मुंबई : महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे हजारो वर्षांचा सांस्कृतीक वारसा घेवून उभी आहेत, अनेक प्राचीन मंदिरांच्या जिर्णोद्धाराची गरज आहे. यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर जिर्णोद्धार समिती' स्थापन व्हावी अशी मागणी विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. त्यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून ही मागणी केली. 


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्याचं संपूर्ण आयुष्य मंदिर जिर्णोद्धार कार्यात वाहिलं, त्यामुळे राज्यातील प्राचीन मंदिरांच्या जिर्णोद्धाचे कार्य सुरू ठेवण्यासाठी त्यांच्या नावाची समिती स्थापन करावी. या समितीच्या कार्यात डेक्कन महाविद्यालय आणि पुरातत्व खात्याची घेता येईल असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. 


 




काय आहे निवेदनात? 


हिंदोस्थानचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील दीपस्तंभ म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. आधुनिकतेची शिखरं महाराष्ट्र मोठ्या दिमाखाने मिरवतोय. हा सर्व डोलारा उभा आहे तो महाराष्ट्राच्या प्राचिन संपन्नतेवर. या इतिहासाची साक्षं देणारी हजारो वर्षांपूर्वीची मंदिरं आजही उभी आहेत. आपल्या भव्य दिव्य संस्कृती परंपरेची साक्ष देत आहेत. या मंदिरांकडे पाहिलं तरी नव्या काळात उर्जा मिळते.


सध्या पवित्र श्रावण महिना सुरु आहे. त्या निमित्तानं राज्यभरातील शिव मंदिरांना भेटी देण्यासाठी भाविक लाखोंची गर्दी करतायत. शिव मंदिरांसह हेमाडपंथी वास्तूरचना असलेल्या अनेक प्राचीन मंदिरांचा जिर्णोद्धार करण्याची गरज समोर येते आहे. यासाठी डेक्कन महाविद्यालय, तसेच पुरातत्त्व विभागाची मदत घेता येईल. मंदिर जिर्णोद्धारासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर जिर्णोद्धार सर्वेक्षण समिती' गठीत करावी. या समितीच्या माध्यमातून राज्यभरातील सर्व प्राचीन मंदिराचे सर्वेक्षण करता येईल. राज्यशासनापुढे समितीने अहवाल सादर केल्यानंतर जिर्णोद्धाराच्या दिशेने योग्य पावलं टाकता येतील.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मॉंसाहेबांनी संपूर्ण आयुष्य मंदिर जिर्णोद्धार कार्यात वाहिलं. मंदिरांसोबत त्या नवभारताची निर्मितीही करत होत्या. देशाच्या सीमानिश्चिती करत होत्या. जिर्णोद्धार कार्यातून स्थानिक स्तरावर त्यामार्गे मोठे उद्योग निर्माण झाले. बाजारपेठा तयार झाल्या. त्यातून तत्कालीन अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. अहिल्यादेवींची दूरदृष्टी आम्हाला आपणात दिसते. त्यामुळे आपल्या हातून हे जिर्णोद्धार कार्य नक्की पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे. 


ही बातमी वाचा: