एक्स्प्लोर

हिंदू मुस्लिम कधीच भाऊ-भाऊ होऊ शकत नाहीत; भाजप आमदार टी राजा सिंह यांचं वक्तव्य 

T Raja Singh : भाजप आमदार टी राजा सिह यांनी आज लातूर येथे शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. संकल्प प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या मोटरसायकल रॅलीला टी राज सिंह यांनी संबोधित केले.

लातूर : "हिंदू आणि मुस्लिम कधीच भाऊ-भाऊ होऊ शकत नाहीत. शिवाजी महाराज आणि औरंगजेब हे भाऊ भाऊ-होऊ शकतात का? महाराणा प्रताप आणि अकबर भाऊ-भाऊ होऊ शकतात का? गाईची पूजा करणारा आणि गाईची हत्या करणारे भाऊ-भाऊ होऊ शकतात का? वंदे मातरम गाणारा आणि वंदे मातरम गाण्यास विरोध करणारा भाऊ-भाऊ होऊ शकतात का? असं वक्तव्य भाजप आमदार टी राजा सिहं यांनी केलं आहे. त्याचं भाषण व्हायरल होत आहे. दरम्यान, टी. राजा सिंह यांना चिथावणीखोर भाषण न करण्यासंदर्भात प्रशासनाकडून बजावण्यात आलं होत. तरीदेखील त्यांनी प्रशासनाच्या सूचना न जुमानता प्रक्षोभक भाषण केलं.  टी राजा सिह यांनी आज लातूर येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. शिवजन्ममहोत्सव समितीने आयोजित केलेल्या मोटरसायकल रॅलीला टी राज सिंह यांनी संबोधित केले. यावेळी भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकरही उपस्थित होते.  

"ज्या भूमीत छत्रपती संभाजी महाराज यांचे रक्त सांडले आहे ते आज औरंगाबाद आहे. औरंगाबाजचे नाव बदलून आता संभाजीनगर करण्यात आले. आता ज्या ज्या ठिकाणी औरंगाबादचा उल्लेख आहे तो मिटवा. महाराष्ट्रात तेच राज्य करू शकतात, जे हिंदू विचार पुढे नेतात. ज्यांनी धर्म सोडला त्यांची अवस्था काय झाली ते पीहा. बाळासाहेबांच्या विचारावर चालणारं हे राज्य आहे. त्यांच्या विचारानुसार काम करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. बाळासाहेबांना मंदिरात घंटा वाजणारा नव्हे तर लव्ह जिहाद करणाऱ्या आणि धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीस ठोकणारा हिंदू पाहिजे होता. याबरोबरच सोशल मीडियाचा वापर करणारा तरुण नकोय तर रस्त्यावर उतरणार तरुण त्यांना हवा आहे, असे टी राजा सिंह यांनी म्हटले. 

टी राजा सिंह हे लातुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्या समोर रॅलीतील लोकांना अभिवादन करणार होते. मात्र शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी गेल्यावर त्या ठिकाणीच टी राजा सिंह यांनी भाषणाला सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना भाषण करू नका असे सांगितले होते. मात्र मी ते केले असे जाहीर भाषणात टी राजा सिंह यांनी म्हटले.   

भाजपातून हकालपट्टी 

प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामळे आमदार टी राजा सिंह यांना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना भाजपातून निलंबितही करण्यात आले आहे.   

महत्त्वाच्या बातम्या

Diwali Drought 5000 Help : 5 हजारांची अग्रीम मदत अजून मिळाली नाही? तलाठ्याकडे जाण्यापूर्वी हे तपासा!
Diwali Drought 5000 Help : 5 हजारांची अग्रीम मदत अजून मिळाली नाही? तलाठ्याकडे जाण्यापूर्वी हे तपासा!
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी खुल्या बसमधून मिंटो ब्रिजकडे रवाना, रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी, केंद्रीय निवडणूक आयोगासाठी सर्वंकष लढाई!
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी खुल्या बसमधून मिंटो ब्रिजकडे रवाना, रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी, केंद्रीय निवडणूक आयोगासाठी सर्वंकष लढाई!
टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी
टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी
Sharad Pawar: ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी
टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी
Dharashiv Drought: दुष्काळामुळे ताटातली भाकरी गायब होण्याच्या मार्गावर; यंदा शेतात ज्वारी खुरटली, पेरणीही घटली
दुष्काळामुळे ताटातली भाकरी गायब होण्याच्या मार्गावर; यंदा शेतात ज्वारी खुरटली, पेरणीही घटली
Mumbai Lift Death: खेळताना अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला अन्.., मुंबईतील 11 वर्षीय झैनच्या मृत्यूप्रकरणी तीन महिन्यानंतर कारवाई
खेळताना अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला अन्.., मुंबईतील 11 वर्षीय झैनच्या मृत्यूप्रकरणी तीन महिन्यानंतर कारवाई
Raj Thackeray Grandson And Amit Thackeray Daughter Name: राज ठाकरेंची नात आणि अमित ठाकरेंच्या मुलीचं नाव ठरलं; पुन्हा नावाची जोरदार चर्चा
राज ठाकरेंची नात आणि अमित ठाकरेंच्या मुलीचं नाव ठरलं; पुन्हा नावाची जोरदार चर्चा
Tukaram Mundhe Pune News : लाडू-चिवड्याची तुकाराम मुंढेंकडून तपासणी, भेसळखोरांना कडक इशारा, म्हणाले,
लाडू-चिवड्याची तुकाराम मुंढेंकडून तपासणी, भेसळखोरांना कडक इशारा, म्हणाले, "फराळात आर्टिफिशियल कलर अजिबात चालणार नाही..."
Sharad Pawar: ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
Pune Crime News: लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
Crime News: लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
Embed widget