एक्स्प्लोर

भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर अजित पवारांच्या भेटीला

महाविकासआघाडी सरकारची बहुमत चाचणी आज (30 नोव्हेंबर) होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे उद्धव यांच्या नेतृत्त्वातील महाविकासआघाडीच्या सरकारला आजच बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

मुंबई : नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या चर्चगेटमधील प्रेमकोर्ट या निवासस्थानी ही भेट झाली. सुमारे तासभर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. विधानसभेत आज ठाकरे सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. तासाभराच्या चर्चेनंतर खासदार प्रतापराव चिखलीकर अजित पवारांच्या घरातून निघाले. परंतु त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर अजित पवार म्हणाले की, " आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो तरी शत्रू नाही. या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. ते सहज भेटायला आले होते. ते भाजपमध्येच आहेत. मी राष्ट्रवादीतच आहे. गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. ते कालच भेटणार होते. त्यामुळे ते आज सकाळी मला भेटायला आले. अनेक पक्षांचे नेते मला भेटतात. विश्वासदर्शक ठरावासाठी कोणी कोणाला भेटत नाही. बहुमत चाचणीचं लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. त्यामुळे बारामतीकरांना दिसणार आहे, अजित पवारांनी कोणाला मत दिलं आहे. राष्ट्रवादी पक्ष जी जबाबदारी देईल ती करणार." दरम्यान, चिखलीकरांच्या भेटीनंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले. सिल्वर ओक इथे जाणाऱ्या एका गाडीत भाजपचे नेते बबनराव पाचपुते असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासोबतच जयंत पाटील हे देखील शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. आज बहुमत चाचणी महाविकासआघाडी सरकारची बहुमत चाचणी आज (30 नोव्हेंबर) होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे उद्धव यांच्या नेतृत्त्वातील महाविकासआघाडीच्या सरकारला आजच बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. आज दुपारी 2 वाजता विधानसभेचं कामकाज सुरु होईल. त्यानंतर ठाकरे सरकारची बहुमत चाचणी होईल. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे आमदार आणि इतर अपक्ष मिळून यांचं संख्याबळ 170 च्या जवळ जातं. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यात कोणतीही आडकाठी येणार नाही. विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

संबंधित बातम्या

नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची परीक्षा, विधानसभेत आज बहुमत चाचणी

उपमुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच, अजित पवार म्हणतात उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget