एक्स्प्लोर

ज्यांच्यावर छापे मारले जातात ते संन्यासी होते का?, राणेंचा सुप्रिया सुळेंना प्रश्न

Narayan Rane :  केंद्रीय तपास यंत्रणाकडून राज्यातील केल्या जाणाऱ्या छापेमारीवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केला आहे.

Narayan Rane :  केंद्रीय तपास यंत्रणाकडून राज्यातील केल्या जाणाऱ्या छापेमारीवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केला आहे. ज्यांच्यावर छापे मारले जातात ते संन्यासी होते का? असा सवाल नारायण राणे यांनी सुप्रिया सुळे यांना केलाय. केंद्रीय मंत्री नाराणय राणे यांनी आज सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यावर भाष्य केलं. ज्यांच्यावर छापे मारले जातात ते संन्यासी होते का? असा सवाल करतानाच सुप्रिया सुळे यांच्या नातेवाईकांवर छापेमारी झाली ती योग्यच होती, असेही राणे म्हणाले.  ईडी आणि सीबीआय करत असलेल्या कारवाईवर सुप्रिया सुळे काही दिवसांपूर्वी बोलल्या होत्या. त्याला राणे यांनी उत्तर दिलेय. 

 संसदेतील भाषण ट्रोल केलंय त्यावर नारायण राणे म्हणाले की, मला विचारलेला प्रश्न समाजाला होता, अधक्ष्याना वाटलं तो प्रश्न समजला नसेल म्हणून अध्यक्षनी तो पुन्हा सांगितला. जे काही करायचे आहे ते करा.. मी पूर्ण तयारीने गेलो होतो. कोणतेही कागदपत्रे हातात न घेता उद्योगासंदर्भात माहिती दिली होती. शिवसेनेनी ट्रोल केलं त्यांना काय करायचं ते करून दे पण आपण सुद्धा याचं उत्तर देवू असं प्रति आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेनेला दिलाय.

देशात सत्ता असताना भाजपने ऐक्य तोडलं नाही. संजय राऊत शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे? दिल्लीत ते शरद पवार यांच्या कार्यालयातच असतात. शिवसेनेचे आहेत असं ते दाखवतात तसे संजय राऊत नाहीत. त्यांनी शिवसेनेत काय केलं, लावालावीचं काम करणं..त्यामुळे त्यांच नाव संजय राऊत, असा उपरोधीक टोला नारायण राणें यांनी संजय राऊत यांना लगावलाय.

मुंबई गोवा महामार्गाचं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालं मात्र रत्नागिरीत तसे नेते नाहीत, वादावाद तो रस्ता तसाच राहिला. मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोललो आहे, असेही राणे म्हणाले. तीन पक्षांना निवडणूक नको आहे. आजच मरण उद्यावर ढकलण्याचे काम सुरु आहे. मुंबई मनपामध्ये दिसेल असे काम करू, असे राणे म्हणाले. मला 55 वर्ष राजकारणात झाली त्यामुळे मुंबई मनपा मध्ये सत्ता बदल होईल मात्र पत्रकाराना मनपा संदर्भात प्लॅन सांगून सुरुंग लावायचं नाही त्यामुळे सांगणार नाही, असेही त्यांनी सांगितलं.  

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्षांना टोला -
सतीश सावंत कोण आहेत संचयणीत घोटाळा केला तेच ना? असं म्हणत नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्षांना टोला लगावला. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत १०० टक्के निकाल आमच्या बाजूने लागेल, असाही विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्रात काही ठिकाणी नगरपालिकेला शिवसेना, काँगेसला उमेदवार मिळत नाहीत. राज्यातल आताच सरकार चालत नाहीत. एसटी कामगारांचा प्रश्न सोडवू शकत नाहीत. राज्याचा विकास रखडलाय, असेही राणे म्हणाले. 

सिंधुदुर्गमध्ये अनेक योजना येणार - राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 21, 22, 23 जानेवारी रोजी उद्योगाच्या अनेक योजनांच्या घोषणा केल्या जाणार आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना येणार आहेत. केरळच्या धर्तीवर सगळ्या योजना कोकणात आणणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालं, मात्र रत्नागिरीत तसे नेते नाहीत, वादावाद तो रस्ता तसाच राहिला, असे राणे यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget