एक्स्प्लोर

Narayan Rane : मला मारण्याची ठाकरेंनी सुपारी दिली, ज्यांना दिली त्यांनीच सांगितलं - नारायण राणेंचा गौप्यस्फोट

Narayan Rane : मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपाऱ्या दिल्या. ज्यांना त्यांनी सुपाऱ्या दिल्या त्यांनीच मला सांगितलं, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला.

Narayan Rane : मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपाऱ्या दिल्या. ज्यांना त्यांनी सुपाऱ्या दिल्या त्यांनीच मला सांगितलं, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. नारायण राणे यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचा बचाव केला. नक्षलवाद्यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना मारायची सुपारी दिली होती. रमेश मोरे ची हत्या कुणी केली? माझी पण सुपारी दिली होती, पण मी सुदैवाने वाचलो, अशी टीका नारायण राणे यांनी केली. 

वारसा रक्ताने नव्हे विचाराने मिळतो. शिवसेनेत असताना आई-वडिलांचं ऐकलं नाही. पण बाळासाहेब ठाकरेंचं ऐकलं, असं उत्तर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत हिंमत असेल तर आपल्या आई वडिलांचे फोटो वापरा, माझ्या वडिलांचा फोटो का वापरता? असा सवाल बंडखोरांना केला होता. यावर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. शिवाय, अडीच वर्षात काय केलं? तेव्हा मराठी माणूस, हिंदुत्व आठवलं नाही का? असा सवाल केला.

सत्तेतून बाहेर पडल्यावर यांना हिंदुत्व, मराठी माणूस आठवतोय. सत्ता गेल्यानंतर जळफळाट आणि केविलवाणी व्यथा आहे. मुख्यमंत्री पद गेल्यानं उद्धव ठाकरेंची ही अवस्था झाली आहे. या व्यक्तीला मी 40 वर्ष ओळखतो, अंगात खोटेपणा, कपटीपणा, द्वेष आहे, अशी टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 

माननीय उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री यांच्या तुफानी मुलाखतीवर प्रेस घेतोय. संजय राऊत यांनी आधीच उत्तरं सांगितलेली होती, अशी त्यांची मुलाखत होती, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.  आजारपण आणि मातोश्री यातच मुख्यमंत्री पदाची कारकीर्द गेली. आता स्वतःचं पद एकनाथ शिंदे यांना मिळालं याच्या पोटशुळातून त्यांनी मुलाखत दिली, असे राणे म्हणाले.  आता संजय राऊत मनातून खुश आहे. माझ्या गुरूंनी, शरद पवारांनी सोपवलेलं काम फत्ते केलं, अशी टीका राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली. 

नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे...
अडीच वर्षात जनतेसाठी काहीच केलं नाही
मातोश्रीबाहेरील कुणालाच प्रेम आणि विश्वास दिलं नाही.
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना मुलाखत घ्यायला सांगितली. 
मला मारण्यासाठी ठाकरेंनी सुपाऱ्या दिल्या. ज्यांना सुपाऱ्या दिल्या त्यांनीच मला सांगितलं. 
अडीच वर्षात मराठी माणसासाठी काहीच केले नाही. 
अडीच वर्षात काय दिवे लावले?
 एक डझन आमदार आणि पाव डझन खासदार राहिले
दुखणी होती तर मुख्यमंत्री का झाले?
आमदार शिंदेंच्या प्रेमापोटी गेली. 
यांनी जे दिलं नाही ते एकनाथ शिंदे यांनी दिलं...प्रेम, विश्वास, दु:खात समरस झाले शिंदे. 
संजय राऊत जोकर आहे, पत्रकार नाही. संजय राऊत यांची राज्यभर चेष्टा होतेय. 
अडीच वर्षांत उद्धव ठाकरे फक्त तीन तास मंत्रालयात आले होते. 
दुसऱ्या मातोश्रीचा भविष्यकाळ आजपासून सुरु झाला आहे. 
एकनाथ शिंदे यांचं नगरविकास खातं आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे चालवायचे.
उद्धव ठाकरे खोटारडे आणि कपटी आहेत. 
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कोणत्याही दंगलीमध्ये नव्हते, त्यांनी कुणालाही मदत केली नाही. 
उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत जनतेचं हित कुठे? 
काय अवस्था झाली आहे शिवसेनेची? 
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कोणत्याही दंगलीमध्ये नव्हते, त्यांनी कुणालाही मदत केली नाही. आता शाखा शाखात जाऊन जनतेला साद घालतायत. 
संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना भडकवण्याचं काम करतायत.
संजय राऊत हे ठाकरेंना आपल्या तालावर नाचवतायत. 
सत्ता गेल्याने संजय राऊत मनातून खूश आहेत. पवारांच्या सूचनांप्रमाणे राऊतांनी काम फत्ते केलं. 
पुढच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पाच आकडा सुद्धा दिसणार नाही. 
बाळासाहेबांचा फोन आला होता त्याचा किस्सा नारायण राणेंनी सांगितला....मी वाईट नजरेने पाहणार नाही असं वचन दिलं... उद्धव ठाकरेंनी सुपारी देऊनही मी शांत राहिलो. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Unseasonal Rains : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करा, पंकजा मुंडेंचे बीड जिल्हा प्रशासनाला निर्देश 
Unseasonal Rains : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करा, पंकजा मुंडेंचे बीड जिल्हा प्रशासनाला निर्देश 
Pune Crime News: पुण्यात हळदीच्या पाकिटांतून गांजाची तस्करी; पोलिसांकडून दोन भावांना बेड्या, 16 किलो साठा जप्त!
पुण्यात हळदीच्या पाकिटांतून गांजाची तस्करी; पोलिसांकडून दोन भावांना बेड्या, 16 किलो साठा जप्त!
Maharashtra Breaking LIVE Updates: सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा, अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद घेतले ताब्यात
Maharashtra Breaking LIVE Updates: सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा, अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद घेतले ताब्यात
Rohit Pawar on Ashok Kharat Case: सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण...; अशोक खरात प्रकरणावरून रोहित पवारांची पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण...; अशोक खरात प्रकरणावरून रोहित पवारांची पोस्ट, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
Kim Jong Un: काही दिवसांपूर्वीच युद्ध सुरु असतानाच 10 मिसाईल डागत खळबळ उडवून दिली अन् आता किम जोंग ऊन लेकीला घेऊन थेट रणगाड्यावर स्वार! नेमका प्लॅन आहे तरी काय?
काही दिवसांपूर्वीच युद्ध सुरु असतानाच 10 मिसाईल डागत खळबळ उडवून दिली अन् आता किम जोंग ऊन लेकीला घेऊन थेट रणगाड्यावर स्वार! नेमका प्लॅन आहे तरी काय?
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात 4297 रुपयांची घसरण, चांदी 5 दिवसात 19193 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात 4297 रुपयांची घसरण, चांदी 5 दिवसात 19193 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
Weather Update: कुठे गारांचा पाऊस, तर कुठे उन्हाचा तडाखा; विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह पावसाचा 'यलो अलर्ट', तर कोकणात उन्हाचा चटका वाढणार
कुठे गारांचा पाऊस, तर कुठे उन्हाचा तडाखा; विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह पावसाचा 'यलो अलर्ट', तर कोकणात उन्हाचा चटका वाढणार
Zilla Parishad Satara: सातारा झेडपीत राष्ट्रवादी-शिवसेनेला बहुमत असूनही भाजपचा झेंडा; दोन मंत्री अन् राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना फोडाफोडीच्या राजकारणात धोबीपछाड, महेश शिंदेंच्या पत्नी प्रिया झेडपी अध्यक्षपदी
सातारा झेडपीत राष्ट्रवादी-शिवसेनेला बहुमत असूनही भाजपचा झेंडा; दोन मंत्री अन् राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना फोडाफोडीच्या राजकारणात धोबीपछाड, महेश शिंदेंच्या पत्नी प्रिया झेडपी अध्यक्षपदी
Zilla Parishad Satara: सातारा झेडपी अध्यक्ष निवडीत सिनेस्टाईल थरार, भाजपकडून फोडाफोडी अन् अटकेचाही डाव; सदस्यांना सभागृहात घेऊन जाण्याच्या झटापटीत मंत्री शंभूराज देसाईंच्या हाताला लागलं
सातारा झेडपी अध्यक्ष निवडीत सिनेस्टाईल थरार, भाजपकडून फोडाफोडी अन् अटकेचाही डाव; सदस्यांना सभागृहात घेऊन जाण्याच्या झटापटीत मंत्री शंभूराज देसाईंच्या हाताला लागलं
XX पिसाट अशोक खरातकडे दीपक केसरकर महिना दीड महिन्याला जात होते, एकनाथ शिंदेंचाही हस्तक्षेप होता, त्यांचा सीडीआर तपासण्याचं धाडस गृहखातं दाखवणार का? सुषमा अंधारेंचा सवाल
XX पिसाट अशोक खरातकडे दीपक केसरकर महिना दीड महिन्याला जात होते, एकनाथ शिंदेंचाही हस्तक्षेप होता, त्यांचा सीडीआर तपासण्याचं धाडस गृहखातं दाखवणार का? सुषमा अंधारेंचा सवाल
Rupee Plunged to Record Low: भारताचा रुपया अक्षरश: रक्तबंबाळ; देशाच्या इतिहासात प्रथमच डाॅलरच्या तुलनेत तब्बल 93.15 या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला
भारताचा रुपया अक्षरश: रक्तबंबाळ; देशाच्या इतिहासात प्रथमच डाॅलरच्या तुलनेत तब्बल 93.15 या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला
Embed widget