Maharashtra Vidhan Sabha Election : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election)  आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढला आहे. सरकार आणि विरोधी पक्ष आता कामाला लागले आहे.  आचारसंहितेपूर्वीच    विविध घोषणा करत सर्वसामान्य जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न  करत  आहे. अशातच भाजपचे नेते चंद्रकात पाटील यांनी आचारसंहिता कधी लागणार  याची तारीख सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटील  बोलत होते. 


चंद्रकांत पाटील म्हणाले, Dpdc चा 99% टक्के निधी खर्च करण्यात यशस्वी  झालो आहे. काही निधी खर्च करण्यासाठी वर्क ऑर्डर 31 ऑगस्टपर्यंत काढण्याच्या आदेश दिले आहेत. 112 कोटी रुपयांचा निधी आपल्याला वाढवून मिळाले आहेत. नियोजनच्या सदस्यांनी कामे सुचवण्याच्या सूचना देखील दिले आहे . 20 सप्टेंबरला आचारसहिंता लागेल हे अंदाज आहहे तसे गृहीत धरून कामं करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  20 सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसहिंता लागण्याचा अंदाज आहे.


उद्धव ठाकरेंनी अशी भाषा वापरू नये, अन्यथा... : चंद्रकांत पाटील


उद्धव ठाकरेंच्या अमित शाहांच्या वक्तव्यावर  चंद्रकांत पाटील म्हणाले,  राजकारणात बोलण्याचा स्तर इतका खाली गेला आहे. उद्धव ठाकरेंचे गणित नेमके कुठे बिघडले हे कळत नाही. प्रबोधनकार, बाळासाहेबसारख्या परंपरा असलेल्या घरातील माणसाने असे शब्द वापरणे हे लोकांना आवडणारे नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अशी भाषा वापरू नये. अन्यथा तसेच उत्तर दिले जातील. अमित शाह हे केवळ आमचे नेते नाहीत ते आमचे पालक आहेत. सुरुवात करणाऱ्यांनी हे थांबवलं पाहिजे.


महायुतीला देवेंद्रजींच्या नेतृत्वाची गरज : चंद्रकांत पाटील


देवेंद्र फडणवीस  केंद्रात जाणार  यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,  देवेंद्र महाराष्ट्रमध्ये उत्तम नेतृत्व करत आहेत.  आज महाराष्ट्रमध्ये अनेकांना ते असह्य झालेत त्यामुळे अफवा पसरवत आहेत. त्यामुळे अनेकांनी देव पाण्यात घालून बसलेत कधी बाहेर जातील. त्यांनी भल्याभल्याना जेरीस आणलं आहे, कोणाला हे नावं विचारू नका. त्यांना वाटतं की या बाबाला घालवल पाहिजे, पण हे सांगणारे तुम्ही कोण?   विधानसभा तोंडावर आहे केवळ भाजप नाही तर महायुतीला देवेंद्रजींच्या नेतृत्वाची गरज आहे.  पण आम्ही नेतृत्वाची आज्ञा मानणारे आहोत.  केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर देवेंद्र जी काही म्हणणार नाही आणि आम्ही काही म्हणण्याचा प्रश्न नाही.  


हे ही वाचा :


" सॉरी मम्मी पप्पा”, UPSC करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थीनीची दिल्लीत आत्महत्या