BMC Action on Narayan Rane Mumbai Bungalow : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या जुहू इथल्या अधीश बंगल्याची महापालिकेच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली. अधीश बंगल्यात अनियमिततेचा संशय उपस्थित करत मुंबई महापालिकेनं याआधीच नोटीस पाठवली होती. त्यानुसार आज मुंबई महापालिकेचं पथक अधीश बंगल्यात धडकणार आहे. दरम्यान अधीश बंगला पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा नारायण राणेंनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता.


राणे यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासंदर्भात मुंबई महापालिकेनं याआधीच नोटीस बजावली आहे. नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा राजकीय कलगीतुरा रंगला असताना आता त्यात बंगल्यावरुन सुरु झालेल्या वादाची भर पडली आहे. दरम्यान आजच्या पाहणीनंतर मुंबई महापालिकेच्या पथकाला नारायण राणेंच्या बंगल्यात अनियमितता आढळणार का? आणि आढळली तर अधीश बंगल्यावर कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


दरम्यान, नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासंदर्भात मुंबई महापालिकेनं याआधीच नोटीस बजावली आहे. नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा राजकीय कलगीतुरा रंगला असताना आता त्यात बंगल्यावरुन सुरु झालेल्या वादाची भर पडली आहे. दरम्यान आजच्या पाहणीनंतर मुंबई महापालिकेच्या पथकाला नारायण राणेंच्या बंगल्यात अनियमितता आढळणार का? आणि आढळली तर अधीश बंगल्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha