Breaking News LIVE : परभणीत 15 मिनिटांपासून वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस
Breaking News LIVE Updates, 18 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
बुलढाणा जिल्ह्यात सातत्याने रोज 600 रुग्ण वाढत असताना दररोज कोविड सेंटर मधून रुग्ण पळून जाउन जवळच्या हॉटेलात किंवा ढाब्यावर जेवण व मध्यप्राशन करून परत रात्री कोविड सेंटरमध्ये दाखल होतात. खामगाव येथील घाटपुरी कोविड सेंटर मधून असेच काही कोरोना रुग्ण दाखल असताना रात्री पळून गेलेत व राष्ट्रीय महामार्गावारिल एका धाब्यावर मनसोक्त मध्यप्राशन करून परत कोविड सेन्टरच्या दिशेने जात असताना नांदुरा येथील एक 55 वर्षीय रुग्ण अति मध्यप्राशन केल्याने महामार्गावर मध्यभागी पडलेला असल्याने काही समाजसेवकानी त्याला उचलून सामान्य रुग्नलायात भरती केले. ह्या कोविड रुग्णाच्या हे समाजसेवक अतिसंपर्कात आलेत. भर्ती केल्यानंतर संबंधित रुग्णाच्या नातेवाइकांना फोन करून माहिती दिल्यावर कळले की हा रुग्ण कोरोना पोजिटिव्ह असून गेल्या तीन दिवसांपासून घाटपुरी कोविड सेंटर येथे भरती करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्नसंख्या वाढत असताना अशा प्रशासनाच्या अशा निष्काळजी पणामुळे जिल्ह्यातिल कोरोना नियंत्रणात येत नसल्याच बोलले जात आहे. सदर कोविड सेंटर हे महामार्गालगत असल्याने व रुग्णाना चांगलं जेवण मिळत नसल्याने असे प्रकार नित्याचेच असल्याचं जवळ असलेल्या हॉटेल मधील कर्मचारी सांगत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवसात 695 जण कोरोनामुक्त तर सात जणांचा मृत्यू. तर 325 नव्याने पॉझिटिव्ह.
मुंबई : एनआयएकडून आणखी एक मर्सिडीज गाडी जप्त करण्यात आली असून ही गाडीही सचिन वाझे वापरत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एनआयएकडून यासंदर्भात कसून चौकशी सुरु आहे.
कोल्हापूरचे श्री अंबाबाई मंदिर सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार, उद्यापासून दर्शन वेळेत होणार बदल, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा निर्णय
सचिन वाझे आणि परमबीर सिंग प्रकरणावरून भाजपचे आमदार नितेश राणे हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत तेच यांचे गॉडफादर असल्याचा आरोप करत त्यांच्या चौकशी सह राजीनाम्याची मागणी केली आहे. नितेश राणे यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर ही निशाणा साधत सचिन वाझेंची मर्सिडीज संजय राऊत यांच्या भावाच्या कार्यालया बाहेर काय करत होती? याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यावं अस सांगून त्यांचा हमाम वेगळा आहे आणि आमचा हमाम वेगळा आहे असं विधान केलं आहे.
लसीकरणानंतरही मागच्या आठ दिवसात जालना शहरातील 40 डॉक्टरांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणाच कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचं चित्र निर्माण झालं आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. अशात जालना शहरातला आकडा हा मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये डॉक्टरांचाही आकडा वाढत चालला आहे. शहरातील 40 डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात काहींनी लसीचा एक डोस घेतला आहे तर काहींचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. मात्र लसीकरणानंतर 40 दिवसांनंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे घाबरुन जायचं कारण नसल्याचं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं. मात्र या सगळ्यामुळे शहरतील आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे.
मनसुख हिरण प्रकरणाचा तपासही एनआयए करणार, कुठल्याही क्षणी दिल्लीतून आदेश येण्याची शक्यता : सूत्र
बुलढाणा तालुक्यातील हतेडी गावाजवळ विहिरित आई आणि मुलाचा मृतदेह आढळला. हतेडी गावातील रुपाली चव्हाण (25) व मुलगा समर्थ चव्हाण (6) अशी मृतांची नावे आहेत. बुलढाणा ग्रामीण पोलिस घटनास्थळी.
NIA, ATS दोषींना शोधून काढतील, तपासात सर्व गोष्टी समोर येतील; माझ्यावर कुठलाही दबाव नाही, गेल्या 30 वर्षात माझ्यावर कसलाही डाग नाही : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख लाईव्ह
अधिकाऱ्यांकडून काही चुका झाल्यामुळेच बदलीचा निर्णय; काही अधिकाऱ्यांच्या चुकांचे परिणाम आम्हाला भोगावे लागतात : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख
'त्या' चुका माफ करण्याजोग्या नव्हत्या : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख लाईव्ह
कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर जाऊन लाल पिवळा कन्नड ध्वज लावण्याचा कन्नड संघटनेची योजना पोलिसांनी उधळून लावली. कन्नड रक्षण वेदिकेचा म्होरक्या प्रवीण शेट्टी याच्या नेतृत्वाखाली शंभर हून अधिक कार्यकर्ते कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर जावून लाल पिवळा कन्नड ध्वज लावणार होते. कन्नड कार्यकर्त्यांनी राणी कित्तूर चन्नमा चौकात जमून जोरदार घोषणाबाजी केली. समितीच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या.हे कन्नड कार्यकर्ते सीमेवर जावून लाल पिवळा झेंडा लावण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे काही काळ रास्ता रोको केल्यावर पोलिसांनी अक्षरश: या कन्नड कार्यकर्त्यांना बळाचा वापर करुन उचलून पोलीस वाहनात घातले. बुधवारपासून कर्नाटक महाराष्ट्र बस सेवा सुरु झाली असून वातावरण पूर्वपदावर येत आहे. असे असताना बंगलोर येथून आलेल्या प्रवीण शेट्टी आणि शंभर कार्यकर्त्यांनी सीमाभागातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला आहे.
कन्नड रक्षण वेदिकेच्या बेळगावात थयथयाट, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर लाल-पिवळा ध्वज लावण्याचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न, कन्नड रक्षण वेदिकेचा प्रयत्न कर्नाटक पोलिसांनी हाणून पाडला, बेळगावातील चन्नम्मा चौकात एकत्र जमून झेंडा लावण्यासाठी चालले होते कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते, माहिती मिळताच कर्नाटक पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना घेतलं ताब्यात, कन्नड रक्षण वेदिकेच्या रास्ता रोको आंदोलनाचाही प्रयत्न, आठवडाभरा पासूनचा तणाव निवळत असतानाच कन्नड रक्षण वेदिकेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न
कर्नाटकातील बससेवा महाराष्ट्रात सुरू, मात्र महाराष्ट्रातील बस अजूनही कर्नाटकात जात नाहीत.बेळगावमध्ये केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही बाजूला झाली मोठी आंदोलनं.शिवसेनेनं कर्नाटकच्या बस महाराष्ट्रात येऊ देणार नाही अशी घेतली होती भूमिका. वातावरण शांत झाल्यानंतर कर्नाटकने बस सेवा सुरू ठेवली
पालघर : नंडोरे आश्रम शाळेतील 30 विद्यार्थ्यांपैकी दहावीच्या 6 आणि बारावीच्या 7 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, शिक्षकाला कोरोनाची लागण झाली होती, 10 वी, 12वीच्या परीक्षा जवळ आल्याने ह्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येतेयय
मुंबई - पुणे एक्सप्रेस वे संदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारनं मागितली मुदतवाढ, कॅगला यांसदर्भात सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश,तीन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचं कॅगकडनं आश्वासन, राज्य सरकारलाही तीन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
कोरोनाचा वाढता संसर्ग बघता पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बोलावली तातडीची बैठक, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू, कृषीमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यासह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित, या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता
ज्येष्ठ पत्रकार समीक्षक अशोक शेवडे यांचे डोंबिवली इथे निधन ते 77 वर्षांचे होते. चित्रानंदसाठी ते लिहीत. शिवाय चांदेरी सोनेरी हा कार्यक्रम त्यांनी अनेक वर्षे केला. डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून ऍडमिट होते. कोरोनाची लागण झाली होती. अनेक दिवस आयसीयूमध्ये होते. अशोक शेवडे यांनी आजवर हजारो मुलाखती घेतल्या आहेत.
नांदेडमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 31 मार्च 2021 पर्यंत,नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रकारचे हॉटेल्स, रेस्टारंट, खाद्यगृह, परमिटरूम, बेकरी, स्वीटमार्ट, चाटभांडार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलाय.माञ या निर्णयामुळे वरील आस्थापनांवर उपजिवीका अवलंबून असलेल्यांना अर्थिक अडचण येऊ शकते हे लक्षात घेऊन तसेच नागरीकांच्या सोयीसाठी वरील आस्थापनांना पार्सल सेवा राञी 10.00 वाजेपर्यंत ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व जीम, व्यायामशाळा, सार्वजनिक उद्याने दि. 31 मार्च 2021 पर्यंत बंद राहतील.
नागपूरच्या वाडी, दत्तवाडी, हिंगणा, गोंडखैरी परिसरात सकाळपासून पाऊस, सकाळी जोरदार वारा आणि ढगांच्या गडगडाटासह सुरू झालेला पाऊस हलक्या स्वरूपात पडतोय.. मात्र ढगांमुळे काळोख पसरला आहे..,हवामान विभागाने आधीच नागपूर सह पूर्व विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे..
वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कारखेडा शेत शिवारात असलेल्या शेतकरी अनिल काजळे यांच्या शेतातील गंजी घातलेल्या गव्हाच्या गंजीला आग लावली. त्यामध्ये दोन एकरातला गहू , पाईप, ताडप, संञाची झाडे असे लाखो रूपयाचे नुकसान झाले. आग सुडाच्या भावनेतून अज्ञात व्यक्तीने लावली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पार्श्वभूमी
चिंताजनक! नाशिक, नागपूरमध्ये आजवरची सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद, तर पुण्यात सर्वात जास्त अॅक्टिव रुग्ण
राज्यात आज तब्बल 23 हजार 179 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातही चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नांदेड, ठाणे, अमरावती, अकोला जिल्ह्याचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अंशतः लॉकडाऊन लावूनही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळा प्रशासन आणि नागरिकांसाठी आव्हान ठरणार आहे.
आतापर्यंत 3.64 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण, गेल्या 24 तासात 14 लाख लोकांना मिळाली लस
राष्ट्रव्यापी लसीकरणाच्या 61 व्या दिवशी, बुधवारपर्यंत देशात एकूण 3.64 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यामध्ये 12,10,498 लोकांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर 1,92,710 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. बुधवारी 41,803 आरोग्य कर्मचारी आणि 63,617 फ्रन्टलाईन वर्कर्सना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्याचवेळी 53,542 आरोग्य कर्मचारी आणि 1,39,168 फ्रन्टलाईन वर्कर्सना कोरोनाच्या दुसऱ्या लसीचा डोस देण्यात आला आहे. त्याचवेळी 60 वर्षावरील 84,918 लाभार्थ्यांना आणि 45 वर्षावरील गंभीर आजार असणाऱ्या 2,20,160 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
Hemant Nagrale on Sachin Vaze Case | दोषींवर कारवाई होणारच- हेमंत नगराळे
सचिन वाझे प्रकरणाला गंभीर वळण मिळत असतानाच ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली. ज्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यभार पाहणारे हेमंत नगराळे मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्त झाले. आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एक परिषद घेतली. सध्याच्या घडीला मुंबई पोलीस ज्या परिस्थितीतून जात आहे, त्यावर प्रतिक्रिया देत राज्य शासनानं आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल नगराळे यांनी आभार व्यक्त केले. यानंतर त्यांनी थेट सचिन वाझे प्रकरणाला हात घालत दोषींवर कारवाई होणारच ही बाब स्पष्ट करत आपल्या कामाला खऱ्या अर्थानं सुरुवात केली. सध्याच्या घडीला पोलिसांवरील विश्वास कमी होत असल्याचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित करत सर्वांकडून सहकार्य मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -