एक्स्प्लोर
Advertisement
गोव्याहून विक्रीसाठी चिमुकल्याचं अपहरण, आरोपीला भंडाऱ्यात अटक
अपहरणकर्त्याचं नाव भगवान ताराचंद लांजेवार असून तो मूळच्या भंडारा जिल्ह्यातील अड्याल येथील रहिवासी आहे. त्याच्या अटकेनंतर भंडाऱ्यात विक्रीसाठी मुले पळवून आणणारं रॅकेट सक्रिय असल्याची शंका निर्माण झाली आहे.
भंडारा : गोवा येथून विक्रीसाठी पळवून आणलेल्या चिमुकल्याची भंडारा लगत असलेल्या शाहपूर येथून सुटका करण्यात आली. अपहरणकर्त्याचं नाव भगवान ताराचंद लांजेवार असून तो मूळच्या भंडारा जिल्ह्यातील अड्याल येथील रहिवासी आहे. त्याच्या अटकेनंतर भंडाऱ्यात विक्रीसाठी मुले पळवून आणणारं रॅकेट सक्रिय असल्याची शंका निर्माण झाली आहे.
भंडारा जिल्ह्यातील अड्याल येथील मूळच्या रहिवासी असलेल्या भगवान ताराचंद लांजेवार हा गोवा येथे मुलं चोरुन आणण्याच्या उद्देशाने गेला. तिथे मुस्लीम धर्मीय व्यक्ती असल्याचं भासवून एका वस्तीत काही दिवस वास्तव्य केलं. त्यानंतर घराच्या शेजारी राहणाऱ्या चिमुकल्याचं विक्रीसाठी अपहरण केलं.
गोव्यातील या चिमुकल्याच्या आई-वडिलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार गोवा पोलिसात दिली. पोलिसांचा भगवान लांजेवारवर संशय बळावला. गोवा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतल्यानंतर त्याचे फोनचे लोकेशन भंडारा येथे आढळले.
लोकेशन ट्रेस झाल्यानंतर तातडीने गोवा पोलिसांची एक टीम रवाना होत आरोपी भगवान लांजेवार याला भंडारा लगत असलेल्या शाहपूर येथून शिताफीने अटक करण्यात आली. आरोपीकडून गोवा येथून पळवून आणलेल्या चिमुकल्याची सुटका करण्यात आली आहे. आरोपीच्या अटकने भंडारा येथे इतर राज्यातून मुलं पळवून विक्रीसाठी भंडारा येथे आणणारं मोठं रॅकेट सक्रिय असल्याचं समोर येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
हिंगोली
निवडणूक
ट्रेडिंग न्यूज
निवडणूक
Advertisement