बारामती : राजकारणात कोणीच कोणाचा जास्त काळ शत्रू नसतो किंवा जास्त काळ कोणी मित्र पण नसतो असे म्हटले जाते. याचाच प्रत्येय आज बारामती येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान आला. या कार्यक्रमात भाजपचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे तोंड भरून कौतुक केले. "राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी दादांचा फॅन आहे, असं वक्तव्य भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
"दादांचे काम, दादांचे कर्तृत्व आपल्याला माहीत आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी त्यांचा फॅन आहे. दादांची शिस्त मी पहिली आहे, असे अजित पवार यांचे कौतुक जयकुमार गोरेनी केले.
आमदार गोरे यांना राष्ट्रवातीत येण्याची ऑफर
आमदार जयकुमार गोरे यांनी अजित पवार यांचं कौतुक केल्यानंतर लगेचच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी जयकुमार गोरेंना पक्षात येण्याची ऑफर दिली.
बारामतीच्या नेत्यांनी एखाद्याला हात दिला तर दगडात देखील पाणी काढू शकतात. आमच्या दादांचे तुम्ही तोंड भरून कौतुक केलं आहे. भाऊ तुम्ही हाडाचा कार्यकर्ता आहात. चुकतो तोच माणूस असतो. आमच्या नेत्याचा उल्लेख चांगला केला आहे. तुमच्या डोक्यात चांगला विचार येउद्या आणि भविष्यात चांगला विचार करा असे म्हणत भरणेंनी जयकुमार गोरेंना पक्षात येण्याची ऑफार दिली.
दत्तात्रय भरणेंचा मास्क कुठे?
एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार लोकांना मास्क लावण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे त्यांचेच मंत्री सार्वजनिक कार्यक्रमात विनामास्क वावरताना दिसत आहेत. लोकांची गर्दी होऊ नये म्हणून अजित पवार यांनी आज 4 वाजता होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या आधी एक तास म्हणजे 3 वाजताच केले. शिवाय गर्दी असणाऱ्या कार्यक्रमांना जाणार नाही असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. मात्र याच कार्यक्रमात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे विनामास्क स्टेजवर बसले होते. दत्तात्रय भरणे यांनी खाली बसलेल्या एका व्यक्तीला मास्क वरती घ्यायला सांगितला. मात्र त्यांचाच मास्क खाली होता याचा विसर दत्तात्रय भरणे यांना यावेळी पडला होता.
महत्वाच्या बातम्या
पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यती रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, अजित पवार म्हणाले...
- हर्षवर्धन पाटील यांच्या लेकीचं लग्न, अजित पवार, रावसाहेब दानवेंकडून आशीर्वाद