मुंबई :  आगामी लोकसभेबरोबरच (Loksabha Election)  विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) भाजपने  कंबर कसली आहे. पहिल्या टप्प्यात पक्षाचं प्राबल्य नसलेल्या अथवा तापर्यंत कधीही न जिंकलेल्या 98 मतदारसंघावर भाजपने फोकस केला आहे.


लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कधीही न जिंकलेल्या 16 जागा निवडल्या तर विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास 98 मतदारसंघ हेरले आहेत.  खास करून काँग्रेस - राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेले हे मतदार संघ जिंकण्यासाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे.  यासाठी भाजपच्या वतीने श्रीकांत भारतीय यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. 


पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातून जवळपास 98 मतदार संघाची निवड करण्यात आली आहे. 2014 किंवा 2019 या निवडणुकीत 2000 पेक्षा कमी मताने पराभूत झालेले हे मतदारसंघ आहेत. 


पहिल्या टप्प्यात कोणते दिग्गज निशाण्यावर?



  • पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण मतदार संघ

  • धनंजय मुंडे यांचा परळी 

  • रोहित पवार यांचा कर्जत जामखेड 

  • एकनाथ खडसे यांचा मुक्ताईनगर 

  • धीरज देशमुख यांचा लातूर ग्रामीण 

  • वर्षा गायकवाड यांचा धारावी

  • अस्लम शेख यांचा मालाड

  • दत्ता भरणे यांचा इंदापूर


या दिग्गजांचा समावेश आहे.


पहिल्या टप्प्यात 98 मतदारसंघ असले तरी येणाऱ्या काही दिवसात या मतदारसंघात वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार अशोक चव्हाण यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांच्या मतदार संघाचा समावेश करून ते जिंकण्याचा प्रयत्नही भाजपचा असेल. परंतु पहिल्या टप्प्यात दोन हजाराने पराभूत झालेल्या मतदारसंघांवर भर दिला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी दोन वर्षाहून अधिक काळ असताना भाजपने सुरू केलेले आहे मिशनचा फायदा होतो का हे बघावे लागणार आहे.


आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांना समोर ठेवत भाजपचं मिशन 45 सुरू केले आहे. या मिशनची सुरुवात पवाराचे प्राबल्य असलेल्या बारामती येथून झाली आहे.   लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक स्थितीचा आणि कामांचा आढावा केंद्रीय मंत्री घेणार  आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


CBI Raids : CBI च्या जाळ्यात नेतेमंडळी ; युपीए काळात 65 टक्के, तर एनडीएच्या काळात 95 टक्के विरोधकांवर कारवाई


ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर वन, युतीला जनतेचा स्पष्ट कौल; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा