Kirit Somaiya : उद्धव ठाकरे डरपोक, ठाकरे सरकारकडून महाराष्ट्राच्या जनतेला लुटण्याचं काम, किरीट सोमय्यांचा निशाणा
उद्धव ठाकरे हे डरपोक आहेत. त्यांनी एकाही घोटाळ्यावर स्पष्टता दिली नसल्याचे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले.
Kirit Somaiya on CM Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे हे असली आहेत तर उद्धव ठाकरे नकली आहेत असे म्हणत भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेनेवर टीका केली. तुमचं हिंदुत्व खोटं आहे. उद्धव ठाकरे हे डरपोक आहेत. त्यांनी एकाही घोटाळ्यावर स्पष्टता दिली नसल्याचे सोमय्या म्हणाले. असली कोण आणि नकली कोण हे जनतेला माहिती आहे. तुमच्या माफिया सेनेच्या 18 जणांची चौकशी सुरु असल्याचेही ते म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मुंबईतल्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. जवळपास एक तास केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. एकंदर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात फडणवीसांना आणि भाजपला टार्गेट केलं. उद्धव ठाकरे यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांच्या या टिकेला सोमय्या यांनी आज उत्तर दिले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा लगावला. वाशिम आणि पुण्यात शिवसैनिकांनी माझ्यावर हल्ला केला असल्याचे सोमय्या म्हणाले.
संजय राऊत यांचा बोलवता धनी उद्धव ठाकरे हे आहेत. तुमचे अनेक मंत्री कोर्टात चकरा मारत आहेत. काही जेलमध्ये आहेत, तर काही रुग्णालयात आहेत असेही सोमय्या यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरेंना न्यायालयाने उत्तर दिलं आहे. काल ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं असेही सोमय्या यावेळी म्हणाले. तुमच्यात हिंम्मत असेल तर स्पष्ट करा की, ते 19 बंगले कोणाचे आहेत असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे हे डरपोक आहे. महाराष्ट्रच्या जनतेला लुटण्याचं काम उद्धव ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप यावेळी सोमय्यांनी केला. तेजस ठाकरे यांनीही मनी लॉंड्रिंग केली आहे. रश्मी ठाकरेंबद्दल मला जास्त बोलायचे नाही. मात्र, यावेळी बोलताना सोमय्यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर जोरदार निशाणा लगावला. चमचागिरी करताना हे तर लक्षात ठेवा तुम्ही घोटाळे केलेत असे सोमय्या म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: