Breaking News LIVE : नाशिकमध्ये आज कोरोना रुग्णसंख्येत रेकॉर्डब्रेक वाढ
Breaking News LIVE Updates, 14 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
विनाअनुदानीत शाळा,तुकड्या व अतिरिक्त शाखांमधील प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा २०% व वाढीव २०% निधी वितरणाचा आदेश आज निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयाचा लाभ ३३ हजार १५४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. सन २०२०-२१ करिता यासाठी १४०.३७ कोटी रु. एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच सदर पदांवर वार्षिक आवर्ती खर्च ४२१.११ कोटी रु. इतका होणार आहे.
वाझे प्रकरणात योग्य तपास होईल; दोषींवर कारवाई होणार : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची पत्रकार परिषद
मुंबई पोलीस कठीण समस्येतून जात आहे, तुम्हा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची पत्रकार परिषद
सोलापुरातील हगलूर गावाजवळ विष पिऊन आत्महत्या, उपचारापूर्वीच मृत्यू. पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने वॉट्सॲपवर मॅसेज करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करत मानसिक त्रास दिल्याने महिलेने आत्महत्या केल्याची कुटुंबीयांचा आरोप. पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे यांनी मानसिक त्रास दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप. या घटनेबाबत पोलीसात अद्याप कोणतीही तक्रार नोंद नाही. पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे यांच्यावर गुन्हा नोंद होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास कुरुंबियांचा नकार. तर मृत महिलेचे आणि पोलीस उपनिरीक्षकाचे चॅटिंग नवऱ्याने पाहिले होते, त्यात त्यांचे रात्री वाद झाले होते. आत्महत्या नेमकी कशामुळे घडली याची चौकशी करूनच गुन्हा नोंद करणार. पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांची फोनवरून माहिती.
सोलापुरात महिला पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केली आहे. सोलापुरातील हगलूर गावाजवळ विष प्राशन करुन त्यांनी आयुष्य संपवलं. पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्हॉट्सॲपवर मेसेज करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करत मानसिक त्रास दिल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे यांनी मानसिक त्रास दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. या घटनेबाबत अद्याप पोलिसात कोणतीही तक्रार नोंद झालेली नाही. पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे. तर मृत महिलेचे आणि पोलीस उपनिरीक्षकाचे चॅटिंग नवऱ्याने पाहिले होते, त्यात त्यांचे रात्री वाद झाले होते. आत्महत्या नेमकी कशामुळे घडली याची चौकशी करुनच गुन्हा नोंद करणार, अशी माहिती पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांनी फोनवरुन दिली.
महाराष्ट्रात ज्या आरोग्य विभागाच्या परीक्षा झाल्या आहेत, त्यातील 54 पदांसाठी परीक्षा झाल्या, त्यातील 3 पदांच्या परीक्षांचे निकाल थांबवले आहेत. नर्स, आरोग्य सेवक आणि ड्रायव्हर या पदाचे निकाल थांबवले आहेत. कारपेंटर पदासाठी पुन्हा परीक्षा घेतली जाईल, याबाबतचा अहवाल आम्ही मागवला आहे. उर्वरित पदांचा निकाल काढला जाईल.
राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे गेल्या तीन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथे मुक्कामाला होते. प्रशासनाकडून हा त्यांचा खाजगी दौरा असल्याचे सांगण्यात आले. ते घोसरी येथील एका खाजगी मालकीच्या रिसॉर्टवर थांबले होते. मात्र त्यांचा सोबत वनविभागाने सचिव मिलिंद म्हैसेकर आणि MTDC चे MD आशुतोष सलील देखील होते. परवा दुपारी आल्यावर त्यांनी खुटवंडा गेट वरून ताडोबाची सफारी केली. काल देखील ते या दोन अधिकाऱ्यांसोबत ताडोबाच्या आत गेले होते, पण ती सफारी नव्हती. आज सकाळी पण त्यांनी ताडोबाची सफारी केली आणि दुपारी 1.50 ला मुंबईकडे रवाना झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह
- छोट्या शहरांमध्ये कोरोना चाचण्या वाढवाव्या लागतील
- महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ या राज्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचं
- अनेक राज्यांमध्ये लसी वापराविना पडून
मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयए एटीएसकडून टेकओव्हर करण्याची शक्यता, एटीएसकडून तपास घेण्याची प्रक्रिया सुरु, सूत्रांची माहिती, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून परवानगी घेण्याच्या हालचालींना वेग
जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी ऑनलाईन ऐवजी सभागृहात प्रत्यक्ष मतदान घ्यावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली, जळगाव महापौर-उपमहापौर निवडणूक ऑनलाईन पद्धतीने होण्यावर औरंगाबाद खंडपीठाचा शिक्कामोर्तब .भाजप नगरसेकांची याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली, कोरोना परिस्थितीमुळे निवडणूक प्रकियेत हस्तक्षेप करण्यास औरंगाबाद खंडपीठाचा नकार
कोल्हापूर : कापशी वडगाव येथे ऊसतोडणी टोळीच्या ट्रॅक्टरला अपघात, हंगाम संपवून गावी परतत असताना अपघात, एक महिला ठार, 8 ते 9 जण जखमी, जखमींवर कापशी आणि गडहिंग्लज रुग्णालयात उपचार सुरू, एक गंभीर, स्थानिक नागरिकांकडून पलटी झालेला ट्रॅक्टर काढण्याचं काम सुरू
वाळूच्या ठेक्यावरून दोन गटात तलवारीने मारामारी, दोघांचा जागीच मृत्यू तर पाच जण जखमी, साताऱ्यातील नरवणे येथील घटना , नरवणे गावातील वाळूचा लिलाव घेतल्याचा कारणातून तलवारीने हल्ला , चंद्रकांत जाधव आणि विलास जाधव या दोन सख्ख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू, दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, दोन आरोपींना दहिवडी पोलिसांनी घेतले ताब्यात घटनेमुळे नरवणे परिसरात तनाव
महेश मोतेवार याने दगडूशेठ’ हलवाई गणपतीला दान केलेले सोन्याचे दीड किलोचे दागिने राज्य गुन्हे अन्वेषन विभागाने (सीआयडी) ताब्यात घेतले आहेत.
'सह्याद्री'वर महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक,बैठकीसाठी बाळासाहेब थोरात, अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे पोहोचले, मंत्र्यांच्या खात्यातील विषयांवर चर्चा होणार
एका एपीआयमुळे सरकार पडणार नाही, सचिन वाझे प्रकरणावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया, सचिन वाझे प्रकरणामुळे सरकार अस्थिर झालं यात तथ्य नाही, पुढील साडेतीन वर्ष सरकार पडणे शक्य नाही.
बुलडाणा: सातपुडा पर्वतातील ऋषी महाराज संस्थानचे महंत श्रावण भारती महाराजांचं 109 व्या वर्षी निधन, विदर्भ , मराठवाडा, खान्देश,मध्यप्रदेशमध्ये महाराजांचे लाखो अनुयायी
दिल्लीतल्या खासदार निवासस्थानात धक्कादायक घटना,
भाजपचे खासदार रामस्वरूप शर्मा यांची आत्महत्या,
हिमाचल प्रदेशातले खासदार होते शर्मा,
गोमती या खासदार निवासस्थानी पहाटे आत्महत्या,
रायगड- रोह्यातील कपड्याच्या दुकानाला आग, आगीत दुकान पुर्णपणे जळून खाक, रोहा शहरातील भूमिका कलेक्शनच्या कपड्याच्या दुकानाला पहाटेच्या दरम्यान आग, दुकानाला लागलेल्या आगीमुळे सुमारे 10 ते 12 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज, अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण
जालना जिल्ह्यातील मंठा इथल्या पोलीस ठाण्याततील पोलीस निरीक्षक विलास निकम यांना 40 हजाराची लाच घेताना अटक करण्यात आलंय. औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केलीय. रात्री तक्रारदार व्यक्तीकडून दीड लाखांची मागणी करून त्याचा पहिला हप्ता घेताना एसीबीने बसस्थानक परिसरात सापळा लावला. यात तक्रारदारकडून लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं. दरम्यान ही लाच कुठल्या कारणाने मागितली होती हे अद्याप कळलेले नाही
अहमदनगर : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन, आज पहाटे झाले निधन, काल दिलीप गांधी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर दिल्ली येथील खाजगी रुग्णालयात सुरू उपचार होते
पार्श्वभूमी
इंग्लंडचा दणदणीत विजय, बटलरची शानदार खेळी, मॉर्गनंचा अनोखा विक्रम!
INDvsENG : भारत विरुद्ध इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या टी 20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडनं टीम इंडियाला सहज नमवत पुन्हा मालिकेत आघाडी घेतली आहे. भारतावर 8 विकेट्सने मात करत इंग्लंडने हा विजय साजरा केला. कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडला 157 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जोस बटलरने नाबाद 83 धावांची खेळी करत भारतीय गोलंदाजाची धुलाई केली. त्याला बेअरस्टोने नाबाद 40 धावा करत चांगली साथ दिली. या विजयामुळे इंग्लंडने टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
वाढत्या कोरोना संकटामुळे सध्या प्रत्यक्ष महासभा आणि आमसभा नकोच - राज्य सरकार
मुंबई : कोरोनाच्या पुन्हा वाढत्या संसर्गामुळे राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्या महासभा तसेच आमसभा प्रत्यक्ष घेणे सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे या महासभा आणि आमसभा ऑनलाईनच घेतल्या जातील अशी माहिती राज्य सरकारच्यावतीनं मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. तसं प्रतिज्ञापत्रच राज्य सरकारच्या नगरविकास विभागामार्फत हायकोर्टात सादर करण्यात आलं. याची दखल घेत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारच्या निर्णयात आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही. परिस्थिती सुधारल्यानंतर योग्यवेळी प्रत्यक्ष आमसभेला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल असं मत व्यक्त करत यासंदर्भातील याचिका हायकोर्टानं निकाली काढली.
सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएच्या ताब्यात; कारमधून बॅग, डायरी, शर्ट आणि काही रक्कम जप्त
मुंबई : सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे. या मर्सिडीज कारमधून बॅग, डायरी, शर्ट आणि काही रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच एनआयए अधिकाऱ्यांकडून या मर्सिडीज कारची कसून चौकशी सुरु आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी या कारची कसून चौकशी केली असून या चौकशीत एनआयए अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळून आली आहे. एक भली मोठी वायर असून एक ड्रेसही आहे. यामध्ये चेक्सचा शर्ट आणि ब्राउन कलरची पँट आहे. त्याचसोबत अनेक डायऱ्याही या कारमध्ये सापडल्या आहेत. एवढंच नाहीतर या कारमध्ये अनेक नंबर प्लेट्सही आढळून आल्या आहेत. संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास ही मर्सिडीज कार याठिकाणी आणण्यात आली आणि एनआयए अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -