने केले दोन लोकांना ठार तर पाच जण गंभीर जखमी

यवतमाळ : मध्यरात्री दरम्यान झोपेत असलेल्या भावकीतील दोन लोकांचा कुऱ्हाडीने खून करून पाच लोकांना जखमी केल्याची घटना पुसद तालुक्यातील कारला देव येथे घडली. सदर आरोपीचे मानसिक संतुलन बिघडल्याने हे हत्याकांड घडल्याचे बोलले जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल. गोकुळ  राठोड वय 23 वर्ष हा युवक कारला देव येथे हा कुटुंबासोबत राहतो. काल मध्यरात्री दरम्यान 3 च्या सुमारासची घटना. वसंता राठोड आणि नेरचंद राठोड यांचा घटनेत मृत्यू

विजेच्या पोलवर चढलेला कर्मचारी विजेच्या धक्क्याने कोसळला जमिनीवर

विजेच्या पोलवर चढलेला कर्मचारी विजेच्या धक्क्याने कोसळला जमिनीवर. वाळूज परिसरातील बाजरी गल्लीतील घटना. वीज कर्मचारी जमिनीवर कोसळल्याची भीषण दृष्य कॅमेऱ्यात कैद. गणपत पट्टेकर असं वीज कर्मचाऱ्याचे नाव. महावीतरणचे अधिकारी कर्मचाऱ्याकडून करून घेत होते बेकायदेशीर पद्धतीने काम, वीज कर्मचाऱ्याची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू

गोकुळच्या निवडणुकीचं काय होणार?

गोकुळचं मतदान 2 मे रोजी होणार आहे. वर्षभर लांबलेली निवडणूक नेमकी कोरोना काळात जाहीर झाली. पण आता पुन्हा निवडणूक रद्द करण्याची मागणी होते आहे. सुप्रीम कोर्टात ही काहींनी धाव घेतली आहे. गोकुळचे काही ठरावदार पॉझिटिव्ह आले आहेत.. कोल्हापुरातला आकडा वाढत असताना या निवडणुकीचं काय होणार??

प्रियंका गांधी यांची नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर टीका

जेव्हा देशातील कानाकोपऱ्यात रेमडेसिवीर उपलब्ध व्हावं म्हणून लोक वणवण करत आहेत. तसेच जीव वाचवण्यासाठी रेमडेसिवीर शोधण्यासाठी रुग्णांचे ससेहोलपट सुरु आहे. त्याचवेळी जबाबदार पदावर राहिलेल्या भाजप नेत्यांचं रेमडेसिवीर साठवून ठेवण्याचं कृत्य हे मानवतेच्या विरोधात गुन्हा आहे. 

कोरोनाच्या अभूतपूर्व स्थितीवर चर्चेसाठी संसदेचं दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे. 

सुमित्रा भावे यांचं निधन

ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या सुमित्रा भावे यांचं निधन. वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कलाविश्वातून हळहळ व्यक्त 

कोरोनामुक्त इस्रायल

कोरोनामुक्त झाल्याची घोषणा करणारा इस्रायल ठरला पहिला देश. लसीकरणानंतर इस्रायलमधील निर्बंध शिथिल. 

सिंधुदुर्ग : मळगावात 40 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केली जात आहे. रात्री राज्य उत्पादन शुल्क विभाग इन्सुलीच्या पथकाने दारू वाहतुकी विरोधात केलेल्या कारवाईत 40 लाखाच्या दारूसाठ्यासह एकूण 50 लाख 42 हजार इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत चालकाला अटक करण्यात आली असून त्यावर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग इन्सुली यांना टेम्पोमधून दारू वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

'सरकारला माहिती न देता रेमडेसिवीर कसं खरेदी करतात? नवीन कायदा आलाय का?' राष्ट्रवादीचा भाजपला सवाल

मुंबई : राज्य सरकारला, स्थानिक अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना माहिती न देता लोकांचे प्राण वाचवणारं रेमडेसिवीरसारखं औषध भाजपवाले कसे खरेदी करु शकतात? नवीन कायदा आला आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. एका साठेबाजाची बाजू घेण्यासाठी राज्यातील दोन विरोधी पक्षनेते रात्रीच्या वेळी पोलिस स्टेशनमध्ये जातात असं म्हणत जयंत पाटील यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. 

दरम्यान साठेबाजाला चौकशीला बोलावून दोन तास चौकशी केल्याबद्दल जयंत पाटील यांनी पोलिसांचे कौतुक देखील केले. पोलिसांनी त्यांचं काम चोखपणे पार पाडलं आहे असेही जयंत पाटील म्हणाले आहेत. 

Maharashtra Coronavirus : 'या' सहा राज्यांतून महाराष्ट्रात प्रवेशासाठी RTPCR चाचणी बंधनकारक

Maharashtra Coronavirus : महाराष्ट्रात वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्य सरकारनं कडक निर्बंध लादले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय. राज्य सरकारनं आता बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष देण्यासाठी नवा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडला 'उत्पत्तीची संवेदनशील ठिकाणे' (Places of Sensitive Origin) म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणांहून प्रवास करणार्‍या प्रवाशांना महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी 48 तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवालाची आवश्यकता असेल. आज याबाबत राज्य सरकारकडून एसओपी जारी करण्यात आल्या आहेत. 

लातूरमध्ये शेतात विहीर खोदण्याचं काम सुरु असताना पोकलेनचा विचित्र स्फोट, हवेत उडालेले स्पेयर पार्ट लागून दोन ठार

लातूर : जिल्ह्यातील देवकरा गावाच्या शिवारात रात्री विचित्र घटना घडली आहे. या गावातील प्रभाकर मुरकुटे यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरु होते. यासाठी पोकलेनची मदत घेण्यात येत होती. पोकलेनच्या मदतीने काम जलद गतीने करावे असा त्यांचा विचार होता. यासाठी देवकरा गावाच्याच बाजूच्या कोळवाडी गावातील दहिफळे यांनी मध्यस्ती करत पोकलेन भाड्याने मिळवून दिला होता. रात्री साडे आठ वाजता शेतात विहीर खोदण्याचं काम सुरु असतानाच अपघात झाला. पोकलेनचा भीषण स्फोट झाला. त्याचे सर्व लोखंडी सामान आणि त्याचे स्पेयर पार्ट हवेत उडाले.
 
पोकलेनचे उडालेले भाग बाजूलाच उभे असलेले प्रभाकर मुरकूटे आणि दहिफळे यांच्या अंगावर पडले. या अपघातात या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोकलेनला भीषण आग लागली होती. मोठा आवाज ऐकून लोक घटनास्थळी धावले. घटनेची माहिती किणगाव पोलीस ठाण्यास मिळताच तत्काळ अहमदपूर येथून अग्निशमन दलाच्या गाडीस पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. 

पार्श्वभूमी

Maharashtra Coronavirus : 'या' सहा राज्यांतून महाराष्ट्रात प्रवेशासाठी RTPCR चाचणी बंधनकारक, राज्य सरकारचा निर्णय

Maharashtra Coronavirus : महाराष्ट्रात वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्य सरकारनं कडक निर्बंध लादले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय. राज्य सरकारनं आता बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष देण्यासाठी नवा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडला 'उत्पत्तीची संवेदनशील ठिकाणे' (Places of Sensitive Origin) म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणांहून प्रवास करणार्‍या प्रवाशांना महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी 48 तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवालाची आवश्यकता असेल. आज याबाबत राज्य सरकारकडून एसओपी जारी करण्यात आल्या आहेत. 

राज्यात काल आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज पुन्हा एकदा राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज  68 हजार 631 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 45 हजार 654 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 31 लाख 6 हजार 828 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 70 हजार 388 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80.92 टक्के  झाले आहे.

राज्यात आज मृतांचा आकडाही 500 च्या वर गेला आहे. आज एकूण 503 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.58 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 60 हजार 473 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या 503 मृत्यूंपैकी 210 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 128 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 165 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत. 

लातूरमध्ये पोकलेनचा विचित्र स्फोट; हवेत उडालेले स्पेयर पार्ट्स लागून दोन जण ठार

लातूर : जिल्ह्यातील देवकरा गावाच्या शिवारात रात्री विचित्र घटना घडली आहे. या गावातील प्रभाकर मुरकुटे यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरु होते. यासाठी पोकलेनची मदत घेण्यात येत होती. पोकलेनच्या मदतीने काम जलद गतीने करावे असा त्यांचा विचार होता. यासाठी देवकरा गावाच्याच बाजूच्या कोळवाडी गावातील दहिफळे यांनी मध्यस्ती करत पोकलेन भाड्याने मिळवून दिला होता. रात्री साडे आठ वाजता शेतात विहीर खोदण्याचं काम सुरु असतानाच अपघात झाला. पोकलेनचा भीषण स्फोट झाला. त्याचे सर्व लोखंडी सामान आणि त्याचे स्पेयर पार्ट हवेत उडाले.
 
पोकलेनचे उडालेले भाग बाजूलाच उभे असलेले प्रभाकर मुरकूटे आणि दहिफळे यांच्या अंगावर पडले. या अपघातात या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोकलेनला भीषण आग लागली होती. मोठा आवाज ऐकून लोक घटनास्थळी धावले. घटनेची माहिती किणगाव पोलीस ठाण्यास मिळताच तत्काळ अहमदपूर येथून अग्निशमन दलाच्या गाडीस पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.