Chandrashekhar Bawankule : काँग्रेस (Congress) म्हणजे नौटंकी आणि नाच्यासारखी पार्टी आहे. कोणी काहीही चांगले केले तरी त्यांना कधीच पटत नसल्याची बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी खोटे बोलून खोटा प्रचार केला. आता त्यांना वाटते आहे की लाडली बहीण योजना सुरू केल्याने मोठा फायदा आम्हाला होणार आहे. 10 लाखांचा विमा महिलांना मिळू शकतो, पुढच्या काळातही महायुती सरकार सर्व डिपार्टमेंट वर लक्ष ठेवणार आहे. कुठलाही विभाग असेल तरी सामाजिक विभागाचा निधी द्यावाच लागतो. तो कापता येत नाही.


मात्र, काँग्रेस काळात कधीही अशी चांगली, समाजउपयोगी कामे झाली नाही. कालच्या अर्थसंकल्पात विदर्भाला सिंचनपासून नागपूर मेट्रोपर्यंत निधी मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकतेय आणि त्याचे परिणामी विधानसभेत काँग्रेसला कळेलच, असा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बोलताना व्यक्त केलाय.


देवेंद्र फडणवीस यांचे वडिलांच्या नावे फिरता दवाखाना सुरू


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात काम करताना मी बघितले आहे. अगदी मनपापासून सार्वजनिक, सामाजिक जीवनात ते संवेदनशील असतात. ते कायम नेतृत्वासह  सेवाकार्य ही करत असतात. फडनवीस यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता राज्यातील सर्व आयसीयू मध्ये भेट दिली होती. त्यातीलच एक पाऊल म्हणजे सिद्धिविनायक फाउंडेशन ने फिरता दवाखाना सुरू केले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांच्या स्मृती निमित्त हा दवाखाना आज सुरू केला आहे. त्यामुळे आता एकही रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहायला नको,आधुनिक पद्धतीने यंत्र सामुग्री यात आहे. तसेच हा दवाखाना घरोघरी देखील जाणार असल्याची माहीती चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना दिली. 


झोपडपट्ट्यांमध्ये गरीब रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा


नागपुरात सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या वतीने झोपडपट्टी भागांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी अद्ययावत ॲम्बुलन्सनचे सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या वतीने आजपासून लोकार्पण केले जात आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील व माजी आमदार गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाने नागपुरातील झोपडपट्ट्यांमध्ये गरीब रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा या ॲम्बुलन्सच्या मार्फत मोफत पुरवली जाणार आहे. विशेष म्हणजे हा फिरता दवाखान्याच्या स्वरूपात ही ॲम्बुलन्स रोज नागपूरच्या वेगवेगळ्या झोपडपट्टी भागात फिरणार आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे भाष्य केलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या