एक्स्प्लोर

लातूर ग्रामीण मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखं, राम राम केला तरी ऊस वाळवला जात होता, भाजप आमदार रमेश कराडांचा धीरज देशमुखांना टोला 

माझा मतदारसंघ (लातूर ग्रामीण) म्हणजे पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखं आहे. आमच्या मतदारसंघात सतरंजीसुद्धा मिळत नव्हती, असं वक्तव्य करत भाजप आमदार रमेश कराड यांनी केलं.

Ramesh Karad : माझा मतदारसंघ (लातूर ग्रामीण) म्हणजे पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखं आहे. आमच्या मतदारसंघात सतरंजीसुद्धा मिळत नव्हती, सभेला माणूस येत नव्हता, कुणी राम राम केलं तर त्याचा ऊस वाळवला जात होता असं वक्तव्य करत भाजप आमदार रमेश कराड (Ramesh Karad) यांनी नाव न घेता काँग्रसे नेते धीरज देशमुख यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लातूरमध्ये  गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, या कार्यक्रमात कराड बोलत होते. 

मुंडे साहेबांनी जी वाट दाखवली त्या रस्त्याने जाण्याचा मी प्रयत्न करतोय

देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकला, मला विधानसभेची उमेदवारी दिली,. रेणापूर मतदारसंघाचे नेतृत्व मुंडे साहेबांनी केलं, त्याचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली आहे. आयुष्यभर मुंडे साहेबांनी संघर्ष केला. मुंडे साहेबांनी जी वाट दाखवली त्या रस्त्याने जाण्याचा मी प्रयत्न करत असल्याचे कराड म्हणाले. 

चौंडी येथील सभेत गोपीनाथ मुंडे यांनी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र फडणवीस असे सांगितले होते असे रमेश कराड म्हणाले. येथील 90 टक्के भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी तयार केलेले आहेत असे रमेश कराड म्हणाले. मला मुंडे साहेबांनी नेतृत्व केलेल्या मतदारसंघाचे काम करण्याची संधी मिळाली आहे. देवेंद्र भाऊ तुम्ही भल्या भल्यांची झोप उडवून लावली आहे असेही कराड म्हणाले. मला या मतदारसंघाचे नेतृत्व करताना अनेक अडचणी होत्या. सभा घेतना अडचणी होत्या. आज काही कामं झाली आहेत. आणखीन काही कामात वाढ करता आली तर खूप उत्तम होईल, आपण सहकार्य करावं असे मत रमेश कराड यांनी व्यक्त केले.  

मुख्यमंत्रीसाहेब तुमच्या सहकार्याने रेणापूर मतदारसंघाचा मला विकास करायचाय

आमच्या मतदारसंघात सभेला माणूस येत नव्हता. राम राम केला तर ऊस वाळवला जात होता असे रमेश कराड म्हणाले. मुख्यमंत्रीसाहेब तुमच्या सहकार्याने रेणापूर मतदारसंघाचा मला विकास करायचा असल्याचे रमेश कराड म्हणाले. इथे एमआयडीसीची गरज आहे. या ठिकाणी रस्त्याची अडचण आहे, ते रस्ते झाले पाहिजेत असे रमेश कराड म्हणाले. लातूर तालुक्यातील जनतेनं माझ्यावर खूप प्रेम केलं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Video: देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्रचा नारा होता, पण आम्ही गोपीनाथ मुंडेंनाच मुख्यमंत्री करणार होतो; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली आठवण

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Embed widget