Breaking News LIVE : मुंबई पोलीस आयुक्तांची बदली? रात्री उशीरापर्यंत वर्षा बंगल्यावर बैठक
Breaking News LIVE Updates, 14 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर, बैठकीला पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अनिल परबही उपस्थित
सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएच्या ताब्यात, कारमधून बॅग, डायरी, शर्ट आणि काही रक्कम जप्त
बुलढाणा शहराला जंगलाचा वेढा आहे, या जंगलातील असंख्य हिंसक प्राणी उन्हाळ्यात जंगलाच्या आजुबाजुच्या गावाकडे कूच करीत असतात, जंगलातील पानवठे आटले की , अस्वल, राणडुक्कर, बिबट गावाकडे कूच करतात त्यांमुळे मानवी जिवाला धोका निर्माण होत आहे
सचिन वाझे यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका दिला आहे. वाझे यांचे तीन अर्ज एनआयए कोर्टाने फेटाळले. एनआयए कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत आणि अटक बेकायदेशीर असल्याचा दावा अमान्य केले आहेत. केवळ वकिलांना भेटू देण्याची मागणी कोर्टाने अंशत: मान्य केली. चौकशीच्यावेळी वकिलांना सोबत राहण्याची मुभा देण्यात आली.
संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट संपली आहे. या भेटीबाबत ते म्हणाले की, "सगळं आलबेल आहे. शरद पवार यांना मी नेहमी भेटत असतो. ही भेट सचिन वाझे प्रकरणावर नव्हती. नाराजीचा कुठलाही प्रश्न नाही. शरद पवार यांची नाराजी कधी दिसत नसते ते चिंतन करत असतात."
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे यांच्या कार्यालयाची एनआयएने झाडाझडती घेतली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती. यावेळी मुंबई पोलीस दलातील अधिकारीही उपस्थित होते. पुराव्यांच्या अनुषंगाने ही झाडाझडती करण्यात आली. एनआयएने रात्री 8 ते पहाटे 4 पर्यंत CIU ची पाहणी केली. यावेळी एनआयएने सचिन वाझे यांचा मोबाईल फोन, तसंच आयपॅडही जप्त केलं. दरम्यान या प्रकरणात एनआयएने आतापर्यंत CIU च्या दहा अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे.
निवडणूक आयोगाने पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. दरम्यान आचारसंहिता लागू झाली आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहे. महाराष्ट्रातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची समजली जात आहे.
सचिन वाझे प्रकरणावर काल राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक झाल्यानंतर आज ही बैठक होत आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दोन दिवसांपासून सौरभ राव यांना ताप असल्याने काल त्यांच्या कार्यालयामध्येच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या चाचणीचा रिपोर्ट आज दुपारी आला, ज्यामध्ये सौरभ राव पॉझिटीव्ह आढळून आले. त्यानंतर सौरभ राव त्यांच्या कार्यालयातून घरी गेले. कोरोनाची तीव्र लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घरीच क्वॉरन्टीन होणार आहेत.
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदलीवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सचिन वाझे प्रकरणात महाविकास आघाडीची विनाकारण बदनामी होत आहे. पुरावे असतील तर विनाकरण सरकारची बदनामी टाळण्याबाबत मुख्यमंत्र्यांनीच निर्णय घ्यावा, अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांसोबत सकाळी झालेल्या बैठकीत ही चर्चा झाली.
सचिन वाझे प्रकरण, जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल, कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, चौकशी होण्याआधीच कुणाला दोषी ठरवणे चुकीचं आहे- अजित पवार
आरोग्यमंत्री राजेश टोपे आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांची भेट घेणार आहेत. राज्यात अधिक कोरोना लस पुरवण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याची राजेश टोपे यांनी माहिती दिली.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात भाजपच्या वतीने वांद्रेतील बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वीज कंपन्यांकडे पैसे नाहीत म्हणून गरीब शेतकऱ्यांची वीज कापली जाते आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत बेकायदेशीरपणे चार्टर्ड विमानाने वीज कंपनीच्या पैशांवर मजा करतात असा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. भाजपचे माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांनी आज या संदर्भात बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे आज राजीनामा देणार आहेत. पुणे महानगरपालिकेत आज सर्वसाधारण सभा पार पडल्यानंतर त्या आपला राजीनामा सोपवणार आहे. महानगरपालिकेत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आरपीआयला उपमहापौरपद देण्यात येणार आहे. त्यासाठीच सरस्वती शेंडगे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. मात्र महापौर पदाचे काय होणार याबाबत स्पष्टता नाही.
महाराष्ट्र बॉर्डरवर असलेल्या दमण केंद्रशासित प्रदेशातील दाभेल औद्योगिक कार्यक्षेत्रातील सुपर टेक्स्ट वूवेन इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
केमिकल असल्या कारणाने आग आटोक्यात आणण्यात मोठ्या अडचणी येत आहे. तीन तास उलटूनही आग आटोक्यात आलेली नाही. कंपनीतील सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढले असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही.
भटक्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या मढी येथील कानिफनाथाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. होळी ते पौर्णिमेपर्यंत चालणार्या या यात्रेला राज्यातील आणि शेजारच्या राज्यातून लाखो भाविकांनी हजेरी लावतात. गाढवांचा बाजार हे या यात्रेत वैशिष्ट्य आहे. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ही यात्रा रद्द करण्यात आलीये.
वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक सुरू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अनिल परब, अजित पवार, जयंत पाटील, बाळसाहेब थोरात उपस्थित, सचिन वझे प्रकरणी चर्चा, मुंबई पोलीस आयुक्त बदलण्याची शक्यता, त्यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता
बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांने हॉस्पिटल च्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . मध्यरात्री बाराच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारल्यानंतर जखमी झालेल्या तरुणावर सकाळी 8 वाजेपर्यंत योग्य उपचार न झाल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या लेखी परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर झालं आहे. 19 एप्रिलपासून सर्व विद्याशाखांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. याआधी 23 मार्चपासून ऑफलाईन पद्धतीनं या परीक्षा घेण्याचं विद्यापीठाचं नियोजन होतं मात्र कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव आणि अनेक ठिकाणी लागू असलेले निर्बंध लक्षात घेता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
केरळ ते मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा होता. तो सध्या विरुन गेलाय. पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांत पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातही 18 ते 20 मार्च या काळात हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय, एक-दोन दिवसांत कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.
येत्या गुरुवारपासून म्हणजेच 18 मार्चपासून राज्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. गुरुवारपासून ३ दिवस राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी इंधन जीएसटीच्या कक्षेत आणलं जाणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. मात्र, असा कोणताही प्रस्ताव नसल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी दिली आहे. त्यामुळे सध्यातरी इंधनाचे दर कमी होण्य़ाची मावळली आहे. लोकसभेत अर्थमंत्र्यानी ही माहिती दिली आहे. त्यामुळे इंधनाचे दर कमी होण्यासाठी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.
पार्श्वभूमी
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्यात नव्या गाईडलाईन्स, लग्नकार्यांसाठी 50 तर अंत्यसंस्कारांसाठी 20 जणांनाच परवानगी
नियम पाळले नाहीत तर मुंबईत अंशत: लॉकडाऊन, महापौरांचा इशारा तर नागपूरमध्ये कडक लॉकडाऊन, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांवर निर्बंध तर खान्देशात अलर्ट
राज्यात काल नव्या 15,051 कोरोना रुग्णांची नोंद, तर 48 रुग्णांचा मृत्यू; कोरोनाचा रिकव्हरी रेट 92.07 टक्क्यांवर
नाशिकमध्ये पुढील आदेशापर्यंत मंगल कार्यालयं आणि लॉन्समध्ये लग्न सोहळ्यावर बंदी, आर्थिक नुकसानामुळे मंगल कार्यालय चालक-मालकांचा विरोध
मनसुख प्रकरणात अधिकाऱ्याचा सहभाग असल्यास बदली करावी, राष्ट्रवादीच्या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुखांच्या सूचना,वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेंचं अखेर निलंबन
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रश्नपेढी उपलब्ध,एससीईआरटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध प्रश्नपेढीचा परीक्षेच्या तयारीसाठी फायदा
सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रीति राज श्रॉफ आणि जावयाची मालमत्ता ईडीकडून जप्त, मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात कारवाई
गुरुवारपासून तीन दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणात पावसाची शक्यता
नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये दररोज 16,000 हापूस आंब्यांची आवक, पेटीला 1500 ते सहा हजार रुपयांचा दर
मोदी स्टेडियमवर होणारे भारत-इंग्लंड उर्वरीत टी-२० सामने प्रेक्षकांविनाच, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं गुजरात क्रिकेट असोशिएशनचा निर्णय
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -