एक्स्प्लोर
वडिलांना टाटा केल्यावर तिसऱ्या मजल्यावरुन पडून चिमुरड्याचा मृत्यू
अंशुमनचे वडील अजय शर्मा कामानिमित्त घराबाहेर पडले. साडेतीन वर्षांचा अंशमुन आपल्या वडिलांना निरोप देण्यासाठी गॅलरीत आला. टाटा-बाय बाय करुन तो गॅलरीतच खेळत बसला.

नाशिक : नाशिकच्या 'शिरीन हाईट्स'मधून काल-परवापर्यंत अंशुमनचा खेळण्या-बागडण्याचा आवाज यायचा, पण आज या इमारतीच्या भिंतींच्या कानावर अंशुमनचा गोड आवाज पडत नाही. तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खेळता-खेळता साडेतीन वर्षांचा अंशुमन खाली पडला आणि गतप्राण झाला. अंशुमनचे वडील अजय शर्मा कामानिमित्त घराबाहेर पडले. साडेतीन वर्षांचा अंशुमन आपल्या वडिलांना निरोप देण्यासाठी गॅलरीत आला. टाटा-बाय बाय करुन तो गॅलरीतच खेळत बसला. दुसरीकडे त्याची आई टीव्ही बघण्यात दंग होती. तेवढ्यात गॅलरीत खेळता खेळता अचानक अंशुमनचा तोल गेला आणि तो तिसऱ्या मजल्यावरुन खालीगेटवर पडला. डोक्याला लागल्यामुळे अंशुमनचा मृत्यू झाला. शर्मा कुटुंबीय दोन महिन्यांपूर्वीच अंबडच्या शिरीन हाईट्समधील नव्या फ्लॅटमध्ये राहायला आले होते. मात्र त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीला बसवण्यात आलेला लोखंडी कठडा कमी उंचीचा होता आणि हेच अंशुमनच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं. घराच्या बाल्कनीतून पडून चिमुरड्याचा मृत्यू होण्याची नाशिकमधील तिसरी घटना आहे. त्यामुळे पालकांना आपल्या पोरांवर डोळ्यांत तेल घालून लक्ष देण्याची गरज पुन्हा अधोरेखित होत आहे.
Before You Go
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















