Breaking News LIVE : पुणे जिल्ह्यात 5473 कोरोना रुग्णांची नोंद तर 27 रुग्णांचा मृत्यू

Breaking News LIVE Updates, 19 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Mar 2021 06:40 AM
औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी एकूण 1679 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर 

औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी एकूण 1679 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली तर 20 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 54,056 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 65,922 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1408 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 10458 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नागपूर पोलिस परीक्षार्थींना सहकार्य करणार : डीसीपी विनिता शाहू

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी उद्या घराबाहेर निघणाऱ्या परीक्षार्थींनी त्यांचे परीक्षेसाठीचे ओळखपत्र सोबत बाळगावे आणि कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात ठीकठिकाणी सुरू असलेल्या नाका-बंदीच्या ठिकाणी उपस्थित पोलिसांनी थांबविल्यास त्यांचे परीक्षेचे ओळखपत्र दाखवून परीक्षा केंद्रकडे जावे असे आव्हान नागपूर पोलिसांनी केले आहे.


नागपूर पोलीस परीक्षार्थींना पूर्ण सहकार्य करणार असून जर परीक्षार्थींना परीक्षा केंद्रापर्यंत सोडायला त्यांचे अभिभावक किंवा इतर कोणी व्यक्ती जात असेल तर पोलिस त्यांना जाऊ देतील अशी माहिती जोन 2 च्या डीसीपी विनिता शाहू यांनी दिली आहे. विशेष म्हणजे सध्या नागपुरात वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर दुचाकीवर एकच प्रवाश्याला जाण्यास परवानगी आहे. मात्र, उद्याच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षार्थींना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

धुळे तालुक्यातील उडाणे गोताने चौगाव या ठिकाणी गारपीट

धुळे तालुक्यातील उडाणे गोताने चौगाव या ठिकाणी गारपीट झाल्याने गहू आणि हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या कार चालकाचं बिंग फुटलं, लोणावळा पोलिसांकडून एकाला अटक

अपघातात मृत्यू झाला असा बनाव करणाऱ्या कार चालकाचं बिंग पुण्यातील लोणावळा पोलिसांनी फोडलं आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर हा प्रकार शुक्रवारी घडला. सतीश ओझरकर आणि रामदास ओझरकर यांच्यात दोन दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. त्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी रामदासने अपघाताचा बनाव रचला. सतीश दुचाकीवरुन जात असताना रामदासने मागून चारचाकीने धडक दिली आणि नंतर लोखंडी रॉडने प्रहार केला. त्यानंतर हा अपघात झाला असं पोलिसांना भासवण्यात आलं. मात्र शरीरावरील जखमा पाहून पोलिसांनी उलट तपास केला असता हा बनाव असून हत्या झाल्याचं समोर आलं.

धुळे शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

धुळे शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान. बाजारपेठेत नागरिकांची तारांबळ. जिल्ह्यात 3 दिवस पाऊस होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज.

२२ ते ३१ मार्च दरम्यान परभणी जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक

परभणी जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी निर्बंध आणखी कडक केले आहेत. परभणी जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा चालणारी खाजगी व एसटीची प्रवासी वाहतुक 22 ते 31 मार्च पर्यंत पुर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेत शिवाय याच दरम्यान हॉटेल्स,रेस्टारंट,चहा ढेले,पाणीपट्टी हि बंद ठेवुन केवळ पार्सल सुविधा देण्याला मुभा असणार आहे.अगोदरच जिल्ह्यात सर्व आंदोलन,धार्मिक स्थळ,शाळा,महाविद्यालय 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहेत शिवाय 25 मार्च पर्यंत जिल्हाभरात संध्याकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागु करण्यात आलेली आहेत.महत्वाचे म्हणजे 10 दिवस एसटी पुर्णतः बंद ठेवण्यात येणार असल्याने 800 ते 900 गाड्या ह्या जागेवर उभ्या राहतील ज्यातून प्रतिदिन एसटी महामंडळाला 30 ते 40 लाखांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील अंतापूर तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजा नुसार नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याच्या आदिवासी पट्टा असलेल्या मुल्हेर,अंतापूर या परिसरात आज दुपारच्या सुमारास गारपीटीसह जोरदार पावसाने काही काळ हजेरी लावली,अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे  या परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कांदा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे

नागपूरमधील निर्बंध 31 मार्चपर्यंत सुरु राहणार, पालकमंत्री नितीन राऊत यांची माहिती

नागपुरात 21 मार्चपर्यंत कडक निर्बंध लावले होते. संसर्ग कमी करण्यासाठी कठोर प्रयत्न केले. आज कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा सर्वपक्षीय आढावा बैठक घेतली. तज्ज्ञांची मतं जाणून घेतली, व्यापारी वर्गाचीही मतं लक्षात घेतली. ज्या सूचना मिळाल्या त्याला अनुसरुन सध्या सुरु असलेले निर्बंध 31 मार्चपर्यंत सुरु राहणार आहेत, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.

मालेगावच्या मोहन चित्रपटगृहाबाहेर तुफान गर्दी, कोरोनाविषयक नियम पायदळी

मालेगावच्या मोहन चित्रपटगृहाबाहेर तुफान गर्दी पाहायला मिळाली. अभिनेता जॉन अब्राहन आणि इम्रान हाश्मी यांचा 'मुंबई सागा' काल प्रदर्शित झाला. चित्रपट पाहण्यासाठी शौकिनांची मोठी गर्दी झाली होती. चित्रपटाचं तिकीट मिळवण्यासाठी झुंबड उडाली होती. त्यातच काही जण तिकीट मिळवण्यासाठी उड्या मारतानाच व्हिडीओही व्हायरल झाला आहे. यावेळी कोरोनाविषयक सर्व नियम पायदळी तुडवले गेले.

दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान, इयत्ता बारावी परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान

बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान, इयत्ता बारावी परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे नियोजित वेळपत्रकानुसार ऑफलाईनच होणार, परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांच्या शाळेत होणार,  80 मार्क च्या लेखी परिक्षेसाठी अर्धा तास वाढवून देणार,  40 ते 50 मार्कसाठी असलेल्या परिक्षेसाठी 15 मिनिटे वाढवून देणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती 

हिंगोलीत वेडाच्या भरात तरुणाकडून आजी आणि मावशीची हत्या

वेडाच्या भरात एका तरुणाने स्वतःच्या मावशी व आजीचा हातपाय बांधुन कुऱ्हाडीने वार करत खून केलाय.हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असुन आरोपी तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हिंगोलीत वेडाच्या भरात तरुणाकडुन आजी अन मावशीचा खुन
वेडाच्या भरात एका तरुणाने स्वतःच्या मावशी व आजीचा हातपाय बांधुन कुऱ्हाडीने वार करत खून केलाय.हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असुन आरोपी तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून एकाची हत्या

नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून एकाची हत्या,देगलूर तालुक्यातील बल्लूर येथील घटनेमुळे खळबळ. एका 22 वर्षाच्या तरुणावर  लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांचा वापर करत हल्ला.  या हल्यात तरुणाचा जागीच मृत्यू.  योगेश धर्माजी असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे.

चिमुर युवक काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्षाविरोधात दारूतस्करीचा गुन्हा दाखल

 


युवक काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्षाविरोधात दारूतस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यातील काँग्रेस पक्षावर पुन्हा एकदा नामुष्की ओढावली आहे. गौतम पाटील असं दारू तस्करीच्या गुन्हात नाव नोंदविलेल्या आरोपीचे नाव असून तो चिमूर विधानसभा युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे. चिमूर तालुक्यातील पळसगाव-पिपर्डा भागात काल संध्याकाळी पोलिसांनी एका स्कॉर्पिओ गाडीतून होणारी दारू तस्करी पकडण्याचा प्रयत्न केला पण आरोपी रस्त्याच्या बाजूला दारूचे बॉक्स फेकून फरार झाले. फरार आरोपींमध्ये गौतम पाटील हा असल्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चिमूर पोलिसांनी 15 पेटी देशी-विदेशी दारू जप्त केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच ब्रम्हपुरी शहरातील काँग्रेस नगरसेवक महेश भर्रे याच्यावर देखील दारूतस्करी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय पक्षाचे पदाधिकारीच दारू तस्करीत सहभागी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे चिपळूण कामथे ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे चिपळूण कामथे ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला. चौपदरीकरणाच्या अपुऱ्या कामाचा फटका प्रवाशांना बसतोय..गेल्या सहामहिन्यात संगमेश्वर चिपळूण या महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे.त्यामुळे कामथे येथील रहिवाशांनी आज चौपदरीकरणाचे काम घेणाऱ्या ईगल कंपनी समोर रस्ता रोखून ठेवला आहे..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यवाहपदी दत्ताजी होसबळे यांची नियुक्ती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यवाहपदी दत्ताजी होसबळे यांची नियुक्ती, अखिल भारतीय प्रतिनिधि सभेत निर्णय 

कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्याने धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील एका शिक्षकाची तापी नदीत उडी मारून आत्महत्या

कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्याने धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील एका शिक्षकाने तापी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  शिरपूर येथील रहिवासी असणारे राजेंद्र भानुदास पाटील यांना कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आली होती, आपल्याला कोरोना झाला आहे, या भीतीतून राजेंद्र पाटील यांनी तापी नदीवरील सावळदे फाटा येथून उडी मारून नदीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दरम्यान घटनास्थळी राजेंद्र पाटील यांची दुचाकी गाडी तसेच डॉक्टरांची फाईल मिळून आली आहे. या घटनेमुळे शिरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. राजेंद्र पाटील यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.

रत्नागिरी - खेड (MIDC) घरडा केमिकलमध्ये मोठा स्फोट, पाच कामगारांचा मृत्यू

रत्नागिरी खेड (MIDC) घरडा केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट. कंपनीतील 7b प्लॅंटमध्ये एका पाठोपाठ दोन स्फोट. 40 ते 50 जण आतमध्ये अडकल्याची भीती. पाच कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू.  

धुळे- कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणून शिरपूर येथील शिक्षकाची आत्महत्या

कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणून शिरपूर येथील शिक्षकाने केली आत्महत्या. सावळदे फाटा येथून तापी नदीत उडी मारुन केली आत्महत्या. नदीच्या पुलावर आढळून आली मोटारसायकल आणि दवाखान्याची फाईल.

वर्धा जिल्ह्यात आर्वी, कारंजा भागाला वादळाचा जोरदार तडाखा
 गुरुवारी, शुक्रवारी वर्धा जिल्ह्यात आर्वी, कारंजा भागाला वादळाचा जोरदार तडाखा बसला.. शुक्रवारी रात्रीदेखील जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात विजांचा कडकडाट, वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली.. प्राथमिक माहितीनुसार वादळामुळे आर्वी तालुक्यात  ५ घरे, २ गोठ्यांचे, कारंजा तालुक्यात एका घराचे नुकसान झालंय.. शासकीय यंत्रणेकडून नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे... शेतात भाजीपाला, फळपिके मोठ्या प्रमाणात आहे... अनेकांचा गहू, चणा काढणीला आला... अचानक आलेल्या पाऊस आणि वादळात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.. वादळामुळे काही भागात वीज पुरवठा तात्पुरता खंडित झाला होता..

 
लोहा नगरपालिकेकडून 20 मार्च ते 23 मार्च दरम्यान जनता कर्फ्युचं आवाहन

नांदेड जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्येचा आकडा लक्षात घेऊन व कोरोना साखळी तोडण्यासाठी लोहा नगरपालिकेने 20 मार्च ते 23 मार्च दरम्यान जनता कर्फ्युचं आवाहन केले आहे. या जनता कर्फ्यु दरम्यान शहरातील सर्व किराणा दुकान, कापड दुकान,जनरल स्टोअर्स, हॉटेल्स,भाजीपाला, आठवडी बाजार सह कॉलेज, क्लासेस सह सर्व बाजारपेठ बंद राहणार आहे.जे लोक व्यापारी याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर  फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कार्यवाही करण्यात येईल.त्यामुळे जनता कर्फ्यु चे पालन सर्व नागरिकांनी ,व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्तीने करून नगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलंय.

वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम त्वरित थांबवण्याची बच्चू कडू यांची मागणी

राज्यात विद्युत विभागाचे कृषी विद्युत कनेक्शन सरसकट तोडण्याची चालू असलेली मोहीम त्वरित थांबवण्याची मागणी राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.. शेतकऱ्यांना दिवसातून 8 तास वीज मिळते..महिन्यातून 10 दिवस वीज आणि बिल देता महिन्याभराचं हे चुकीचं असून याचा विचार केला पाहिजे या आशेच पत्र बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांना दिलं आहे.

24 वर्षाच्या राजकारणात पहिल्यांदा निवडणूक जिंकता येत नाही म्हणून बहिष्कार टाकल्याचे पाहिले - धनंजय मुंडे

 


आज होणार्‍या बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपाने बहिष्कार टाकला असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. हा बहिष्कार नसून निवडणुकीतून पळून जाण्याचा प्रकार आहे असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.. तसेच 24 वर्षाच्या राजकारणात आपण पहिल्यांदाच जिथे निवडणूक जिंकता येत नाही तिथे बहिष्कार टाकला असल्याचे पाहिले असे धनंजय मुंडे म्हणालेत..


हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जिथे निर्णय देण्यात आला तिथे महाविकास आघाडी सरकार आणि मंत्र्यांनी निवडणुकीत लोकशाही चा घात केला असे कसे म्हणता येईल मुळात या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे जास्त मतदार आहेत त्यांनी तर ही निवडणूक लढायला पाहिजे होते, मात्र ज्यावेळी त्यांना आपला पराभव दिसला त्यामुळे ते रणांगण सोडून पळाले आहेत, असे मत यावेळी पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवर धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं आहे

नागपुरात ओली पार्टी करणारे तीन पोलीस कर्मचारी निलंबित

नागपुरात लकडगंज परिसरातील सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणजे एसीपी कार्यालयात ओली पार्टी करणारे तिन्ही पोलीस कर्मचारी निलंबित. संबंधित जोनचे डीसीपी लोहित मतानी यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.  3 तीन मार्च रोजी एका खाजगी व्यक्तीकडून या तिघांनी कार्यालयात बसूनच दारू आणि मटणाची व्यवस्था करून घेत पार्टी केली होती... त्या व्यक्तीचा पोलिसांकडे अडलेला एक काम करून देण्याचे आश्वासन देत पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडून ही पार्टी घेतल्याची माहिती आहे.

पार्श्वभूमी

अंबानींच्या घराबाहेर घटनेचं नाट्यरुपांतर; सचिन वाझे यांना कुर्ता घालून चालायला लावलं
 उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणी सध्या एनआयए ही तपास यंत्रणा संशयित आरोपी सचिन वाझे यांची कसून चौकशी करत आहे. याच पार्श्वभूमीवर घटनास्थळावर सचिन वाझे यांना आणून घटनेचे नाट्यरुपांतर करण्यात आले आहे. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्यानंतर सीसीटिव्हीमध्ये जे फुटेज मिळाले त्याप्रमाणे हे नाट्यरुपांतर करण्यात आले आहे. जवळपास अर्धा तास हे रुपांतर चालू होते.


 मुंबईत कोरोना रुग्णांचा उच्चांक


देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. दरदिवशी कोरोना रुग्णांचा उच्चांक पाहायला मिळत आहे. मागील वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक पाहायला मिळाला आहे. आज दिवसभरात मुंबईत तब्बल 3062 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शहरात आतापर्यंत 3 लाख 55 हजार 897 रुग्ण आढळले आहेत. मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यानंतर दिवसेंदिवस आकडेवारी वाढत आहे. बुधवारी (17 मार्च) 2377 रुग्णांची नोंद झाली होती. काल (18 मार्च) ही संख्या तब्बल 500 रुग्णांनी वाढून 2877 वर पोहोचली आहे. ही आकडेवारी आतापर्यंतची सर्वाधिक असल्याची नोंद झाली होती. परंतु आज रुग्णसंख्येने उच्चांक गाठला, एका दिवसातील रुग्णसंख्या तीन हजारांच्या पार पोहोचली. आज 3062 नवे रुग्ण आढळले आहेत.


राज्यभरात 25 हजार 681 नवे कोरोनाबाधित
महाराष्ट्रात मागील 24 तासात 25 हजार 681 नव्या कोरोनाबाधितांचं निदान झालं आहे. तर 70 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. आतापर्यंत एकूण 24 लाख 22 हजार 021 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 21 लाख 89 हजार 965 जण कोरोनातून मुक्त झाले आहे. आतापर्यंत 53 हजार 208 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1 लाख 77 हजार 560 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत.


व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम तब्बल 40 मिनिटं डाऊन; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
WhatsApp Instagram Down: शुक्रवारी रात्री व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना सुमारे 40 मिनिटे त्रास सहन करावा लागला. रात्री अकराच्या सुमारास बर्‍याच व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांनी मेसेज पाठविण्यात आणि प्राप्त करण्यात अडचणी येत असल्याची तक्रार केली. ही समस्या सुमारे 11:40 पर्यंत कायम राहिली. वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅपला सिस्टमशी जोडण्यातही अडचण आली. यानंतर, वापरकर्त्यांनी ट्विटरवर याबद्दल तक्रार करत मीम्स शेअर केले. व्हॉट्सअ‍ॅप डाऊन असा ट्वीटर ट्रेंडही तयार झाला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.