एक्स्प्लोर

 उद्धव ठाकरे यांनी मला मारण्यासाठी छोटा राजन आणि छोटा शकील यांना सुपारी दिली होती; नारायण राणेंचा गंभीर आरोप 

Narayan Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी सदा सरवणकर यांना मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला करायला सांगितलं होतं. शिवाय मला मारण्यासाठी छोटा राजन आणि छोटा शकील यांना सुपारी दिली होती, असा आरोप केंद्रीय मंत्री नाराण राणे यांनी केलाय.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला मारण्यासाठी छोटा राजन आणि छोटा शकील यांना सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलाय. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या दिवशी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राणे यांनी हा गंभीर आरोप केलाय.  

उद्धव ठाकरे हे लबाड लांगडे आहेत. कारण ते खूप खोटं बोलतात.  उद्धव ठाकरे यांनीच सदा सरवणकर यांना मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला करायला सांगितलं होतं. शिवाय मला मारण्यासाठी छोटा राजन आणि छोटा शकील यांना सुपारी दिली होती. परंतु, आज मी जिवंत आहे, कोणीच मला मारू शकलं नाही. उद्धव ठाकरे यांना मी पुरून उरेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मर्यादा राखावी. उद्या कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्याला जबाबदार उद्धव ठाकरे असतील. आम्ही आमच्या नेत्यांना बोललेलं खपवून घेणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिलाय. 

नारायण राणे यांनी दसरा मेळाव्यावरून देखील घणाघाती टीका केली.  "यावेळचा शिवाजी पार्कचा दसरा मेळावा म्हणजे तमाशा पद्धतीचा मेळावा होता. उद्धव ठाकरे बोलायला लागल्यानंतर लोक उठून गेले. शिवसेनेचा मेळावा शिमग्यासारखा झाला.  कारण शिमग्याला शिव्या द्यायचं काम होतं तसचं चित्र पवित्र शिवतीर्थावर पाहिला मिळालं. उद्धव ठाकरे यांनी शिव्या शाप देण्यासाठी मेळावा घेतला होता काय, असं चित्र होतं.  केवळ शिव्या देण्याचं काम त्यानीं केलं.  बाळासाहेबांच्या विचारांतून प्रेरणा मिळत होती. त्यातून आमची जडणघडण झाली. त्यामुळेच इथपर्यंत पोहचलो. आताचे विचार पाहिलं तर त्यांना दुसरं काही येतं की नाही माहिती नाही, अशी टीका नारायण यांनी केली. 

उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसासाठी काय केलं असा प्रश्न यावेळी नारायण राणे यांनी उपस्थित केला. 'मराठी माणसांसाठी यांनी काय केलं. केलं असतं तर मेळाव्यातून शिव्या देण्यापेक्षा अडीच वर्षात केलेली कामे सांगितली असती. आपण कोण आहोत याची ठाकरेंना जाणीव करून दिली पाहिजे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.  

महत्वाच्या बातम्या

Narayn Rane : शिव्याशाप देण्यासाठी सभा घेतली होती काय?  दसरा मेळाव्यावरून नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका  

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Viral Video : इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
Kalicharan Maharaj Speech: कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर दातओठ खात टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस
मनोज जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस; कालीचरण महाराजांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Raut With Family : चिमुकल्या नातीसह नितीन राऊत नागपूरमध्ये प्रचाराच्या मैदानात NagpurBhaskar Jadhav on Eknath Shinde : शिंदेंचा सवाल, भास्कर जाधव म्हणाले... नक्कल करायला अक्कल लागतेABP Majha Headlines : 11 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 10 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Viral Video : इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
Kalicharan Maharaj Speech: कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर दातओठ खात टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस
मनोज जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस; कालीचरण महाराजांचा हल्लाबोल
Rahul Gandhi: 'एक है तो सेफ है'च्या मागे मोदी-अदानींचा फोटो, महाराष्ट्राची तिजोरी दाखवली, शेवटच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मिसाईल सोडलं
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधींनी मिसाईल सोडलं, मोदी-अदानींचा फोटो दाखवत रान उठवलं
Jalgaon Crime : मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
Kalicharan Maharaj: कालीचरण महाराजांचं जहाल भाषण, हिंदू मतदारांना आक्रमक भाषेत साद, वाचा नेमकं काय म्हणाले?
कालीचरण महाराजांचं जहाल भाषण, हिंदू मतदारांना आक्रमक भाषेत साद, वाचा नेमकं काय म्हणाले?
Embed widget