एक्स्प्लोर

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर कोट्यवधी रुपयांची फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्वाश्रमीच्या समर्थकाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर साताऱ्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

सातारा : माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी साताऱ्यातील फलटण पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह त्यांची पत्नी जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, विनय ठाकूर आणि लतिफ तांबोळी यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.

दिगंबर आगवणे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली होती. खासदार निंबाळकर यांनी आपली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं आगवणे यांनी तक्रारीत म्हटलं होतं. या तक्रारीसोबतच सर्व आकडेवारी आणि पुरावे न्यायालयात सादर केले होते. यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशावरुन त्यांच्याविरुद्ध भा.द.वि. 405, 406, 418, 420, 467, 468 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल करुन तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. 

महत्त्वाचं म्हणजे दिगंबर आगवणे हे एकेकाळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा कट्टर कार्यकर्ता होते.

कोण आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर?
- रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे माढ्यातील खासदार आहेत.
- माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे ते सुपत्र
- फलटणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर विरोधक अशी ओळख
- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसने आपल्याला माढ्यातून उमेदवारी द्यावी यासाठी आग्रह केला होता. परंतु जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला
- भाजपच्या तिकीटावर त्यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांचा पराभव केला.

2019 च्या निवडणुकीत शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. परंतु शेवटच्या क्षणी शरद पवार यांनी माघार घेतली. माढ्यातील लढत भाजपने प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाकर यांना उमेदवारी दिली. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय शिंदे यांना पराभूत करत माढा मतदारसंघात विजय मिळवला.

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक, न्यायालयात जाणार, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक, न्यायालयात जाणार, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
Embed widget