Bhandara News Update : 'माय लास्ट लोकेशन इज माडगी ब्रीज असा स्टेटस ठेवून आयटीआयच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District ) तुमसर येथे ही घटना घडली आहे. अनुराग विजय गायधने (वय 20, रा. शहर वार्ड तुमसर ) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
अनुराग हा भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील एका आयटीआय (ITI) प्रशिक्षण शिक्षण संस्थेत शिकत होता. परंतु,परीक्षेत नापास झाल्यामुळे तो नैराश्यात होता. या नैराश्यातूनच त्याने माडगी येथील वैनगंगा नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्येपूर्वी "माय लास्ट लोकेशन इज माडगी ब्रीज असा 'स्टेटस ठेवला होता. स्टेटसवरूनच अनुराग याने आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे.
दरम्यान, अनुराग याच्या व्हाट्अॅपवरील स्टेटसवरुन त्याचा मृतदेह शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. परंतु, अद्याप त्याचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे आज पुन्हा पोलिसांचे शोधकार्य सुरु असून या घटनेचा पुढील तपास देव्हाडी पोलीस करत आहेत. पोलिसांनाही या घटनेबाबत अद्याप जास्त माहिती मिळाली नाही.
अनुराग याच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर त्याचे नातेवाईक आणि कुटुंबीयांनी वैनगंगा नदीवरील माडगी पुलावर गर्दी केली होती. त्याने उचललेल्या या धक्कादायक पावलामुळे तुमसरसह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अनुराग याने असे टोकाचे पाऊल उचलायला नको होते, अशा भावना त्याचे मित्र व्यक्त करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Karnataka Murder : कर्नाटकात बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येनंतर तणाव, कलम 144 लागू, शाळा-कॉलेज बंद
- Hijab controversy : हिजाब बंदीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या 10 मुलींविरुद्ध FIR दाखल
- Karnataka Hijab Row : वर्गात हिजाब, भगवी शाल घालण्यास बंदी ; कर्नाटक सरकारचा निर्णय
- Hijab Controversy : हिजाब हा मुस्लिमांचा घटनात्मक अधिकार: असदुद्दीन ओवेसी