Chandrashekhar Bawankule भंडाराविदर्भामध्ये पुन्हा 40 प्लसचा आकडा आपल्याला पूर्ण करायचा असेल, तर भंडारा जिल्ह्याची मोठी जबाबदारी आहे. राजकीय प्रस्ताव हा दीड हजार पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडायचा होता. मात्र, भंडारा येथील बैठकीला केवळ 245 पदाधिकारी उपस्थित असल्यानं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)  यांनी भाषणातून नाराजी व्यक्त करीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या कानपिचक्या घेतल्या. 


भंडाऱ्यात (Bhandara) पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीवरून नाराजी व्यक्त करतानाच बावनकुळे यांनी वर्धा आणि पुसद या जिल्ह्यात झालेल्या अधिवेशनाबाबत तारीफ केली. वर्ध्येत बुथ अध्यक्ष, सचिव महिला अध्यक्ष, सोशल मीडिया अध्यक्ष, मागासवर्गीय अध्यक्ष असे साडे तेराशे पदाधिकारी उपस्थित होते. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याचं महाअधिवेशन घ्यायचं आहे. दोन विधानसभेचा सर्वात लहान जिल्हा असलेल्या पुसद येथेही महाअधिवेशन मोठ्या थाटात झालं. मात्र भंडाऱ्यात बैठकीला 245 पदाधिकारी आणि कोर ग्रुप मंचावर बसला असल्यानं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. 


कमी उपस्थितीत महाअधिवेशन कसं होऊ शकेल?- चंद्रशेखर बावनकुळे


गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतील विदर्भात मोठा फटका बसला होता. विदर्भातील (Vidarbha) दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश आले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी यश आले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली असून काँग्रेस विदर्भातील सर्वत मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजप आणि महायुतीला मोठ्या पराभवाला समोर जावं लागले होतं. परिणामी गेल्या निवडणुकांच्या निकालनंतर भाजप पूर्ण तयारीनिशी आता मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाल्याचे बघायला मिळाले आहे.


मात्र, भंडारा येथील बैठकीला केवळ 245 पदाधिकारी उपस्थित असल्यानं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाषणातून नाराजी व्यक्त केली आहे. पदाधिकाऱ्यांच्या कमी उपस्थिती वरून महाअधिवेशन होऊ शकत नाही. अधिवेशनाला उंची द्यावी लागेल. एक वेगळा संदेश महाअधिवेशनाच्या माध्यमातून भंडाऱ्यातून द्यायचा आहे, आणि तो संदेश विदर्भात किती समोर जावू शकतो, हा संदेश असणार असल्याच्या कानपिचक्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतल्या. 


उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह हे अहमदशाह अब्दालीचे वंशज आहेत, असा घणाघाती हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते फार फ्रस्टेट झाले आहेत. या अस्वस्थतेत ते असे शब्द वापरत आहेत. यावर आपण काय उत्तर द्यायला हवं. नैराश्यात एखादी व्यक्ती डोकं बिघडल्यासारखं बोलत असेल तर त्याला उत्तर द्यायचं नसतं, असे फडणवीस म्हणाले.


तसेच, अमित शाह यांनी औरंगजेब फॅन क्लब असा शब्द वापरला होता. उद्धव ठाकरे यांनी हे भाषण करून आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत, हे दाखवून दिलं आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावलाय.


हे ही वाचा