एक्स्प्लोर
सांगलीत तडीपार गुंडाची धारदार शस्त्राने हत्या

सांगली : सांगलीत तडीपार गुंड रवी माने याची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली आहे. रवी मानेवर झालेल्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमीही झाला आहे. 4 ते 5 हल्लेखोरांनी हत्या करुन ते पसार झाले. तडीपार गुंड रवी माने हा सांगलीमध्ये भावाच्या वाढदिवसासाठी कलानगर येथे मंडप ठरवण्यासाठी आला होता. यावेळी चार ते पाच हल्लेखोरांनी रवीसह त्याच्या साथीदारावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यात रवी माने याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. त्याला सांगली सिव्हिल मध्ये दाखल करण्यात आलं आहे. गुंड रवी मानेची हत्या पूर्ववैमनस्य आणि टोळीयुध्दातुन झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हत्या करुन पसार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
Before You Go
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















