एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कामं वेळेवर होत नसल्यानं सत्ताधारी भाजपच्या उपमहापौरांनीच लावलं मनपाला कुलूप

भाजपाचे उपमहापौर देविदास काळे यांच्या कार्यालयात रोज अधिकाऱ्याच्या तक्रारी करणारे यांची गर्दी वाढत आहे. यामुळे संतप्त झालेले उपमहापौर देविदास काळे आज नगररचना कार्यालयात गेले. काळे तिथे पोहोचले असता एकही अधिकारी हजर नव्हते.

लातूर : लातूर महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपच्या उपमहापौरांनीच मनपाला कुलूप लावल्याचा प्रकार समोर आला आहे.  कामे वेळेवर होत नाहीत, अधिकारी जागेवर नसतात, यामुळे संतप्त उपमहापौरांनी टाळे लावले. लातूर महानगरपालिकेवर पहिल्यांदाच भाजपाची सत्ता आली आहे. मागील अनेक दिवसापासून या महापालिकेचा कारभार सुरळीत होण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी प्रयत्न  करत आहेत. मात्र अनागोंदी कारभाराची सवय लागलेले प्रशासकीय अधिकारी मात्र बदलण्याचे नाव घेत नाहीत. भाजपाचे उपमहापौर देविदास काळे यांच्या कार्यालयात रोज अधिकाऱ्याच्या तक्रारी करणारे यांची गर्दी वाढत आहे. यामुळे संतप्त झालेले उपमहापौर देविदास काळे आज नगररचना कार्यालयात गेले. काळे तिथे पोहोचले असता एकही अधिकारी हजर नव्हते. यामुळे संतापलेल्या काळे यांनी या कार्यालयास कुलूप लावले. यावेळी या कार्यालयातील काही कर्मचारीही आतच कोंडण्यात आले. सत्ताधारी लोकप्रतिनिधीनेच असा प्रकार केल्याने लातुरात चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जनतेची कामे तर वेळेत करावी एवढीच अपेक्षा असल्याची खंत यावेळी काळे यांनी बोलून दाखवली आहे. नगररचना विभागात लोकांची अनेक महत्वाची कामं असतात. या महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळातील सुस्तीमधून बाहेर यायला तयार नाही, असे देविदास काळे यांनी सांगितले आहे. नागरिक आपल्या कामांसाठी सहा-सहा महिने चकरा मारतात. लोकांची मानसिक छळवणूक केली जात आहे. लोकं  कामासाठी आल्यानंतर अधिकारी जाग्यावर नसतात. यामुळेच मी कुलूप लावण्याचा निर्णय घेतला असल्याचे काळे यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Shivsena Thackeray Vs Shinde Camp: एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Shivsena Thackeray Vs Shinde Camp: एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Embed widget