एक्स्प्लोर

Bjp Mission 144 : भाजपच्या "मिशन 144" ची चंद्रपुरातून होणार सुरुवात, जाणून घ्या काय आहे मिशन 144

Bjp Mission 144 : चंद्रपूरच्या दौऱ्यात जे. पी. नड्डांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर उपस्थित असतील.

Chandrapur News Update : भाजपच्या "मिशन 144" ची ( Bjp Mission 144 ) सुरुवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा चंद्रपुरातून करणार आहेत. यासाठी उद्या म्हणजे 2 जानेवारीला जे. पी नड्डा चंद्रपूर दौऱ्यावर येणार आहेत. चार्टर्ड विमानाने सकाळी 11 वाजता चंद्रपूरच्या मोरवा विमानतळावर नड्डा दाखल होतील. त्यानंतर ते चंद्रपूरचं आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सिव्हिल लाईनच्या न्यू इंग्लिश ग्राउंडवर नड्डा यांची जाहीर सभा होणार आहे. सभेनंतर नड्डा भाजपच्या 'लोकसभा टीमशी' एका बैठकीत संवाद साधणार आणि त्यानंतर औरंगाबादसाठी रवाना होतील. 

चंद्रपूरच्या दौऱ्यात जे. पी. नड्डांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर उपस्थित असतील. मागील लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला त्या सर्व ठिकाणी भाजपने लक्ष केंद्रित केले असून त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या दौऱ्याकडे बघितले जात आहे. याआधी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा दौरा करून केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी आणि भाजपच्या पक्षसंघटनाविषयक विविध मुद्द्यांची हाताळणी केली होती. चंद्रपूर भाजपच्या वतीने नड्डा यांच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे.

Bjp Mission 144 : काय आहे भाजपचे मिशन 144? 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक आता एका वर्षावर आलीय. सलग तिसऱ्या विजयासाठी भाजपने नियोजनबद्ध तयारी सुरू केली आहे.  भाजपने 2024 च्या लोकसभेसाठी मिशन 144 सुरु केलं आहे. देशातील 144 लोकसभा मतदारसंघांवर भाजपनं लक्ष केंद्रीत केलं आहे. यापैकी बहुतांश मतदारसंघात भाजपला विजय मिळालेला नव्हता. मिशन 144 च्या पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्र्यांचे दौरे लोकसभा मतदारसंघात पार पडले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात भाजपचे प्रमुख नेते या 144 मतदारसंघात दौरे करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जे. पी. नड्डा आता चंद्रपूरच्या चौऱ्यावर येत आहेत. 

Bjp Mission 144 : विरोधकांच्या बाल्लेकिल्ल्यात धडाडणार तोफा

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या उत्तर प्रदेशमधील रायबरेली, सपाचे दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांचा मनिपुरी, महाराष्ट्रात सुप्रिया सुळे यांचा बारामती, पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या मीमी चक्रवर्ती यांच्या जादवपूर, तेलंगाणामध्ये टीआरएसच्या श्रीनिवास रेड्डी यांच्या महाबुबनगर, मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसच्या नकुल नाथ यांच्या छिंदवाडा मतदारसंघामध्ये भाजप ताकद लावणार आहे. या 144 लोकसभा मतदारसंघांपैकी 10 ते 12 मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या सभांचं आयोजन करण्यात येणार आहे.  

महत्वाच्या बातम्या

खळबळजनक! भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्याबाहेर आढळला महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह  

 

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget