Breaking News LIVE : लातूर जिल्ह्यात मागील अनेक दिवसातील सर्वात मोठा आकडा समोर

Breaking News LIVE Updates, 19 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Mar 2021 08:18 AM
परमबिर सिंह प्रकरण आणि राज्यातील राजकीय स्थितीचा अहवाल महाराष्ट्र प्रभारी काँग्रेस नेतृत्वाला दिल्लीला पाठवणार

परमबिर सिंह प्रकरण आणि राज्यातील राजकीय स्थितीचा अहवाल महाराष्ट्र प्रभारी काँग्रेस नेतृत्वाला दिल्लीला पाठवणार. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी आज राज्यातील स्थितीबाबत आणि परमबिर सिंह प्रकरणाबाबत राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. पाटील यांनी केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर एच. के. पाटील आपला अहवाल केंद्रीय नेतृत्वाला पाठवणार.

लातूर जिल्ह्यात मागील अनेक दिवसातील सर्वात मोठा आकडा समोर

लातूर जिल्ह्यात मागील अनेक दिवसातील सर्वात मोठा आकडा समोर आला आहे. मागील 24 तासांत 377 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील उपचार घेत असलेले बाधित रुगणाची संख्या 2 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. लातूर जिल्ह्यात 1141 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 159 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 261 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 1634  रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 218 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28287 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 2035 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 722 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 25530 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 143 आहे.

नांदेड जिल्ह्यात 24 मार्चपासून 11 दिवसांची संचारबंदी...

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करत लिहिलं, 'नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्शिती चिंताजनक होते आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्‍यांसमवेत आज सकाळी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली. कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व  उपाययोजना तातडीने कराव्यात, असे निर्देश मी या बैठकीत दिले.'

पुण्यातही अवकाळी पावसाची हजेरी

पुण्याच्या मावळ तालुक्यात ही अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट ही झाली. मावळ तालुका हा पर्यटनासाठी ओळखला जातो, त्यात आज सुट्टीचा दिवस असल्याने या गारपिटीत पर्यटकांनी आनंद घेतला. गेली अनेक दिवस नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत, या गारपिटीने मात्र ते सुखावले आहेत.

भिवंडीत अय्यपा मंदिरात चोरी, चोरट्यांनी दानपेटी फोडली

भिवंडी शहरातील वऱ्हाळ देवी रोड येथील अय्यपा मंदिरात मागील दरवाजा फोडून शिरलेल्या चोरट्यांनी मंदिरातील चार दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरी केल्याची घटना समोर आली आहे. वऱ्हाळ चौक या ठिकाणी हे मंदिर असून सकाळी नियमित पूजा करण्यासाठी मंदिराचे पुजारी यांनी मुख्य दरवाजा उघडला असता त्यांना मंदिरातील चार दान पेट्या फोडल्याचे लक्षात आले. त्यांनी ही बाब तात्काळ मंदिर व्यवस्थापक विश्वनाथ शेट्टी यांना कळविली असता त्यांनी शहर पोलिसांना खबर दिली. या मंदिराचा मागील लाकडी दरवाजा लोखंडी पाईपाने तोडून आत शिरलेल्या चोरट्यांनी मंदिरातील चार दानपेटी फोडून त्यातील रक्कम काढली त्यापैकी एक दानपेटी उघडली न गेल्याने चोरट्यांनी ती दानपेटी काही अंतरावर नेऊन दगड आपटून दानपेटी फोडली. या चोरीच्या घटनेबाबत मंदिर व्यवस्थापक विश्वनाथ शेट्टी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या मंदिरातील सीसीटीव्हीचे डिव्हीआर रेकॉर्डिंग बंद असल्याचे आढळून आले आहे. शहर पोलीस ठाणे अंतर्गत वऱ्हाळ देवी चौक या परिसरात नियमित गस्त व बंदोबस्त असतानाच शनिवारी रात्री या ठिकाणी नाकाबंदी सुध्दा करण्यात आली असतानाही त्यापासून हाकेच्या अंतरावरील मंदिरात चोरी झाल्याने भक्तांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठकांचं सत्र

शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठकांचं सत्र. प्रफुल्ल पटेल, कमलनाथही उपस्थित. अजित पवार, जयंत पाटील शरद पवारांच्या भेटीला. गृहखात्यापुढं आलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर बैठक 

कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस

गडहिंग्लज, नेसरी भागात मुसळधार पाऊस. जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण. मुसळधार पावसाने नागरिकांची दाणादाण.  गारपीटसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस. शेतात असलेल्या रब्बी पिकांना पावसाचा मोठा फटका बसणार. अनेक गावातल्या आठवडी बाजारांवर पावसाचा परिणाम

उल्हासनगरात महिलेची तीक्ष्ण हत्याराने हत्या

उल्हासनगर शहरात महिलेची तीक्ष्ण हत्याराने हत्या झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलीय. कॅम्प नंबर 4 च्या 26 सेक्शन परिसरात मृत विद्या तलरेजा आणि त्यांची मुलगी राहते. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी घरात शिरून तीक्ष्ण हत्याराने वार करून दगडाच्या साहाय्याने हत्या केली. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ही हत्या कोणी केली याचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी संशयित दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केलाय.

परभणीत एमपीएससी परीक्षेत 3900 पैकी 1400 परीक्षार्थी अनुपस्थित

तब्बल चार वेळेला रद्द झालेली राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आज पार पडली. मात्र, या परीक्षेत परभणीत 3900 पैकी तब्बल 1400 विद्यार्थी अनुपस्थित राहिले आहेत. परभणीत 15 परीक्षा केंद्रांवर आज दोन सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडली. सकाळी 10 ते 12 या वेळेत पहिला पेपर पार पडला, ज्यात 3907 पैकी 2508 विद्यार्थी उपस्थित राहिले तर 1399 परीक्षार्थी अनुपस्थित होते तर दुपारी 3 ते 5 यावेळत झालेल्या दुसऱ्या पेपरला याहून कमी परीक्षार्थी उपास्थित होते. या पेपरला 3907 पैकी 2498 जणांनी परीक्षा दिली तर तब्बल 1409 परीक्षार्थी अनुपस्थित राहिलेत. जेव्हा 14 मार्च रोजी होणारी परीक्षा चौथ्यांदा रद्द झाली. तेव्हा याविरोधात राज्यभरात आंदोलन झाले होते. परभणीतही या परीक्षार्थींनी आंदोलन केले होते. मात्र, प्रत्यक्ष परीक्षा झाली तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर परीक्षार्थी अनुपस्थित राहिल्याने भावी अधिकारी आपल्या परीक्षेबाबत किती सजग आहेत हे स्पष्ट झालंय.

येवल्यात भाजपच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निषेध

 


 येवल्यात विंचूर चौफुली येथे भाजपा च्या वतीने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निषेध करत आंदोलन करण्यात आले.  यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष तरंग गुजराथी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये पाच जागांवर राष्ट्रवादी विजयी

बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये एकूण आठ जागेसाठी आज मतमोजणी झाली त्यात पाच जागेवर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळाला आहे तर भाजप पुरस्कृत सुरेश धस गटाच्या एका उमेदवाराचा विजय झालाय त्यासोबतच शिवसेना पुरस्कृत जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाच्या एक उमेदवार निवडून आला आहे विशेष म्हणजे अपक्ष निवडणूक लढलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पापा मोदी यांचाही या निवडणुकीमध्ये विजय झाला आहे..

सुप्रीम कोर्टात उद्या मराठा आरक्षणासंदर्भात  सुनावणी आधी ऍडव्होकेट जनरल दिल्लीत

सुप्रीम कोर्टात उद्या मराठा आरक्षणासंदर्भात  सुनावणी आधी ऍडव्होकेट जनरल दिल्लीत, अडवोकेट जनरल आशुतोष कुंभकोणी राज्य सरकारच्या वतीने वकील पटवालिया आणि कपिल सिब्बल यांच्याशी चर्चा करणार. पुढचे दोन दिवस सुप्रीम कोर्टात राज्य सरकारचा युक्तिवाद होणार आहे..त्या पार्श्भूमीवर महत्वाची घडामोड

 भारतीय जनता युवा मोर्चाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन

भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आंदोलन संविधान चौकावर सुरू असताना अचानकच भारतीय जनता युवा मोर्चाचे काही कार्यकर्ते सिविल लाइन्स परिसर मधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांनी गृहमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला सोबतच रस्त्यावर बसून धरणे आंदोलनही केले . गृहमंत्र्यांवर झालेल्या गंभीर आरोपानंतर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपकडून केली जात आहे आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करत अचानक सर्व सुरक्षा व्यवस्था फोल ठरवत थेट गृहमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केले आहे. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या सुमारे पंचवीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला आणि आता सर्वांना पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले आहे

कणकवलीत भर चौकात 2 वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न 

 


सिंधुदुर्गातील कणकवली शहरातील पटवर्धन चौकात सेवा बजावत असताना वाहतूक पोलीस हवालदार विश्वजित परब आणि हवालदार चंद्रकांत माने यांच्या अंगावर एका युवकाने पेट्रोल ओतून आगकाडीने आग लावण्याचा प्रयत्न केला. प्लास्टिक बाटलीतून आणलेले पेट्रोल त्या युवकाने हवालदार परब आणि हवालदार माने यांच्या अंगावर ओतले. जीवे मारण्याचा त्या युवकाने केला असून त्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी त्या पोलिसांना आगकाडीने आग लावण्याचा प्रयत्न करत असतानाच बाजूला उभे असलेल्या आरोग्य सेवक भालचंद्र साळुंखे यांनी त्या युवकाला पकडून त्याला पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांवर हल्ला केलेल्या त्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू केली आहे. अचानक घडलेल्या या प्रकाराने कणकवली शहरासह पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे.

नांदेडमध्ये काल दिवसभरात 947 नवे कोरोनारुग्ण, तर 7 रुग्णांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा धडकी भरवणारा आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना आकडेवारीमुळे सामान्य माणसाच्या जीवाचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही. कारण काल दिवसभरात जवळपास 947 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 31 हजार असून जवळपास 6 हजार रुग्ण सध्या उपचार घेत असून मृत्यू संख्या 625 वर पोहचलीय.

वाशिम अवकाळी पाऊस अपडेट :

वाशिम जिल्ह्यात रात्री विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस बरसला त्यामुळे सध्या वातावरणात गारवा आहे.


 

नांदेडमध्ये काल दिवसभरात 947 कोरोना पॉझिटिव्ह तर 7 रुग्णांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यातील जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा धडकी भरावणारा आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना आकडेवारी मुळे सामान्य माणसाच्या जीवाचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही. कारण काल दिवसभरात जवळपास 947 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले असून 7 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 31 हजार असून जवळपास 6 हजार रुग्ण सध्या उपचार घेत असून मृत्यू संख्या 625 वर पोहचलीय.

पार्श्वभूमी

औरंगाबाद कोरोना अपडेट :


औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 1679 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर, तर 20 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे .आज 558 जणांना (मनपा 464, ग्रामीण 94) सुट्टी  देण्यात आली. आजपर्यंत 54056 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1679 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 65922 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1408 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 10458 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


 


वाशिम अपडेट :


वाशिम जिल्ह्यात रात्री विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस बरसला त्यामुळे सध्या वातावरणात गारवा आहे.


 


नांदेडमध्ये काल दिवसभरात 947 नवे कोरोनारुग्ण, तर 7 रुग्णांचा मृत्यू


नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा धडकी भरवणारा आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना आकडेवारीमुळे सामान्य माणसाच्या जीवाचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही. कारण काल दिवसभरात जवळपास 947 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 31 हजार असून जवळपास 6 हजार रुग्ण सध्या उपचार घेत असून मृत्यू संख्या 625 वर पोहचलीय.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.