Breaking News LIVE : चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा एकदा ब्राऊन शुगरची कारवाई

Breaking News LIVE Updates, 14 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Mar 2021 08:38 AM
नाशिकमध्ये आज देखिल कोरोना रुग्णसंख्येने पार केला हजारांचा टप्पा

दिवसभरात जिल्ह्यात 1356 नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू. रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे- नाशिक शहर - 942, नाशिक ग्रामीण - 269, मालेगाव मनपा - 126, जिल्हा बाह्य - 19
आज दिवसभरात एकूण 523 रुग्ण बरे झाले असून, सध्या 8 हजार 48 बाधितांवर उपचार सुरु

कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरूच...

कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज  कोरोना बाधित 404 रुग्णांची नोंद. उपचार घेत असलेले रुग्ण 3040. तर एका दिवसात 249 कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी. 24 तासात कोरोना बाधित 3 रुग्णांचा मृत्यू .

रायगड जिल्ह्यात कोरोना रुगणांच्या संख्येत लक्षणीय वाढ .

आज दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे २३५ रुग्ण , दोन रुगणांचा मृत्यू. पनवेल तालुक्यात  हद्दीत १६४ नवे रुग्ण. रायगड जिल्ह्यातील आजमितीस एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक हजार ४७६ ....

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; आज दिवसभरात 16 हजार 620 कोरोना बाधितांची नोंद

राज्यात आज 16,620 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 8861 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2134072 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 126231 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.21% झाले आहे. 

परभणीत संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या वाढली

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने परभणीत शनिवार-रविवार संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, या दोन्ही दिवशी जिल्ह्यामध्ये रुग्णांची वाढ झाली आहे. आज संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यामध्ये 87 रुग्ण आढळलेत तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात छत्तीस रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर सध्या एकूण 361 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अकोला जिल्ह्यात आज दिवसभरात आढळलेत कोरोनाचे 537 नवे रुग्ण

अकोला जिल्ह्यात आज दिवसभरात आढळलेत कोरोनाचे 537 नवे रुग्ण. दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू.  मृतांचा आकडा पोचला 402 वर. सध्या 5184 रुग्णांवर उपचार सुरू.

राजकारणामध्ये काही खरं नसतं, त्यामुळे रामदास आठवले आणि आम्ही एकत्र येऊ शकतो : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

सांगलीत विठ्ठल पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त नागरी सत्कार सोहळा कार्यक्रम आणि राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात  नाना पटोले आणि रामदास आठवले एकत्र आले होते.त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘रामदास आठवले आणि आम्ही एकत्र येऊ शकतो’ असं वक्तव्य केलं आहे.

नांदेड : भाजीपाला दुकान लावण्यावरून दलित गरोदर महिलेस मारहाण

नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस स्टेशन समोरील मच्छीमार्केट जवळ भाजीपाला दुकान लावण्याच्या कारणावरून एका दलित गरोदर महिलेस माराहाण झाल्याची घटना काल रात्रीला घडलीय. गरोदर महिलेस झालेल्या या अमानुष मारहाणी संदर्भात जिल्ह्यातील दलित संघटनांनी संताप व्यक्त केला य.सदर घटनेविषयी भाग्यनगर पोलिसात रात्री उशिरा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अहमदनगर -अवैधरित्या पिस्तूलची तस्करी कारणाऱ्यांविरोधात जामखेड पोलिसांची मोठी कारवाई

अहमदनगर -अवैधरित्या पिस्तूलची तस्करी कारणाऱ्यांविरोधात जामखेड पोलिसांची मोठी कारवाई, 4 पिस्टलसह 6 जिवंत काडतुसे जप्त, शहरातील दोन तरुणांकडे बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आणलेल्या पिस्तूल, दोघांना अटक, ऋषी उर्फ (पप्पू) मोहन जाधव वय 22 वर्षे व दीपक अशोक चव्हाण 32 वर्षे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे

मराठा आरक्षणाच्या सुनावणीमध्ये कोणताही वेळकाढूपणा न करता मुद्देसूद मांडणी करावी- खासदार संभाजीराजे छत्रपती

मराठा आरक्षणाच्या सुनावणीमध्ये कोणताही वेळकाढूपणा न करता मुद्देसूद मांडणी करावी, खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना पत्र ,  50 टक्क्यांवरील आरक्षणावर इतर राज्यांची मतं मांडण्यास किती वेळ लागेल माहीत नाही, सुनावणीस वेळ लागल्यास मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहू शकतो, यामुळे समाजात असंतोष वाढू शकतो- संभाजीराजे, राज्य सरकारने अभ्यासपूर्वक मांडणी करून आरक्षणाच्या अंमलबजावणी वरील स्थगिती उठवण्यासाठी कटीबद्ध राहावे- संभाजीराजे

अवनी वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू

नागपूर :  अवनी वाघिणीच्या बछड्याचा(छोटी अवनी) मृत्यू,  8 मार्चला पेंचमध्ये दुसऱ्या वाघिणीच्या हल्ल्यात झाली होती जखमी,  पेंचमधील  तिरतालमागी येथील पिंजऱ्यात सुरू होते उपचार,  पांढरकवडा येथील अवनी वाघिणीच्या मृत्युनंतर तिच्या शावकाची देखभाल पेंच व्याघ्र प्रकल्पात  एका  खुल्या पिंजऱ्यात करण्यात येत होती, सुमारे दोन वर्षे तिरतालमांगी येथील पाच हेक्टर बंदिस्त अधिवासात राहिल्यानंतर छोट्या अवनीला  खुल्या जंगलात  सोडण्यात आले होते.  मात्र जंगलात दुसऱ्या वाघिणीच्या हल्ल्यात हा बछडा जखमी झाला

सचिन वाझेशिवाय आणखी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सचिन वाझेशिवाय आणखी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होऊ शकते.. त्यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.. ठाण्यामधून तीन जणांच्या अटकेची शक्यता 

नांदेड: थकीत बिलामुळे महावितरणने शहरातील महापालिकेच्या स्ट्रीट लाईटचे वीज कनेक्शन तोडले

नांदेड: थकीत बिलामुळे महावितरणने शहरातील महापालिकेच्या स्ट्रीट लाईटचे वीज कनेक्शन तोडले, थकीत बिलापोटी वीज कनेक्शन तोडण्याची महापालिकेवर नामुष्की.

पार्श्वभूमी

१३ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर एनआयएकडून पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक, आज कोर्टात हजर करणार, अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकाप्रकरणी पहिली कारवाई


 


 


सचिन वाझेंच्या अटकेनंतर भाजपचा ठाकरे सरकारवर निशाणा, महाविकास आघाडीचा चेहरा उघड झाल्याचं म्हणत हल्लाबोल


 


पहाटे साडेतीनच्या सुमारास एनआयएच्या कार्यालयाबाहेर आलेल्या इनोव्हा कारमुळे चर्चांना उधाण, अंबानींच्या घराबाहेर देखील आढळली होती पांढऱ्या रंगाची इनोव्हा


 


लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नका, हा शेवटचा इशारा, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं, नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन


 


काल दिवसभरात  राज्यात १५,६०२ कोरोनाग्रस्तांची नोंद, तर ८८ रुग्णांचा मृत्यू, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरची चिंता वाढली


 


श्रीलंकेत बुरख्याला बंदी, तर एक हजाराहून अधिक मदरशांना टाळं, तीव्र पडसाद उमटण्याची चिन्ह

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.