Maharashtra Politics अमरावतीहिंदूंवरील अत्याचारांची चिंगारी  प्रत्येकाच्या हृदयात असली पाहिजे, दिवस कठीण आहेत. 1971 साली बांगलादेशात सात कोटी हिंदू होते. मात्र आता अवघे एक कोटी हिंदू राहिले आहेत. तिथं काहींना मारल्या गेलं, तर काहींचं धर्मांतर करण्यात आलं. हिंदू जागा होत नाही, मग सात कोटींचा एक कोटी होतो. बांगलादेशच्या प्रधानमंत्री यांचं मोदींनी अभिनंदन केलंय. त्याच वेळी हिंदूंवर अत्याचार होणार नाही याच्याही सूचना त्यांनी केल्या आहेत. हिंदू जागला तर खतरनाक होतो हे बांगलादेशातल्या हिंदूंनी दाखवून दिलं आहे.


सर्वांना लढता आलं पाहिजे यासाठी मोदीजींनी अग्निविर सारख्या योजना आणल्या. पण विरोधक त्यालाही विरोध करतात. कारण काँग्रेसला भारताचा बांगलादेश करायचा आहे. हिंदूंवर अत्याचार करायचा आहे, हे काँग्रेसचे म्हणणं आहे. राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? असा संतप्त सवाल करत भाजपचे नेते आणि खासदार खासदार अनिल बोंडेंनी (Anil Bonde) विरोधकांवर घणाघात केला आहे. 


 हिंदू कधी दुर्योधन, दुशासनाचा सन्मान करत नाही- अनिल बोंडे


बदलापुरात दोन मुलींवर अत्याचार झालेत. असे असतांना हिंदू कधी दुर्योधन, दुशासनाचा सन्मान करत नाही. मात्र विरोधक त्यातही राजकारण करत आहेत. महाविकास आघाडीला मला एकच सवाल करायचा आहे, उरणमध्ये यशश्री शिंदेवर अत्याचार झाला, त्यावेळेला तुम्ही रस्त्यावर का उतरले नाही? बदलापुरातील अत्याचार करणाऱ्याला फाशी होईलच.  मात्र, अमरावतीत एका मुलीचा विनयभंग करण्यात आला, पीडित मुलीच्या कुटुंबीयांना त्रास देण्यात आलं, त्यावेळी काँग्रेसचा कोणताही माणूस मदतीसाठी समोर आला नाही. त्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या पोरांना आवाज द्यावा लागतो. त्यावेळी हे गप्प का असतात, असा सवालही  अनिल बोंडेंनी उपस्थीत केला आहे. 


इजराइलमध्ये 90 लाख लोक राहतात, पण ते सगळ्यांना भारी आहे


मोदीजींनी 15 ऑगस्ट रोजी धर्म निरपेक्ष सिविल कोडची घोषणा केली. त्याचं उद्धव ठाकरे गटाने समर्थन करणे अपेक्षित आहे. मी राज्यसभेत सांगितलं दोन मुलं असतील तरच योजना द्या. इथलं पाणी पीत असाल, इथल्या मातीत गाडले जात असाल, तर सर्वांना एकच कायदा पाहिजे. त्यासाठी सेक्युलर सिविल कोड कोण्या जातीचे नाही, कोण्या धर्माचे नाही, भारताचं सेक्युलर सिविल कोड आहे. मात्र  शरद पवार, सुप्रिया सुळे, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांना सेक्युलर सिविल कोड पाहिजे. म्हणून गरीब मुसलमान कुटुंबीयांनी सांगितलं वक्फ बोर्डात सुधारणा केली पाहिजे. इजराइलमध्ये 90 लाख लोक राहतात, पण इजराइल सगळ्यांना भारी आहे. कारण इजराइल मधील प्रत्येक माणूस लढत आहे. तुमच्या कारखान्यात स्वस्त मजुरी द्यावी लागते, म्हणून बांगलादेशातील रोहिंगे यांना ठेवू नका, असे म्हणत अनिल बोंडे यांनी व्यापाऱ्यांना आवाहन केलंय.