Breaking News LIVE : नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 26 हजार रुग्णांची नोंद तर 610 जणांचा मृत्यू
Breaking News LIVE Updates, 15 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. दोन दिवसांपासून सौरभ राव यांना ताप असल्याने काल त्यांच्या कार्यालयातमधेच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या चाचणीचा रिपोर्ट आज दुपारी आला ज्यामध्ये सौरभ राव पॉझिटीव्ह आढळून आले. त्यानंतर सौरभ राव त्यांच्या कार्यालयातुन घरी गेले. कोरोनाची तीव्र लक्षणं नसल्यानं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घरीच क्वारंटाईन होणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाची सुनावणी होत आहे. मात्र, राज्य सरकारची रणनीति बोगस व अत्यंत अव्यवहारी असल्याचा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला, ते पुणे जिल्ह्यातील दौंड येथे पत्रकारांशी बोलत होते. मेटे पुढे म्हणाले, "खरं तर आतापर्यंत जी वाताहत झालेले आहे आणि अंतिरिम स्थगिती आलेली आहे, ती फक्त आघाडी सरकारच्या आणि अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणाचे फळ म्हणजे ही अंतिरम स्थगिती आणि ही वेळ आलेली आहे. असा आरोप त्यानी महाविकास आघाडी सरकारवर केला. या सरकारने याचिकेकर्ते आहेत त्यांची एकत्रित बैठकसुद्धा घेतली नाही, जी बैठक झाली त्या बैठकीला अशोक चव्हाण उपस्थित नव्हते. त्यांनी सगळं प्रकरण वाऱ्यावर सोडून दिले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं आहे. कारण चांगलं बोलणं त्यांच्या बाबतीत काही शब्द नाहीयेत, अशी टीका मराठा आरक्षणावरून विनायक मेटे यांनी अशोक चव्हाण व महाविकास आघाडीवर केली.
एकीकडे कल्यान डोंबिवलीमध्ये दररोज कोरोनोचा उच्चांक गाठला जात असताना नागरिकांना मात्र कोरोनाच गांभीर्य उरलेले दिसून येत नाही. नागरिकच नव्हे तर कल्याण डोंबिवली स्टेशन बाहेर कारवाईचा फार्स निर्माण करणारे महापालिकेच पथक कल्याण नजीकच्या मोहने बल्यानी परिसरात फिरकत नसल्याने या ठिकाणी मात्र कोरोना काळात देखील बाजाराच्या नावाखाली जत्राच भरत असल्याचं दिसून येत आहे. या ठिकाणी नागरिक देखील निष्काळजीपणे वावरत असून पालिकेकडून कोणत्याही प्रकारची जनजागृती करण्याची तसदी आजमितीला घेण्यात आलेली नाही. अशीच परिस्थिती राहिली तर पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली हॉटस्पॉट होण्या वाचून कुणीही रोखू शकणार नाही.
कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच केडीएमसीने कठोर पाऊल उचलत शहरात काही निर्बंध लादले होते. यामध्ये अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकानांना सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत बंधन घालून देण्यात आले होते. त्या पाठोपाठ शहरातील रेस्टॉरंट बार आइस्क्रीम पार्लर यांना देखील सकाळी दहा ते सायंकाळी अकरा वाजेपर्यंत मर्यादा घालून देण्यात आली होती. दुकानदारांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत वेळ वाढवून देण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर महापालिकेने उद्यापासून दुकानांना सकाळी दहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंतची मर्यादा वाढवून दिली आहे. दरम्यान हे बंधन अत्यावश्यक सेवा, मनुष्य व प्राणी मित्रांसाठी जीवनावश्यक वस्तू, किराणा, दूध, वृत्तपत्र वितरण यांच्यासाठी राहणार नाही.
उरण येथून अपहरण केलेली चिमुरडी सापडली, अवघ्या सहा तासात आरोपी महिलेला अटक. आज सकाळी उरण येथून अडीच महिन्याच्या चिमुरडीचे अपहरण करण्यात आले. पोलिओ डोस देण्याच्या बहाण्याने केले होते अपहरण. उरण, पनवेल आणि तळोजा पोलिसांना यश.
महाराष्ट्रामध्ये फक्त मुकेश अंबानीच राहतात का? दुसरे कुणी राहत नाही का? 14 कोटी जनता आहे का नाही? अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि गृहमंत्री बदलाच्या चर्चेवरुन स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचा सर्वच पक्षांना परखड सवाल. अंबानींच्या प्रसिद्धीसाठी स्फोटके ठेवली होती का ही वेगळीच भानगड, या विषयावरून अधिवेशन वाया घालवले आणि एका पोलिसासाठी विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री आकांडतांडव करतातयत.
अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात 379 कोरोना रुग्ण आढळले. आज 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या पोहचली 42 हजार 876 वर.
पन्नास टक्के क्षमतेनुसार सुरु असलेली हाॅटेल,रेस्टॉरंट्स,बार यांची सवलत रद्द करण्यात आली असून कोरोनाच्या संभाव्य वाढत्या संसर्गामुळे आता या ठिकाणाहून फक्त पार्सल सेवा देण्यात यावी असा सुधारित आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी आज दिला आहे. याची अंमलबजावणी 17 मार्चपासून करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे.
बीड मधील धक्कादायक घटना. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या शेतकऱ्यांना केली आत्महत्या. तरुणाने नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय. काही दिवसांपूर्वी याच शेतकऱ्यानं पुण्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्येचा केला होता प्रयत्न. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी असल्याची माहिती
औरंगाबाद जिल्ह्यात 17 मार्चपासून हॉटेल केवळ पार्सल देतील. डायनींग, परमिट रूम, नाष्टा सेंटर, ढाबे, फूड पार्क, रिसोर्टमध्ये बसून जेवण देता येणार नाही. 4 एप्रिलपर्यंत निर्बंध लागू. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती. हा निर्णय संपुर्ण जिल्ह्यात लागू असेल.
'मंत्री मंडळ फेररचना संदर्भात सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. लवकरच तुम्हाला कळेल, नाना पटोले यांची माहिती
उरण येथून दोन महिन्याच्या चिमुरडीला पळविले, आज सकाळची घटना. पोलिओ डोस देण्याच्या बहाण्याने आलेल्या महिलेचे पलायन. नवघर येथे रिक्षातून आलेल्या महिला चिमुरडीला घेऊन पळाली. उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, शोधकार्य सुरू.
पोलीस हे सरकारचे कुत्रे आहेत, यावर डॉ अनिल बोंडे यांचा यूटर्न. पोलिसांबद्दल मला खूप आदर आहे. पोलिसांनी कोरोनाच्या काळात खूप प्रामाणिक काम केलं आहे. मी त्या अधिकाऱ्याला बोललो संपूर्ण पोलीस विभागाला नाही. अनेक प्रामाणिक अधिकारी आहेत. परंतु, ते आज हतबल आहेत.
भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांच्यासह पाच जणांवर केलेले गुन्हे मागे घ्या. चार दिवसांपूर्वी MPSC च्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीहल्ल्याची चौकशी करावी. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना लाठ्या मारून वाहनात कोंडून घेऊन जाणारे गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार चोरमले यांना निलंबित करण्याची मागणी.
मुंबई पोलीस सहआयुक्त मिलिंद भारांबे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत.
शिवसेना नेते सचिन वाझेंची वकिली करत आहेत. मुख्यमंत्र्यांना वाझेंची वकिली का करावी लागते? आमदार नितेश राणेंचा आरोप, वरुण सरदेसाईंवर केले गंभीर आरोप, वाझे आणि सरदेसाई यांच्यातील संभाषणाची माहिती द्यावी, कुणाच्या आशिर्वादाने वरुण सरदेसाईंनी फोन केले, याची चौकशी व्हावी, राणेंची मागणी
एंटिलियाजवळ आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचं प्रकरण, स्कॉर्पियो कार आणि इनोव्हा कार ड्रायव्हरची ओळख पटली, पोलीस मुख्यालयाशी संबंध असल्याचा संशय, लवकरच मोठा खुलासा होण्याची शक्यता, मोठे अधिकारी NIA च्या रडारवर
- वरुण सरदेसाई आणि सचिन वाझेंमध्ये वादग्रस्त संभाषण, वरुण सरदेसाईंवर नितेश राणेंचा सनसनाटी आरोप
- वरुण सरदेसाईंसोबतच्या संबंधांमुळे तर मुख्यमंत्री वाझेंना वाचवत नाहीत ना? नितेश राणेंचा सवाल
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झाली बैठक ,
सचिन वाझे आणि राज्यातल्या विविध प्रश्नांवर झाली चर्चा ,
मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल १ तास झाली चर्चा ,
वाझे प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ ,
सुशांतसिंग प्रकरणानंतर पुनेहा महाराष्ट्र पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं केलंय ,
महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतीवर झाली चर्चा,
सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी आणि परिवहन समितीच्या सभापतीची निवड प्रक्रिया पुन्हा थांबली,
एमआयएम गटनेते पदाच्या वादातून स्थायी आणि परिवहन समिती निलंबित करण्याचे शासनाचे आदेश,
20 फेब्रुवारी रोजी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती आणि परिवहन समिती सदस्यांची केली होती निवड,
मात्र हा ठराव महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 च्या कलम 31-अ मधील तरतुदीनुसार नसल्याचे शासनाचे मत,
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं निलंबन, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणी कारवाई
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणपासून जवळच असलेल्या लोटे एमआयडीसीतील सुप्रिया केमिकल कंपनीत स्फोट झाला आहे. झालेला स्फोट हा रिअॅक्टरचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी काही कामगार जखमी झाले असून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, काही कामगार आतमध्ये अडकले असल्याची माहिती देखील समोर येत आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
कोल्हापूर : वीजबिल न भरण्याच्या मुद्द्यावरून आज कोल्हापुरात महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नागरी कृती समिती यांच्यावतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. शेकडो कार्यकर्ते महावितरणच्या कार्यालयासमोर उपस्थित राहिल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला..
निवडणुका आहेत म्हणून आम्ही सुनावणी स्थगित करू शकत नाही असं खंडपीठ म्हणत आहे. हरियाणाच्या वकिलांना पण खंडपीठ तेच समजावून सांगत आहे. खंडपीठाने सर्व राज्यांना एक आठवड्यांचा वेळ दिलेला आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात दाखल याचिकांच्या बाजूने अरविंद दातार युक्तिवाद करत आहेत. सुनावणी स्थगित न करता कोर्टाने सर्व राज्यांना एक आठवड्याचा वेळ वाढवून दिला आहे
मराठा आरक्षण सुनावणी : तामिळनाडू वकील वेळ वाढवून मागत आहेत, कोर्टाने सांगितलं की राज्यांचा नंबर 8 दिवसांनी येईल, तुमच्याकडे एक आठवड्याचा वेळ आहे. अजून तेव्हा काही प्रॉब्लेम आले तर बघू असं खंडपीठ म्हणत आहे. सुनावणीला आधीच खूप विलंब झाला आहे असं म्हणत कोर्ट सुनावणी चालू ठेवण्याच्या बाजूने. तामिळनाडूच्या निवडणुका सुरू आहेत. 50 टक्के आरक्षणासाठी खूप मोठी कागदपत्र सादर करावी लागतील असं म्हणत तामिळनाडू वकील पुन्हा आपली बाजू मांडत आहेत.
सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या सुनावणीला सुरुवात
पालघर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, मनोर पोलीस ठाणे हद्दीतील हालोली पाडोस पाडा येथे अपघात, दोन कारची एकमेकांना जोरदार धडक, अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर 2 जण जखमी, जखमींवर मनोर येथील रुग्णालयात उपचार सुरू
नाशिक - नाशिक शहरात मास्क कारवाईच्या दंडाची रक्कम एक हजारांवरुन पुन्हा दोनशे रुपयांवर , महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचे आदेश,पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनूसार दंडाची रक्कम एक हजार रुपये करण्यात आली होती , एक हजार रुपये नागरिकांना त्रासदायक होत असल्याने आयुक्तांनी घेतला निर्णय , काही नगरसेवकांनी देखील हजार रूपयाला केला होता विरोध, शहरात मास्क कारवाई कमी पण दंडाच्या रक्कमेची चर्चाच जास्त
आगामी पालिका निवडणूक पहाता मुंबई काँग्रेसची नवीन कार्यकारणी जाहीर. सहा ज्येष्ठ उपाध्यक्ष, 15 उपाध्यक्ष, 42 महासचिव, 76 सचिव आणि 30 कार्यकारी सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील सर्वच गटांना काही ना काही मिळेल, याची दक्षता यानिमित्ताने घेतली गेलीय. डिसेंबरमध्ये आमदार भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यासोबत चरणसिंग सप्रा यांना कार्यकारी अध्यक्षपद बहाल केले गेले. आता नव्या अध्यक्षांच्या कार्यकारिणीची दिल्लीतून घोषणा झालीय.
बीड जिल्ह्यातल्या आष्टी पोलिसांची बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. लग्नाचं वय झालेल्या तरुणांना जाळ्यात ओढून त्यांच्याशी विवाह करून नंतर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम ही टोळी करत होती. हा सर्व प्रकार एका तरुणाच्या लक्ष्यात आल्यानंतर त्याने याची माहिती पोलिसांना दिली आणि त्यानंतर पन्नास हजारांच्या रोख रकमेसह बनावट लग्न लावणाऱ्या महिलेला आणि तिच्या साथीदाराला आष्टी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आगामी पालिका निवडणूक पाहता मुंबई काँग्रेसची नवीन कार्यकारणी जाहीर, सहा ज्येष्ठ उपाध्यक्ष, 15 उपाध्यक्ष, 42 महासचिव, 76 सचिव आणि 30 कार्यकारी सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील सर्वच गटांना काही ना काही मिळेल, याची दक्षता यानिमित्ताने घेतली गेलीय . डिसेंबरमध्ये आमदार भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यासोबत चरणसिंग सप्रा यांना कार्यकारी अध्यक्षपद बहाल केले गेले. आता नव्या अध्यक्षांच्या कार्यकारिणीची दिल्लीतून घोषणा झालीय.
रायगावयेथे आयशर, ट्रक आणि इनोवा यांची एकमेकांना धडक, पुणे-बेंगलोर महामार्गावरील साताऱ्यातील घटना, अपघातामुळे वाहतूक विस्कळीत, गाडीतील जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू
पार्श्वभूमी
सुप्रीम कोर्टात आज मराठा आरक्षणावर सुनावणी, चार राज्यांनी उत्तरासाठी वेळ मागितला
सुप्रीम कोर्टात उद्या मराठा आरक्षणावर सुनावणी आहे. मागच्या सुनावणीत कोर्टाने या प्रकरणात सर्व राज्यांना नोटीस दिली होती. उद्याच्या सुनावणी आधी चार राज्यांनी उत्तरासाठी अधिकचा वेळ मागितला आहे. पंजाब, हरियाणा, तमिळनाडू, छत्तीसगड या चार राज्यांनी उत्तरासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला आहे. उद्या सकाळी साडेदहा वाजता पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. 102 व्या घटना दुरुस्तीवर अर्थात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या स्थापनेनंतर राज्यांना आरक्षणाचे अधिकार आहेत की नाहीत याबाबत राज्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी नोटिसा दिल्या गेल्या आहेत. मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी आता 15 ते 17 मार्च दरम्यान होणार आहे. या सुनीवणी दरम्यान इंद्रा सहानी खटल्यातील निकाल, मोठ्या खंडपीठाकडे सुनावणी वर्ग करायची की नाही यासंदर्भात युक्तिवाद होणार आहे.
Maharashtra Corona | राज्यात आज दिवसभरात 16 हजार 620 कोरोना बाधितांची नोंद, तर 50 रुग्णांचा मृत्यू
दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात आज 16 हजार 620 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज नवीन 8 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज राज्यात 50 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत एकूण 21 लाख 34 हजार 072 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 126231 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.21% वर पोहोचलं आहे. नागपूर जिल्ह्यातही कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. नागपुरात आज दिवसभरात 2 हजार 252 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1033 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
टीम इंडियाने पराभवाचा वचपा काढला; इंग्लंडवर 7 विकेट्सने मात, विराट-इशानची विजयी खेळी
टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात मागच्या परभवाचा वचपा काढत इंग्लंडवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. यासह विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. इंग्लंडने भारतीय संघाला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान टीम इंडियाने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. कर्णधार विराट कोहली आणि पदार्पणवीर इशान किशन या दोघांनी विजयी खेळी साकारली. कर्णधार विराट कोहलीने 46 चेंडूत 73 धावांची नाबाद खेळी साकारली. याशिवाय ईशान किशनने आपला पहिला सामना खेळत 32 बॉलमध्ये 56 धावा केल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -