एक्स्प्लोर

सांगलीतील सामूहिक बलात्कार-हत्या प्रकरण : प्रियकरासह तिघांना मरेपर्यंत जन्मठेप

विटाजवळच्या गार्डी इथे 12 ऑक्टोबर 2012 रोजी एक 19 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार घडला होता. यानंतर विटा पोलिसांनी मृत तरुणीचा प्रियकर लक्ष्मण सरगर, अनुज अर्जुन पवार आणि दादासो भास्कर आठवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.

सांगली : सांगलीतील सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी प्रियकरासह तिघांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. विट्याच्या गार्डी इथे 2012 मध्ये मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. यानंतर सात वर्षांनी न्यायालयाचा निर्णय आला आहे. काय आहे प्रकरण? विटाजवळच्या गार्डी इथे 12 ऑक्टोबर 2012 रोजी एक 19 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार घडला होता. संबंधित तरुणी प्रेमप्रकरणातून घरातून निघून गेली होती. त्यानंतर तिलीचा 16 ऑक्टोबर रोजी विट्यातील एका पडक्या विहिरीत मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलिसांच्या तपासात मृत मुलीचे गावातील लक्ष्या उर्फ लक्ष्मण सरगर याच्याशी प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं होतं. पोलिसांनी सरगरला ताब्यात घेऊन चौकशी केली. मित्रांसह तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिचा गळा दाबून खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने तो विहीरीत फेकून दिल्याची कबुल लक्ष्मण सरगरने दिली होती. यानंतर विटा पोलिसांनी मृत तरुणीचा प्रियकर लक्ष्मण सरगर, अनुज अर्जुन पवार आणि दादासो भास्कर आठवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. सांगली जिल्हा सत्र न्यायालयात 16 जुलै 2019 रोजी खटल्याची अंतिम सुनावणी पार पडली. मृत मुलीच्या कुटुंबीयांना 75,000 रुपये देण्याचा आदेश यामध्ये सरकारी पक्षाने एकूण 20 साक्षीदारांचा जबाब नोंदवत वकील उल्हास चिप्रे यांनी संबंधित घटना कोपर्डीप्रमाणेच गंभीर असल्याचं निदर्शनास आणून दिलं आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. तर परस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावरुन आरोपींनी बलात्कार करुन खून केल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने तिघांना दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेप, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सात वर्षांचा सश्रम कारावास आणि 25,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसंच प्रत्येक आरोपीने मृत मुलीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25,000 रुपयेप्रमाणे एकूण 75,000 रुपये देण्याचे आदेश दिले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget