एक्स्प्लोर
'ते' 6 कोटी भावाची वैयक्तिक रक्कम नाही, भाजप आमदाराचा दावा
उस्मानाबाद : उस्मानाबादच्या तुळजापूरमधून जप्त करण्यात आलेले 6 कोटी रुपयांबाबत नवीन स्पष्टीकरण समोर आलं आहे. ही रक्कम भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांचे बंधू गणेश गाडगीळ यांचे वैयक्तिक पैसे नसून बँकेचे असल्याचं स्पष्टीकरण सुधीर गाडगीळांनी दिलं आहे.
गणेश गाडगीळ हे सांगली अर्बन बँकेचे चेअरमन आहेत. सांगली अर्बन बँकेच्या नावाखाली रक्कम नेली जात होती. परभणीवरुन सांगलीच्या दिशेनं रोकड घेऊन जाताना नगरपालिका निवडणुकीच्या भरारी पथकानं कारवाई केली.
सहा कोटींची रक्कम नेताना गाडीसोबत जबाबदार बँक अधिकारी, सुरक्षारक्षक नसल्याचं पत्र निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. त्यामुळे सर्व रक्कम जिल्हा कोषागारात जमा करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement